मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| शंकर श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्रीकल्याणकृत पदें - शंकर ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण शंकर Translation - भाषांतर १. ( राग - शंकराभरण; ताल - दादरा ) चंद्रमौळी हर हर चंद्रमौळी ॥ध्रु.॥गळां रुंडमाळा । उर्ध्वपुंड्र ल्याला ॥१॥चिताभस्म अंगीं । जटाधारी जोगी ॥२॥त्रिशूळ डमरु हातीं । करी खापरी धरी ॥३॥शतकोटीचें बीज । जना सांगतों गुज ॥४॥ग्रंथशोधन करीतो । त्रैलोक्या वांटीतो ॥५॥व्याघ्रांबरधारी । वेष्टिला विखारीं ॥६॥निजनाम कल्याणकारी । निवाला अंतरीं ॥७॥२. ( राग - कानडा; ताल - त्रिवट ) हर हर हर हर सुखधामा । योगींद्र सुंदर जितकामा ।सज्जनमुनिजनविश्रामा । रघुविरमानस आरामा ॥ध्रु.॥सुरवरमंडन शूळपाणी । पिनाकपाणी शुभवाणी ।अगणित महिमा पुराणीं । प्रतापसिंधु गुणखाणी ॥१॥गजमुख षण्मुख निज ताता । स्मरहर भवहर भवत्राता ।परतरपावन पददाता । भोळा शंकर हर म्हणतां ॥२॥काशायअंबर निशाणी । दितीकुळकंदन घमशानी ।अखंड राहे स्मशानीं । कविवर म्हणती ईशानी ॥३॥गिरिजावर गुरु सुखरासी । जनवनपावन पुण्या रासी ।स्मरतां कर्पुरगौरासी । कल्याणकर दासासी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP