मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| ध्रुवाख्यान श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्री कल्याण - ध्रुवाख्यान ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक १२२ वरून Translation - भाषांतर धृवाची कथा सत्पथा मोक्ष दावी । शुकें जी मुखें सेविली ते वदावी ।रवी भूप जो दीप उत्तान साचा । तपोधीर्य जो सूर्य सत्कीर्ति साचा ॥१॥सुरति सुनति दोघी राजभार्या प्रसिद्धा । सवतिपण इसाळे चालती पूर्ण स्पर्धा ।सुत उभय तयांचे थोर लावण्यखाणी । विषमसम नरेंद्रू बैसवी जानु दोनी ॥२॥कसे बाळ तेजाळ लावण्यखाणी । मुखें बोलवी राव तो रम्यवाणी ।म्हणे जन्ननी श्रेष्ठ कां त्यास मानी । मनीं खेद अत्यंत मानीत हाणी ॥३॥क्रिडत जाय कुमार स्वमंदिरीं । जननी लोणमुखेंदु सुखादरी ।स्वनयनी धरू२ पाहतसे जसें । दुडदुडा धरिलें करि राजसें ॥४॥कठिण शब्द अयुक्त चि मांडिलें । पदलते उदरावरि ताडिले ।न रडतो शिशुराज शिरोमणी । नमनरूप पुसे मग जन्ननी ॥५॥मातें काये निमित्य ताडणपदा श्लोकाक्षराच्या पदा ।कैचें रे हतभाग्य तूं पद तुला या अंगिकारी पदा ।यातें प्राप्तमतें किमर्थ न घडे ऐसे पुसे जन्ननी।पूर्वी क्लेश विशेष भोगित पदें देवाचिये अर्चनीं ॥६॥जावें घोर अरण्य दुर्घट दरी कीं पर्वती कर्मरी ।निर्वाणीं त्यजि प्राण हा मग पदा देईल तो श्रीहरी।सत्रासें जननी छळी मग निघे माता नमस्कारुनी ।सन्मार्गे चि प्रबोधिलें जननिये तूं धन्य हो या जनीं ॥७॥पुसेना स्वमाये निघे काननासी । दिसेना पुढें मार्ग नेत्रांबुजासी ।पथीं थोर आरण्य पुक्लाक सीळा । पडे तो रडे चिंतितो मेघनीळा ॥८॥रडत राजशिशू अनवाणी । स्मरतसे स्मर पूर्वजवाणी ।वनचरें गज व्याघ्र किकाटती । निबिड रात्र सिंह्यादिक गर्जती ॥९॥गगनिं देवऋषी हरि गातसे । नभगती सुख तन्मय जातसे ।स्मरण बाळ स्वकीर्तनिं ऐकतां । परम तोष शिशूवर वंदिता ॥१०॥स्वकीय तो पुसतां चि वदे तया । भजन आत्मसुखें न वदे तया ।हरि तुला तरि भेटवितो मुला । म्हणत जात असे प्रूभच्या स्थळा ॥११॥सहस्राक्षें तेव्हाम जननिरुप घेऊनि जवली ।वळी नाना बुद्धी परि ह्लदयिं त्याते न कळवी ।म्हणे ये वेल्हाळा तुजविण बहू शीण मजला ।झरे पान्हा कां पां कठिणपण हें आजि तुजला ॥१२॥हरी नाना विघ्न अचळ स्मरणीं दास रमती ।तमी नाना ऐसा सुरपति करी थोर कुमती ।कथा वार्ता साधू दिनजनकृपाळा झडकरी ।करा साह्ये आतां स्मरण करितें बाळ निकुरी ॥१३॥निरोपेत ब्रह्मात्मज धांवताहे । अकस्मात येऊनि संमोखिताहे ।पदारूढ निर्द्बंद कल्याण वाचा । वसे तो चिरंजीव जो सूर्य साचा ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP