मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| सोलीव सुख श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्री कल्याण - सोलीव सुख ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक २३५ वरून Translation - भाषांतर ॥ श्रीरामसमर्थ ॥जय जय जी सद्गुरुवर्या । पूर्ण ब्रह्म प्रतापसूर्या ।तुज नामो जी आचार्य । करुणासिंधु ॥१॥जे भवसमुद्रीं पोळले । विषयमदें अंध जाले ।चौर्यासींत वाहूं लागले । मार्ग सुचेना तयासी ॥२॥ऐसें¹ विश्व बहुत बुडालें । मी जीव म्हणोनी धाऊं लागलें ।मुळीचें स्मरण विसरलें । मी कोण ऐसें ॥३॥तयासी मुक्त कराव्या पूर्ण । तूं बा उतरलासी ज्ञानघन ।रोगिया औषधी देऊन । भवमोचन करसील ॥४॥ऐसें औदार्य तुझें सघन । म्हणोनी आलों मी शरण ।दयार्णवा कृपा करून । मज दातारें तारावें ॥५॥आपण आपणातें पावें । ऐसें माझे मनीं बोलावें ।तें दातारें गोचर करावें । रोकडें ब्रह्म ॥६॥ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी । ज्ञानाचें भरतें आलें स्वामीलागोनी ।आसन सोडूनिया तये क्षणीं । कडकडोनी भेटले ॥७॥रे बाळका ऐक निर्धार । तुझा प्रश्न तो वाग्दोर ।माझे कंठीं बैसला साचार । बरें घेई निज वस्तु ॥८॥मग स्नेहाळें नवल केलें वोसंगा सत् शिष्या घेतलें ।अर्ध मात्रा रस काढिले । पूर्ण फुंकिले कर्णरंध्रीं ॥९॥खडतर औषधी दिव्य रसायन । नयनीं झोंबलें जाऊन ।डोळियाचा डोळा फोडून । चित्सूर्य भेदिले ॥१०॥पूर्ण अंश गगनीं भेदिला । अर्क तो पिंडीमाजीं उतरला ।त्रिकुट श्रियाट चुराट केला । सेखीं भरला गगनगर्भीं ॥११॥उग्र तेज लखलखाट । तेणें जाला चौदेहाचा आट ।भ्रांती पडली बळकत । तेव्हां बाळ निचेष्टित पडे ॥१२॥ऐसें पाहोनि सद्रुरुनाथ । पद्महस्त मस्तकीं ठेवीत ।वत्सा सावध त्वरित । निज रूप पहा आपुलें ॥१३॥जागृत करूनि ते वेळीं । अजपाची दोरी देउनी जवळी ।निहंगम डोल्हारी डाये वेळीं । आलक्षें लक्षीं बैसविलें ॥१४॥धैर्याचें आसन बळकट । आणी इंद्रियें वोढुनी सधट ।धरी ऊर्ध्व पंथें वाट नीट । अथळ पदीं लक्ष लावी ॥१५॥पुढें करूनीया जाणीव । मागें सारोनि नेणीव ॥जे जे जाणीव अभिनव । ते तूं नव्हेसी तत्वता ॥१६॥तै मार्गाचा करू नादाची नवाळी ।दुसरी किंकिणीची मोवाळी । तिसरी अनुहत कोल्हाल ॥१७॥आतां अग्रीं लक्ष लावी । काय दिसेल तें न्याहाळी ।चंद्रज्योती प्रकाशली । विभु बांधिला बळकट ॥१८॥तें सुख अंतरीं घेउनी । पुढे चालू करी संगमीं ।तेथें विजुऐशा कामिनी । चमकताती३ सुवर्णरंग ॥१९॥ते ही जाणोनि माघे सारी । पुढें सूर्यबिंब अवधारी ।ज्वाळा निघती परोपरी । दंडळूं नको कल्पांतीं ॥२०॥वायोमुख करोनी तेथें । गिळी वेगीम सूर्यकिरणातें ।मग देखसी आनंदमार्तंडातें । तेजोमय यमपुत्रा ॥२१॥अनंत भानु तेज अद्भुत । खदिरांगार ज्वाळा उसळत ।धारिष्ट तेथें न निभत । दुर्घत विभू तेथींचा ॥२२॥तेथें हुषारीचें काम । अग्रीं लक्ष घालून नेम ।तीर लाऊन सुगम । मागें सारी सूर्यातें ॥२३॥पुढें दिसेल जें नवल । तें पाही हंसमेळ ।चंद्रकिरण सीतळ । पहासी मम वत्सा ॥२४॥तेव्हां मागील दाह शमेल । सीतळाई सर्वांग होईल ।चंद्राची प्रभा सुढाळ । फडफडीत चांदणें ॥२५॥तो चि डोळियाचा डोळा पाही । देहातीत वर्म विदेही ।चिन्मयसुखाची नवाई । भोगीं आपुली कीं गा ॥२६॥अनुभवाची सीग भरली । अग्रापरी उसळली ।भूमंडळी प्रभा पडली । कूर्परवर्ण नभ जालें ॥२७॥तया मध्यभागीं सघन । अढळ पद दैदिप्यमान ।उर्वरीत ब्रह्म जाण । धृव बैसला अढळते ॥२८॥तें तुझें स्वरूप नेटें बोटें । जेथें समस्त जाणणें आटे ।ऐके जालासी धिटें३ । बळकटपणें बलाढय ॥२९॥ऐसें सुख योगिया लाधलें । तेव्हां देहाचें मरण गेलें ।सांगणें ऐकणें मुरालें । येकत्वपणें येक ची ॥३०॥शांती येवोनि माळ घाली । अलक्ष सेजे निजली ।हंसपदीं ऐक्य जाली । सुख सुखाते निमग्र ॥३१॥तेथील अनुभव घेउनी । स्वानुभव पाहे कलटुनी ।आला मार्ग ते क्षणीं । दिसेनासा जाल कीं ॥३२॥त्रिकुट श्रियाट गोलाट । बुडाले ते औटपीटईडा पिंगला सुषुम्नातट । विराले ते स्वात्मसुखें ॥३३॥स्थूळ सूक्ष्म कारण । नेणो काय जालें महाकारण ।इंद्रियें चुबकली जाण । धांव मोडली तयाची ॥३४॥पंचभूताचे खवळले तयाचे ठाव चि पुसिले ।अपरमित आनंदिले । निमग्र जाले सुखांत ॥३५॥सखोल भूमिके ऐसे जालें । सुख सुखासी घोटलें ।स्वयें आत्मत्व प्रगटलें । माझे देहीं रोकडे ॥३६॥मग सहज समाधी जिरउन । शिष्य उठिला घाबिरा होउन ।हें सुद्गुरुचें देणें । काय उत्तीर्ण मी व्हावें ॥३७॥जरी स्तुती त्याची करावी । तरी माझी मति नाहीं बरवी ।अनिर्वाच्य गती बोलावी । परा वाचा खुंटत ॥३८॥आतां मी जी लडिवाळपणें । तुमचे कृपेनें करितों स्तवन ।सूर्यापुढें खद्योत जाण । तैशापरी बोल हे ॥३९॥जय जया जी करुणासिंधु । जय जया जी भवरोगवैदु ।जय जया जी बाळबोधु । कृपाघना समर्था ॥४०॥जय जया जी अविनाशा । जय जय जी परेशा ।जय जया जी अध्यक्षा । दयार्णवा ॥४१॥जय जया जी पूर्णचंद्रा । जय जया जी अलक्षविहारा।जय जया जी भवसमुद्रभास्करा । आनंदप्रभु ॥४२॥तुझी स्तुती करिता सांग । वेद स्तुति जाले अव्यंग ।तेथें प्राकृत मी काग । वर्णावया योग्य नव्हे ॥४३॥कल्याण म्हणे जी रामदासा । माझा मुकेपणाचा ठसा ।ते मोडुनी वसोसा । मज आपणाऐसें केलें ॥४४॥ऐकोनी मृदु वचन । कुरवाळिले तयालागोन ।गुरुशिष्य हें बोलणें । उरलें नाहीं ते वेळीं ॥४५॥येकपणें येक चि जालें । ऐक्यरूपी सम मिळालें ।करुनिया सुख उसळलें । नाहींपण जाउनी ॥४६॥सुगरणीचा पाक जाला । नभा भाजनीं वाढिला ।अक्षय पदीं सुगरावला । संत जेविती स्वानंदें ॥४७॥अनिर्वाच्य बोल बोलिले । साधकाचे उपेगा आले ।सिद्धांतरीं डोलों लागले । बद्ध मुमुक्ष होताती ॥४८॥या परतें आन नाहीं बोलनें । श्रीराम दाशरथीची आण ।येकपत्नी तो सुजाण । आपलें पद दे दासा ॥४९॥इति श्री दासबोध ग्रंथ । त्यांतील हा सोलीव अर्थ ।श्रोते ऐकतां यथार्थ । समाधिस्त होती ॥५०॥॥ समास ॥ १ ॥ श्रीराम ॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP