मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर विश्वं यदेतत्स्वतनौ निशान्ते यथावकाशं पुरुषः परो भवान् ।बिभर्त्ति सोऽयं मम गर्भगोऽभूदहो नृलोकस्य विडम्बनं हि तत् ॥३१॥तूं आदिपुरुष परात्पर । जाणोनि प्रलयाचा अवसर । स्वशरीरीं जगदाकार । सविस्तर सांठवसी ॥८१॥अविद्याभ्रमाची सरली राती । करणतारकां उपरमगति । उदेला स्वप्रकाशगभस्ति । तो निशातीं तूं एक ॥८२॥आपुले तनूमाजीं जगा । सांठवूनि होसी जागा । दृश्य स्वप्नाचिया लिंगा । ठाव अवघा तुजमाजीं ॥८३॥अथवा दिव्य सहस्रयुगांच्या अंतीं । वैराजपुरुषाची सुषुप्ति । येणेंचि क्रमें सर्वांप्रति । होय सुषुप्ति स्वमानें ॥८४॥तितुकीचि निशी क्रमिल्या अंतीं । पावति यथापूर्व जागृति । तैं तुझिये शरीरीं जगाची स्थिति । होय पुढती यथावकाशें ॥५८५॥विस्तृत चरण तो भूलोक । भुवर्लोक तो जानुनी देख । ऊरू जाणावा स्वर्लोक । महर्लोक पैं जठर ॥८६॥जनलोक तो कंठस्थान । तपोलोक तें श्रीमुख जाण । सत्यलोक ब्रह्मसदन । मूर्द्धस्थान जाणिजे ॥८७॥एवं निशांतीं सर्व लोक । तनूमाजीं धरिसी सम्यक । तें हें रूप विश्वात्मक । माझा तोक म्हणवितां ॥८८॥अघटित मानिती सर्व लोक । म्हणती केवळ विश्वात्मक । देवकीगर्भीं हा बाळक । हें कौतुक जाणोनि ॥८९॥तरंगापोटीं जन्मला सिंधु । कीं चकोरनयनाम्रुतें इंदु । तेंवि मम गर्भीं तूं एवंविधु । हा विसंवादु जग मानी ॥५९०॥हेंचि आश्चर्य चक्रपाणि । माझे उदरीं तूं जन्मोनि । मनुष्यलोकींची तूं संपादणी । करिसी अवगणी सारिखी ॥९१॥ऐशी देवकीची विज्ञापना । ऐकोनि सर्वज्ञांचा राणा । अभिप्राय आणितां मना । विवंचना हे कील ॥९२॥कंसभयापासून रक्षणें । आदिरूप न प्रकटणें । कंसालागीं कळों न देणें । तुझें जन्मणें मम उदरीं ॥९३॥आणि दिव्यरूपें पुत्र म्हणवितां । जगीं पावेन उपहास्यता । बाळ होणें या अतौता । अर्थ न वदतां दाविला ॥९४॥इतुके विवरूनि लक्ष्मीपति । अंगीकारूनि तिची विनति । आदिरूपाच्या संकेतीं । पूर्व वरदोक्ति बोधित ॥९५॥श्रीभगवानुवाच - त्वमेव पूर्वसर्गेऽभूः पृश्निः स्वायंभुवे सति । तदायं सुतपा नाम प्रजापतिरकल्मषः ॥३२॥संपूर्ण यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । ऐसें अनंत गुणगांभीर्य । तो सुरवर्य भगवान ॥९६॥चौदा श्लोकीं श्रीभगवान । करील पूर्वजन्मींचें कथन । श्रोतीं होऊनि सावधान । तें भगवद्वचन ऐकावें ॥९७॥हरि म्हणे वो ऐकें जननी । पूर्व जन्मींची वृत्तांतकहाणी । तुज कळावी म्हणोनि । हें रूप नयनीं दाविलें ॥९८॥तरी तूं स्वायंभुवे मन्वंतरीं । पृश्नि या नामें तूं सुंदरी । सुतपा प्रजापतीचे घरीं । सदाचारी होतीस ॥९९॥तैं हा वसुदेव आपण । प्रजापति तपोधन । सुतपा याचेंचि अभिधान । निर्दूषण रवितुल्य ॥६००॥तुम्ही अकल्मष दंपती । शांत दांत शुद्धवृत्ति । ब्रह्मा आज्ञापी तुम्हांप्रति । प्रजासर्गार्थ जे काळीं ॥१॥युवां वै ब्रह्मणादिष्टौ प्रजासर्गे यदा ततः । सन्नियम्येन्द्रियग्रामं तेपाथे परमं तपः ॥३३॥तेव्हां तुम्हीं इंद्रियग्राम । निरोधिला करूनि नियम । तप आचरलां जें परम । तो अनुक्रम अवधारा ॥२॥वर्षवातातपहिमघर्मकालगुणाननु । सहमानौ श्वासरोधविनिर्धूतमनोमलौ ॥३४॥गिरिकंदरीं घालूनि माळा । तेथ क्रमिलें वर्षाकाळ । जळीं बैसोनि हिंवाळा । आकंठ जळा सेविलें ॥३॥उष्णकाळीं महापंचाग्नि । वात साहिला निरावरणीं । ऐशीं माझिये प्राप्ती लागूनि । नियमसाधनीं प्रवर्त्तला ॥४॥रजतमीं चित्त होतें मैलें । तें प्राणायामाचेनि बळें । जालूनि अकल्प कलिमलें । आणिलें अमळें सत्त्वशुद्धि ॥६०५॥एवं निरोधोनिया श्वास । पूर्ण साधोनि योगाभ्यास । तेणें शोधिलें मानसास । केलें निर्दोष निर्मळ ॥६॥एक म्हणती अभ्यासमार्गें । कैवल्य लाभे अष्टांगयोगें । ऐसें जल्पती वाउगें । हीं साधनांगें प्राप्तीचीं ॥७॥इहीं होय चित्तशुद्धि । तैं विवेकें उजळे बुद्धि । सर्व निरसती उपाधि । पावे सिद्धि स्वबोध ॥८॥होतां चित्तशुद्धि पूर्ण । ठसावे सप्रेम ज्ञानभजन । सगुणनिर्गुण समसमान । पूर्वसाधन योगबळें ॥९॥देवकीसि म्हणे भगवान । ऐसें चित्त शोधूनि पूर्ण । याचि रूपातें आराधन । केलें जाण ते काळीं ॥६१०॥शीर्णपर्णानिलाहारावुपशान्तेन चेतसा । मत्तः कामानभीप्सन्तौ मदाराधनमीहतुः ॥३५॥मनुष्याचा संवत्सर । तें देवांचें अहोरात्र । येणें मानें अब्ध थोर । तें साचार दिव्यवर्ष ॥११॥दिव्य वर्षें चारी सहस्र । गलितपत्रांचा केला आहार । त्याउपरी चारी सहस्र । आहार केला पवनाचा ॥१२॥त्याहीउपरी चारी सहस्र । श्वासरोधें निराधार । होऊनि मदाराधनपर । ध्यानीं एकाग्र मद्योगें ॥१३॥ऐशी तपश्चर्या अवघड । परी प्रशांतचित्तें राहिलां दृढ । कामक्रोधांची त्यजिली भीड । धरिला वाड मम प्रेमा ॥१४॥तपें तोषवावें मज हा नेम । तोषल्या इच्छावा हाचि काम । मदाराधनीं उत्कृष्ट प्रेम । यावीण काम न इच्छां ॥६१५॥अनेक काम भजनात्मक । तें मजचि मागावें सम्यक । मज वेगळा भाव आणिक । कोणी एक नातळलां ॥१६॥दिव्य बारा सहस्र वर्षें । याचि निश्चयें तपोत्कर्षें । अन्यकामनावातस्पर्शें । संकल्पलेशें नातळलां ॥१७॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP