मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| श्लोक २६ ते २७ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - श्लोक २६ ते २७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते २७ Translation - भाषांतर योऽयं कालस्तस्य तेऽव्यक्तबन्धो चेशःटामाहुश्चेष्टते येन विश्वम् ।निमेषादिर्वत्सरान्तो महीयांस्तं त्वेशानं क्षेमधाम प्रपद्ये ॥२६॥ऐकें गा ये अव्यक्तबंधु । जेणें संबोधनें गोविंदु । संबोधिला तो अर्थ विशदु । श्रोतीं सावध परिसावा ॥७८॥अव्यक्तनामें जे कां प्रकृति । तिसी प्रवर्त्तक तूं जगत्पति । म्हणूनि अव्यक्तबंधु या संबोधनोक्ति । देवकी सती संबोधी ॥७९॥महाप्रळयाचें कारण । जो हा काळ विशाळ जाण । पुनः पुनः परिवर्त्तन । हें क्रीडन जयाचें ॥४८०॥दशाक्षरें श्वासा येका । श्वासषट्कें पळात्मका । साठि पळांचा भरतां लेखा । तैं होय देखा एक घटि ॥८१॥तीनसे साठि श्वास फ्रेर । तेणेंचि मानें घटिका भरे । साठि घटिकांचे भरतां फेरे । एका वासरें होइजे ॥८२॥सप्त वासरांचें चक्र । दोनी वेळां करी फेर । तेव्हां एक तिथीचें चक्र । तें फिरे द्विवार तो मास ॥८३॥दों मासांचा एक ऋतु । तिहीं ऋतूंचें अयन होत । दोन्हीं अयनें जेव्हां भरत । तेव्हां होत संवत्सर ॥८४॥संवत्सरासि वर्ष म्हणणें । एका वर्षा दोनी अयनें । सहा ऋतु बारा महिने । येणें प्रमाणें प्रतिअब्ध ॥४८५॥सूर्यभ्रमणें कालगणना । त्यासि सौरमान ऐशी संज्ञा । चंद्रभ्रमणें चांद्रमाना । केली संज्ञा दैवज्ञीं ॥८६॥अश्विन्यादि नक्षत्रभ्रम । त्यासि नाक्षत्रमान ऐसें नाम । यवनीं आदरिला जो क्रम । सावननियम संज्ञेचा ॥८७॥सांगों काळाचे अवयव । योग करणें राशिभाव । तरी ग्रंथ वाढेल हा भेव । म्हणोनि सर्व आवरिलें ॥८८॥कृष्ण शुक्ल दोनी पक्ष । तो पितरांचा रात्रंदिवस । उत्तरायण तो सुरांचा दिवस । दक्षिणायन ते रजनी ॥८९॥मानुषी घटीचा अवकाश । तो देवांचा श्वासोच्छ्वास । येणेंचि मानें पळें घटिकांस । अहोरात्रास जाणावें ॥४९०॥एवं मनुष्यांचें वर्ष मात्र । तें देवांचें अहोरात्र । ऐसे साठी संवत्सर । तें वत्सरचक्र जाणिजे ॥९१॥बहात्तरी शतें संख्या फेरे । जैं संवत्सराचें चक्र फिरे । तैं कलियुगाचें मान पुरे । बत्तीस सहस्र चारि लक्ष ॥९२॥कलिद्विगुण द्वापार जाण । त्रेतायुग कलित्रिगुण । कलि केलिया चतुर्गुण । तेंचि म्हणणें कृतयुग ॥९३॥एवं त्रेताळीस लक्ष । वरी वीस सहस्र अधिक । इतुका चौकडीचा अंक । महर्युग एक या नांव ॥९४॥ऐशीं महर्युगें दोन सहस्र । तें विधीचें अहोरात्र । येणें मानें शताब्द मात्र । ब्रह्मयाचें परमायु ॥४९५॥ब्रह्मयाचें जन्ममरण । तेणें विष्णूचें मानगणन । विष्णूवरूनि रुद्रमान । रुद्रावरूनि ईशाचें ॥९६॥ईशावरूनि प्रधानमान । रात्रीही जाणिजे तत्समान । एवढें कालमहिमान । परिवर्त्तन तच्चेष्टा ॥९७॥विश्वसृजनावनाप्ययन । हे काळाची चेष्टा जाण । तो तूं कालात्मा भगवान । तव क्रीडन तें म्हणती ॥९८॥तव लीलेतें अनुलक्षून । काळ चेष्टे सनातन । यथानुक्रमें परिवर्त्तन । अगाधपण हें तुझें ॥९९॥तो तूं कालात्मा अनंता । कालकाला काळातीता । क्षेमधाम श्रीअच्युता । शरणागता अभिरक्षीं ॥५००॥जेथवरी काळाचे वर्त्तन । तेथवरी न चुके जन्ममरण । तूं काळातीत निर्भय स्थान । यालागीं शरण तुजलागीं ॥१॥क्षेमधाम कैसा म्हणसी । तरी ऐकावें हृषीकेशी । प्राणी बिहाला कालसर्पासी । निर्भाअसी धुंडितां ॥२॥मर्त्यो मृत्युव्यालभीतः पलायॅंल्लोकान्सर्वान्निर्भयं नाध्यगच्छत् ।त्वत्पादाब्जं प्राप्य यदृच्छयाद्य स्वस्थः शेते मृत्युरस्मादपैति ॥२७॥पूर्वश्लोकीं कथिला काळ । तोचि प्रत्यक्ष मृत्युव्याळ । त्याच्या भयें लोक सकळ । प्राणी चपळ पळाला ॥३॥पळोनि आला भूलोकासी । तेथ काळ डंखी गर्भवासीं । पहातां निर्भयत्व चौपासी । कोण देशीं नाडळे ॥४॥राजा सकळ प्रजा रक्षी । जो संपन्न सेनाध्यक्षी । काळ त्यातेंचि मुख्य भक्षी । मग कैपक्षी त्या कैंचा ॥५०५॥एवं भुवर्लोक स्वर्लोक । महर्लोक जनलोक तपोलोक । शेखीं प्रवेशला सत्यलोक । तपोत्कर्षेंकरूनि ॥६॥परी तेथही काळव्याळ । बळें रिघोनि डंखी सकळ । आयुष्य सरे तों तळमळ । वृथा चळवळ करिताती ॥७॥पाशीं गुंतला जेविं पन्नग । तेणें मुखीं धरिला भेक । तो मक्षिकांचा विवेक । न करी देख ज्यापरी ॥८॥तैसे येक येकाचे काळ । ऐसाचि अवघा ब्रह्मगोळ । तेणें काळभयें प्राणी व्याकुळ । निर्भयस्थळ लाहे ॥९॥सर्व लोकांप्रति गेला । परी मृत्यु तेथेंही लागला । कोठें निर्भयता न पावला । तळमळीत ठेला काळभयें ॥५१०॥तंव अकस्मात संत्संगति । घडतां अनुतप उपजला चित्तीं । महद्भाग्यें भगवद्भक्ति । सप्रेम चित्तीं ठसावली ॥११॥तेव्हां इहामुत्रार्थविराह । अनित्य जाणोनि आला उबग । शमदमें प्रवृत्तीचा त्याग । उपरमयोग विषयांचा ॥१२॥हरिभजनीं रमलें चित्त । उपरम विषयप्रवृत्तींत । हरिप्रेमामृतें तृप्त । तितिक्षावंत यालागीं ॥१३॥नाशिवंतीं धरिल्या ममता । शोक वाढे नाश होतां । अविनाश हरिपद चिंतितां । उल्हासतां विशोक ॥१४॥देहीं अहंता उभारे । तैंच निंदास्तुति स्फुरे । हर्षामर्ष आविष्कारे । मग वोथरे सुखदुःखें ॥५१५॥ते अहंता हरिचरणीं । लीन केली सोहंभजनीं । तैं हर्षामर्षाची कहाणी । कोणें श्रवणीं ऐकावी ॥१६॥ईश्वरानुग्रहें सद्गुरुप्राप्ति । तेणें सच्छास्त्रश्रवणीं रति । हरिगुणांची अगाध कीर्त्ति । नाहंकृति स्वलाभें ॥१७॥हरिप्रेमें भरतां मन । कृपें कळवळूनि भगवान । सर्व भूतीं स्वानंदघन । दयाजीवन वर्षतु ॥१८॥जेथ भाव तेथ देव । सहजें विवर्त्ता अभाव । चौथे भक्तीचा सद्भाव । अवघें वास्तव चिन्मात्र ॥१९॥ज्यासि आंधाराचे डोहळे । तेणें झांकावे आपुलेचि डोळे । वांचूनि त्रैलोक्य आंधळें । वृथा बावळें करूं म्हणे ॥५२०॥तेंवि प्रवृत्तीचा उपरम । करूनि होइजे आत्माराम । विश्वीं प्रवृत्तीचा नेम । करूनि अधम नाडती ॥२१॥पराचे नेमितां दोषगुण । स्वहितीं होय नागवण । यालागीं मुरडूनि अंतःकरण । श्रीहरिचरण सेवावे ॥२२॥तृषा लागतां आपुले पोटीं । आपणचि जळ प्राशिजे ओंठीं । बळें लावितां लोकांपाठीं । कोणी न घोंटी परेच्छे ॥२३॥विशेष काय सांगूं एथ । पुत्रही झाला पूर्ण भक्त । पिता हिरण्यकशिपु भ्रांत । तो अविरक्त राहिला ॥२४॥पुत्रें पिता उद्धरिला । हा अर्थ मीमांसकीं आदरिला । योगिवृंदीं अनादरिला । तो परिसिला पाहिजे ॥५२५॥मीमांसकांचा स्वर्ग सगुण । केलिया जोडे यज्ञादि पुण्य । अवघे वांटूनि पितृगण । ब्रह्मसदन पावविती ॥२६॥तैसें नव्हे ज्ञानभजन । आपण होइजे कृष्णार्पण । अभिन्नबोधें प्रेमा गहन । सग्ण निर्गुण समसाम्य ॥२७॥हरिप्रेमा नव्हे धन । जें वांटूनि घेती पितृगण । तेथींची अनारिसी खूण । भक्त सज्ञान जाणती ॥२८॥आपुलेपणीं कांहीं न उरणें । हरिप्रेमरसीं मुरणें । समरसोनि भजनीं उरणें । जेव्हां स्फुरणें साक्षित्त्वें ॥२९॥आपण मरोनि फिरोनि आला । तेणें इतरा आधार दिला । साच मानी जो या बोला । तो गलबला हाकारू ॥५३०॥तप्त लोह गिळी जळ । तें इतर जळासी करी मेळ । तैंचि भेदोनि गेला जो मायापटळ । तो करी सांभाळ पितरांचा ॥३१॥निमेषमात्र स्वरूपोन्मुख । होतां घडले कोटि मख । तेणें पुण्यें स्वर्गसुख । पितृप्रमुख भोगिती ॥३२॥वांचूनि कैवल्यसुखाची प्राप्ति । तें दुर्लभचि तयांप्रति । एक केलिया भगवद्भक्ति । सायुज्यप्राप्ति अक्षय्य ॥३३॥तोयीं तोय घृतीं घृत । दुग्धीं दुग्ध अमृतीं अमृत । हेमीं हेम होय मिश्रित । तेंवि विरक्त हरिभजनीं ॥३४॥पिता पुत्र अथवा बंधु । जंववरी विरक्त नसतां शुद्ध । तंववरी हरिप्रेमाचा स्वानंदबोधु । सहसा अगाधु नातुडे ॥५३५॥विरक्त असो भलती याति । तो अधिकारी भगवद्भक्ति । प्रेमाथिली स्वानंदप्राप्ति । तो निश्चितीं पावेल ॥३६॥अविरक्त आप्त तो परकीय । विरक्त परावा आप्त होय । यालागीं शिष्य ज्ञान लाहे । कृपानुग्रहें अधिकारें ॥३७॥सर्वभूतीं भगवद्भाव । तेथ आपपरासी कैंचा ठाव । विरक्तां भाविकां हा निर्वाह । परी अविरक्त सद्भाव धरीना ॥३८॥म्हणोनि दुर्लभ भगवद्भक्ति । अनेक जन्मांच्या संचितीं । अकस्मात होय प्राप्ति । निर्भयस्थिति जी नांव ॥३९॥सहस्रें सहस्र जन्मांतरें । तपःसमाधि अध्वरें । निष्काम इत्यादि सुकृतभरें । जगदीश्वरें तोषिजे ॥५४०॥तेव्हां अकस्मात भगवच्चरणीं । प्रेमा जडे निश्चयभजनीं । भरों प्रेमाचिये कथनीं । तरी ग्रंथवर्धनीं भय वाटे ॥४१॥पहातां श्लोक साधारण । यदृच्छया पदावरून । भांबावलों तें श्रोतेजन । क्षमापन करावें ॥४२॥आतां श्लोकोपसंहार । मृत्युसर्पाभेणें नर । पळतां लोकलोकांतर । निर्भय थार न पावे ॥४३॥देवकी म्हणे अनादि आद्या । अकस्मात विश्ववंद्या । प्राप्त झाला चरणारविंदा । श्रीमुकुंदा महद्भाग्यें ॥४४॥तंव तूं परेहूनि परता । प्रधान चेष्टे तुझिया सत्ता । काळ पळाला देखोनि भक्तां । तूं नियंता काळाचा ॥५४५॥भक्त हरिचरणीं प्रेमळ । तेणें नेणती काळवेळ । मग काळचि होऊनि कृपाळ । करी सांभाळ भक्तांचा ॥४६॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP