मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| श्लोक ३६ ते ४५ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - श्लोक ३६ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४५ Translation - भाषांतर एवं वा तप्यतोस्तीव्रं तपः परमदुष्करम् । दिव्यवर्षसहस्राणि द्वादशेयुर्मदात्मनोः ॥३६॥ऐशी तपश्चर्या तीव्र । दोघें आचरलां एकाग्र । ऐसा नाहीं ऐकिला धीर । पुढें होणार असे ना ॥१८॥तपश्चर्येच्या संकटीं । ब्रह्मादिकांही दुर्लभ भेटी । तो मी तुमचिया तपःसंतुष्टीं । हर्षें पोटीं तुष्टलों ॥१९॥बारा सहस्र वर्षें पूर्ण । तीव्र तपाचें आचरण । काया वाचा अंतःकरण । मत्परायण दंपती ॥६२०॥तदा वां परितुष्टोऽहममुना वपुषानघे । तपसा श्रद्धया नित्यं भक्त्या च हृदि भावितः ॥३७॥तुम्हां दंपतीच्या तपोत्कर्षें । मी तुष्टलों प्रेमविशेषें । श्रद्धा म्हणजे दृढविश्वासें । नित्य मानसें भावितां ॥२१॥अहो देवकी निष्पापे । तये काळींही याचि रूपें । उभयतांच्या कृतसंकल्पें । अभीष्टकाम द्यावया ॥२२॥प्रादुरासं वरदराड्युवयोः कामदित्सया । व्रियतां वर इत्युक्ते मादृशो वां वृतः सुतः ॥३८॥जो मी सकल वरदां वरद । तुम्हां तुष्टलों गोविंद । मागा म्हणोनि बोलतां शब्द । तुम्हीं अनुवाद हा केला ॥२३॥तुजसारिखा पुत्र व्हावा । म्हणोनि मागितलें जेव्हां । धुंडितां ब्रह्मांडीं आघवा । साम्य स्वभावा मी मज ॥२४॥अजुष्टग्राम्यविषयावनपत्यौ च दंपती । न वव्राथेऽपवर्गं मे मोहितौ देवमायया ॥३९॥तुम्हीं तपश्चर्या केली वरिष्ठ । परंतु दैवी माया हे दुर्घट । तिनें मोहितां भुललां वाट । झालां विनट प्रपंचीं ॥६२५॥नव्हते भोगिले ग्राम्य विषय । विदित नव्हताचि व्यवाय । अनपत्य जितेंद्रिय । मदाश्रय वांच्छिला ॥२६॥म्हणोनि प्रसन्नतेचिये वेळे । कैवल्य मागावें हें न कळे । दैवीमायामोहपटळें । केलें आंधळें तुम्हांसी ॥२७॥मजसारिखा वरद विभु । आणि तुम्हांसी पुत्रममतालोभु । नाहीं इच्छिला अपवर्गलाभु । जो दुर्लभु सुरनरां ॥२८॥तुम्हांसि न कळे आत्महित । परी मी सर्वज्ञ करुणावंत । तुमचे पुरवूनि मनोरथ । अपवर्गार्थ तुष्टलों ॥२९॥उदंड असती वरदानी । परी मी वरदांचा मुकुटमणि । यालागीं वरदराट् या अंभिधानीं । सनकादि मुनि मज गाती ॥६३०॥इतर तरूंची शीतळ छायी । तैसाचि कल्पतरु काये । जो कां कामनेची नवाई । बैसले ठायीं पुरविता ॥३१॥मीही कल्पनामात्रचि देता । तेव्हां सुरतरूचीच साम्यता । लज्जा वाटे हें भावितां । मी निजभक्तहिता प्रवर्तें ॥३२॥भक्तीं कामिला जो अर्थ । तो पुरवूनि मनोरथ । ओपीं चौथाही पुरुषार्थ । त्यांचा स्वार्थ मी वाहें ॥३३॥जरी निजहित न कळे बाळा । परी तो माउलीसि कळवळा । तेंवि स्वभक्तांची जीवनकळा । मज गोपाळा पोखणें ॥३४॥तुजसारिखा व्हावा पुत्र । यया वरासि झाला पात्र । मग म्यां म्हणोनि तथास्तु मात्र । केलें चरित्र तें ऐक ॥६३५॥गते मयि युवां लब्ध्वा वरं मत्सदृशं सुतम् । ग्राम्यान्भोगानभुञ्जाथां युवां प्राप्तमनोरथौ ॥४०॥वर देऊनि गेलिया मज । विध्युक्तविषयीं झालां सज्ज । वरदासारिखा आत्मज । मी अधोक्षज जाहलों ॥३६॥तुमचे पुरले मनोरथ । तेणें सर्वदा स्वानंदभरित । काया वाचा आणि चित्त । भजनीं निरत सप्रेमें ॥३७॥अदृष्ट्वान्यतमं लोके शीलौदार्यगुणैः समम् । अहं सुतो वामभवं पृश्निगर्भ इति श्रुतः ॥४१॥मज समान मागतां सुत । म्यां शोधिलें त्रिभुवनांत । शील औदार्यगुणीं युक्त । कोणी न पवत तुलनेतें ॥३८॥लत्ता हृदयीं दे ब्राह्मण । तेंचि मिरवीं मी भूषण । ऐसा दुजा क्षमस्वी कोण । जो साहे अवगुण गुणत्वें ॥३९॥प्रर्हादाचिया वचनासाठीं । मी प्रकटलों कोरडे काष्ठीं । ऐसा कळवळी परसंकटीं । दुजा सृष्टीं कोण पां ॥६४०॥घेऊनि भक्तांचा कैवार । झालों मत्स्य कूर्म सूकर । कोणी न साहे न्यून उत्तर । योनीं नीचतर जन्मलों मी ॥४१॥सांडूनि विश्वश्रीवैभव । पावलों भिक्षेचें लाघव । भक्तां अधीन करूनि जीव । त्यांचें सेवकत्व स्वीकेलें ॥४२॥पितृभाषपाळणासाठीं । राज्य त्यजिलें उठाउठीं । एवं शीलौदार्य गुणाची साठीं । नाहीं सृष्टीं मज साम्य ॥४३॥तेव्हां पूर्ण जो भगवंत । तो मी झालों तुमचा सुत । पृश्निगर्भनामें विख्यात । वर कृतार्थ व्हावया ॥४४॥तयोर्वां पुनरेवाहमदित्यामास कश्यपात् । उपेन्द्र इति विख्यातो वामनत्वाच्च वामनः ॥४२॥पुढें त्रेतायुगीं तुम्हीच दोघें । कश्यपादिति झालां ओघें । तोचि हा मी त्या प्रसंगें । झालों निजांगें वामन ॥६४५॥पूर्व वराच्या उत्तीर्णा । व्हावया तुमचे पोटीं जाणा । जन्मोनि सुरांच्या रक्षणा । बलिबंधना म्यां केलें ॥४६॥आधींच तुमचे पोटीं होतां इंद्र । त्यातें उच्छेदितां दैत्येंद्र । मग वामनत्वें म्यां उपेंद्र । होऊनि सुरेंद्र स्थापिला ॥४७॥देव दैत्य आणि ऋषि । पहातां समस्तही सभेसी । निगमागमें भार्गवासी । म्यां निमेषार्धेंशीं भुलविलें ॥४८॥गुणगौरवें दाऊनि महिमा । पुत्रत्वें धन्य म्हणविलें तुम्हां । तोचि मी या तृतीय जन्मा - । पासूनि तुम्हां पावलों ॥४९॥तृतीयेऽस्मिन् भवेऽहं वै तेनैव वपुषाथ वाम् । जातो भूयस्तयोरेव सत्यं मे व्याहृतं सति ॥४३॥तुम्ही वसुदेव देवकी । होऊनि जन्मला इहलोकीं । तुम्हां व्हावया ठाउकी । गोष्टी मम मुखीं निघाली हे ॥६५०॥एवं माझें प्रभाषित । अन्यथा नाहीं सत्य सत्य । तुज कळावें हें इत्थंभूत । साध्वी इत्यर्थ वदलों हा ॥५१॥एतद्वां दर्शितं रूपं प्राग्जन्मस्मरणाय मे । नान्यथा मद्भवं ज्ञानं मर्त्यलिङ्गेन जायते ॥४४॥तुम्ही दोघें पूर्व जन्मीं । पृश्नि सुतपा इहीं नामीं । येणेंचि रूपें तेथें पैं मी । तुम्हां प्रसन्न जाहलों ॥५२॥तें या पूर्वजन्मस्मरणासाठीं । म्यां हें निजरूप दाविलें दृष्टी । मानवी बालत्वें जन्मतों पोटीं । तैं तुम्हां हे गोठी नुमजती ॥५३॥आतां प्रार्थनापरामर्ष । जें त्वां प्रार्थिलें विशेष । ऐक तयाचा विन्यास । सावकाश जननीये ॥५४॥हें रूप न दाखवीं कोणां । ऐशी तुवां केली प्रार्थना । तई तुज पूर्वजन्मस्मरणा । वरदखुणा दाविलें ॥६५५॥या रूपाचे अनधिकारी । त्यांसि न दाखवीं निर्धारीं । यावरी विज्ञापना दुसरी । तेही सुंदरी ऐकावी ॥५६॥येणें रूपें पुत्र म्हणवितां । मी पावेन उपहास्यता । जाणोनि तुझिया मनोगता । बाळक आतां होईन मी ॥५७॥शरण आलें त्राहें म्हणसी । तरी तूं ऐके इयेविशीं । जन्मत्रयातें ओळखिसी । मियां तुजपाशीं सांगितलें ॥५८॥पूर्वींच मागतां निर्वाण । तरी तेव्हांच पावतां कैवल्यसदन । तुम्ही दैवमाया ठकलां जाण । परी मी स्वशरण नुपेक्षीं ॥५९॥आतां तुम्हीं भजावें मातें । भजनें पावाल कैवल्यातें । याचिलागीं निजरूपातें म्यां तुम्हांतें दाविलें ॥६६०॥एथूनि तुमच्या मनोगता - । सारिखा बाळचि झालों आतां । तरी जाणोनि या वृत्तांता । तुम्हीं तत्त्वतां भजावें ॥६१॥युवां मां पुत्रभावेन ब्रह्मभावेन चासकृत् । चिन्तयन्तौ क्रुतस्नेहौ यास्येथे मद्गतिं पराम् ॥४५॥जरी भजाल पुत्रभावें । तरी भजनचि तें आघवें । याचिसाठीं केलें ठावें । वर्म आघवें तुम्हांसी ॥६२॥अथवा हेचि धरूनि खूण । कराल ब्रह्मभावें चिंतन । तरी माझिये परमगतीचें स्थान । कैवल्यसदन पावाल ॥६३॥प्रसन्न झालिया जगदीश्वर । न चुके जन्मजन्मांतर । येचि लज्जेनें त्रिवार । झालों कुमर मी तुमचा ॥६४॥आतां माझें दिव्यदर्शन । होतां तुम्हांसि झालें ज्ञान । तेणें केलें माझें स्तवन । जें पढणें निर्वाणदायक ॥६६५॥एथूनि जन्मजन्मांतरें । तुमचीं खंडलीं निर्धारें । मियां एकें झालेनि कुमारें । काय अपुरें तुम्हांसी ॥६६॥आणीक तुझी विनवणी । जें तुझें जन्म माझे सदनीं । दुरात्मया कंसालागोनि । चक्रपाणि न कळों दे ॥६७॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP