मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| श्लोक ४ ते ७ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - श्लोक ४ ते ७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४ ते ७ Translation - भाषांतर ववौ वायुः सुखस्पर्शः पुण्यगन्धवहः शुचिः । अग्नयश्च द्विजातीनां शान्तास्तत्र समिन्धत ॥४॥वायु सर्वशरीरवासी । जो चाळक शरीरासी । सम विषम होतां त्यासी । महारोगासि उपजवी ॥८७॥वायु त्वगिंद्रियाचा अभिमान । त्याचेनि त्वचेसि स्पर्शज्ञान । तो वायु होतां न्यूनपूर्ण । मग सुखस्पर्श ॥८८॥वातपित्तें तनु तापे । वातवातें तनु कांपे । वातशैत्याच्या प्रकोपें । सर्वांग खुपे तिडकांहीं ॥८९॥जाणोनि हरीचा जन्मकाल । सुखस्पर्श वाहे अनिळ । अरोग होऊनि ब्रह्मांडगोळ । सुखकल्लोळ भोगितसे ॥९०॥हें अंतर्वायूचें लक्षण । बाह्यवायु त्रिविध जाण । एथें होऊनि सावधान । विचक्षण परिसोत ॥९१॥ताप वारूनि सुखशीळ । म्हणोनि म्हणिजे सुशीतळ । तैसाचि पवित्र यज्ञानिळ । पुष्पानिळ सुगंध ॥९२॥गंगातरंगसंभूत । पवन प्राणियां स्पर्शत । पाप अकल्प निर्धूत । अपार सुकृत तत्स्पर्शें ॥९३॥तुळसीवनें पंकजवनें । देवागारें यज्ञसदनें । वैष्णवभुवनें हरिकीर्तनें । त्या त्या पवनें स्पर्शिजे ॥९४॥विप्रधेनूंचिया वसति । तीर्थें क्षेत्रें शुभवृत्ति । इत्यादिकांची मारुतगति । पुण्योत्पत्तिकारक ॥९५॥जाणोनि हरीचा जन्मकाळ । शुचि सुगंध सुशीतळ । पुष्पवर्धक मंदानिळ । सुखसुकाळ प्रवाहे ॥९६॥अग्नि सर्वांचिये शरीरीं । दीपनशोषणपचनाचारीं । यथानुकूळ निर्विकारी । सुखाची करी अभिवृद्धि ॥९७॥तें द्विजा तीचें अग्नित्रय । सुप्रसन्न तेजोमय । स्वर्णप्रभा कल्याणविजय । लोकत्रय उजळिती ॥९८॥सम्यक् म्हणजे बरव्या परी । सुप्रसन्न अभ्यंतरीं । व्यक्तिसमष्टीमाझारीं । आनंदकारी प्रकटला ॥९९॥मनांच्यासन्प्रसन्नानि साधूनामसुरद्रुहाम् । जायमानेऽजने त्स्मिन्नेदुर्दुन्दुभयो दिवि ॥५॥जैं आसन्न प्रसूतिसमय । तेव्हां विश्व आनंदमय । तेचि समयींचा हा अन्वय । सर्व श्लोकीं वर्णिला ॥१००॥उपजणार जेव्हां हरि । तेव्हां समस्तही सुरवरीं । दुंदुभीच्या घोषगजरीं । परमोत्साह मांडिला ॥१॥सनकादिक ब्रह्मनिष्ठ । कपिलादिक सिद्ध श्रेष्ठ । यांच्या आत्मस्थिति स्पष्ट । तोष उत्कृष्ट पातल्या ॥२॥साधूंचीं सुप्रसन्न मनें । सांडिलीं त्रिगुणाच्या अभिमानें । वर्षोनि स्वानंदसुधाघनें । तीन्ही भुवनें निवविलीं ॥३॥वर्जूनि कंसादिकांचा मेळ । उरला अवघा ब्रह्मांडगोळ । संतुष्टमनें आनंद बहळ । भोगी केवळ ते समयीं ॥४॥जगुः किन्नरगन्धर्वास्तुष्टुवुः सिद्धचारणाः । विद्याधर्यश्च ननृतुरप्सरोभिः समं तदा ॥६॥परमानंदेंशीं निर्जर । दुंदुभिघोषें करिती गजर । गाती गंधर्व किन्नर । हर्षनिर्भर होऊनि ॥१०५॥सिद्ध चारण करिती स्तुति । विद्याधर नृत्य करिती । हावभाव लास्यरीति । नर्तविती चपलांगें ॥६॥अप्सरा नर्तकी नर्तक । विद्याधरादि तौर्यत्रिक । शांतिपाठ मंत्रघोक । महर्षींचा ते काळीं ॥७॥मुमुचुर्मुनयो देवाः सुमनांसि मुदान्विताः । मन्दं मन्दं जलधरा जगर्जुरनुसागरम् ॥७॥मंत्राक्षतांच्या वर्षोनि मुष्टी । मुनींच्या सप्रेम कृपादृष्टि । सुरवर करिती सुमनवृष्टि । सुखसंतुष्टि ते काळीं ॥८॥मेघमल्लरागमाळा । सिंधुगर्जना मृदंगताला । द्यावापृथिवी नर्तनशीला । दिग्मंडलासमवेत ॥९॥शेजे संप्राप्त प्राणनाथ । विरहिणी तोषें रोमांचित । तैही तृणादि वृक्षीं धरा समस्त । लसलसीत कोंभैली ॥११०॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP