मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| मारुती श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्रीकल्याणकृत पदें - मारुती ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण मारुती Translation - भाषांतर १. ( चाल - देव पावला रे ) भीमराया रे सखया भीमराया रे ।राघवप्रिय सकळावर्या वारीं मम माया ॥ध्रु.॥तनु सुकुमारा कामा मारा केला कपिवीरा । वायोकुमरा संकटहारा पावे उदारा ॥१॥तूं रणधीरा गुणगंभीरा दडिसी असुरा । रजनीचरा दशमुखनिकुरा मारिसी बनकरा ॥२॥भुमिजा शोधूनि सिंधू लंघुनी भेटसि बलभीमा ।अठरा पद्में आनंद जाला मानिसी विश्रामा ॥३॥जयजयकार सकळहि गर्जति भेटति श्रीरामा ।मारुति श्रीगुरु कल्याणांकित पदप्रेमा ॥४॥२. ( चाल - मांडूं खेळ जगामाजीं ) प्रताप वदला रे वदला न वचे कोणा रे ॥ध्रु.॥राघवशुद्धि जाऊनि बुद्धि मगरीसुतवरदानी ।राक्षस मारुनि दधिनिधि लंघुनि महिकावति ये सदनीं ॥१॥नाटकरूपी शक्तिस्वरूपी आपनचि होउनि ठेला ।गोंधळ घालुनि राघव आणुनि बंदविमोचन केला ॥२॥महिविर मर्दुनि भूपा रगडुनि चरणीं पिष्टचि केला ।तडफड तडफड राक्षस मेला नगरलोक हडबडिला ॥३॥लत्ताप्रहारें कपाट फोडुनि बाहेर राम विराजे ।पळा पळा रे हनुमान आला अद्भुत बोंब गाजे ॥४॥राक्षसवरदी शोधुनि हरदी अळिकुळ मारित आला ।अहिरावण तो बाणीं जाळूनि राघव विजयी जाला ॥५॥अहिमहि मारुनि वानर घेउनि मारुति रघुपति आले ।बिभिषण सुग्रिव तल्लीन होउनि कल्याण प्रेमें भरलें ॥६॥३. ( चाल - सामर्थ्याचा. ) सुंदर कर्कशरूपी । धगधग दिव्य स्वरूपी ।अद्भुत रुद्रप्रतापी । दानवदंडण पापी ॥१॥मंद्रातुल्य प्रतीमा । मुखारविंदीं उपमा ।निशिपती राजित महिमा । अतुळ न तुळे सीमा ॥२॥कांचनचिर लंगोटी । घंटा किंकिणी दाटी ।सामर्थ्याच्या कोटी । रुळती चरणांगुष्ठीं ॥३॥प्रगटत भुभुःकारें । राक्षस म्हणती बा रे ।कलिमल न थरे थारे । कल्याणहृदयस्था रे ॥४॥४. ( राग - भीमपलास; ताल - धुमाळी ) कैपक्षी भीमराया । निगमांतर विवराया ।ब्रह्मानंद वराया । चंचळ मन आवराया ॥१॥संकट दुष्ट हराया । मारकुमार कराया ।गुरुपदरेणु धराया । भाविक जन उद्धराया ॥२॥रघुपतिचा कैवारी । दुर्घट विघ्न निवारी ।भजन पुजन मंदवारीं । कल्याणजनहितकारी ॥३॥५. ( राग - खमाज; ताल - धुमाळी ) अहो जी बलभीमा बलभीमा ॥ध्रु.॥भक्तजनांतें निरवुनि त्यातें । स्वामी गेले निजधामा ॥१॥रामदासाचा कैवारी साचा । तुजविण कोण आम्हां ॥२॥करुणाकरा दीनोद्धारा । कल्याणकारी सुखधामा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP