मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| ओव्या संतमाळा श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्री कल्याण - ओव्या संतमाळा ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक १२८ वरून Translation - भाषांतर आत्मयारामाचा मुगुट सुभट । कारुण्यतेजें मुद्नल भट ।निवृत्ति सुरेख टिळा नीट । मुक्ताक्षता मुक्ताई ॥१॥आकर्णपूर्ण उभय नयन । भानु कूर्म अवलोकन ।नासीक सरळ सुंदर जाण । आचार्यस्वामी विराजे ॥२॥मुखारविंदीं आनंद । तो चि शोभे रामानंद ।नामया ज्ञानी कर्ण प्रसिद्ध । वाचा नरसिंहसरस्वती ॥३॥कुंडलें तळपती मकराकार । मुकुंदराज मुक्तेश्वर ।कुंठी शोभती सुमनहार । कबीर जसवंत तुळशीचे ॥४॥उभय कुचाचें स्थान परम । नारायण आणि अच्युताश्रम ।मन वाचन विश्राम । आत्मा रामदासस्वामी ॥५॥आजानुबाहो लंबायमान । सालया येकाजनार्दन ।वीरकंक ण विराजमान । कृष्णदास केशवाचे ॥६॥धनाजाठ तो धनुष्यभावा । अमोघ तुणीर तुकावा ।कृष्णयाज्ञवल्की जाणवा । यज्ञोपवीत हदईचें ॥७॥नाभी मिराई सधर । कटिसूत्र तो सोनार ।पीतांबर दासोदिगंबर । शांतिवसन तो जयराम ॥८॥ऐसी साधुरूपें आनंदमूर्ती । शोभला दिसे अद्बयभक्ती ।विमळ रंग तनु । प्राप्ती । रंगमूर्ती विराजे ॥९॥चरणी ब्रीदांचा घोष । सुरदास आणि रोहिदास ।उभय पाउलें विशेष । कल्याण आणि दत्तात्रय ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP