मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| शुक आख्यान श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्री कल्याण - शुक आख्यान ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक ५२ वरून Translation - भाषांतर महा घोर आरण्य तारुण्यकाळीं । शुकें साहिलें पाहिलें पर्वकाळीं ।जना गम्य तें रम्य नाना प्रकारीं । वनीं तो मुनी राहिला निर्विकारी ॥१॥करी स्नानसंध्या विधीयुक्त नेमीं । सदा सर्वदा आवडी नित्य नेमीं ।क्षुधा रक्षणें भक्षणें मूळकंदें । मुनीराज तो जाणिजेतो मुकुंदें ॥२॥पहा वेद३ तो वर्णितो ज्या शुकासी । इती ते किती तूकती ना तुकासी ।पुरश्चर्ण आच्यर्ण सामर्थ्य सिंधू । ऋषीमाजि तो अग्रपूजे विबूधू ॥३॥शचीचा पती वीपतीलगि धाके । वदे इंद्र रंभेसि ते ते राख राखे ।दिसे स्पष्ट आरिष्ट माझ्या सुखासी । त्वरें सत्वरा बांध पाशीं शुकासी५ ॥४॥क्षीराब्धीसुता बोलिली राजयासी । क्षणामाजि जिंकोनि येतें तयासी ।रतीचा पती संपती यौवनेंसी । ब्रिदें घातलीं पातलीं त्या वनासी ॥५॥ठकू ठामके ठाण मांडी ठकारी । महा रम्य लावण्य नाना विकारी ।बरा सार वीचार केला मनासी । म्हणे शूक हे आमुचा धर्म नाशी ॥६॥वसंती भल्या फूलल्या पुष्पजाती । वनीं सूमनी भृंग भोगार्थ जाती ।तथा तारुणी यौवनी संग भोगी । जगीम धन्य रे धन्य तो राजयोगी ॥७॥भतें पिंड ब्रह्मांड वाक्यार्थ पाहे । तदाकार आकार मूळीं न साहे ।गुरूभक्त नीवेदनीं संग त्यागी । जगीं धन्य रे तो मुख्य योगी ॥८॥कुची वर्तुळा रत्नमाळा१ उमाळा । फुलें हार हे मे ल चमेलमाळा ।सुरत भोग संभोग नेणोनि ज्याला । वृक्षा पुष्ट तो जन्मला जीत मेला ॥९॥अशौची क्रिमी जंतु शंका दुर्गंधी। म्हणोनी जनीं लिंपिताती सुगंधी।महा नर्क तो मूर्ख भोगी भगाला । वृक्षा पुष्ट तो जन्मला जीत मेला ॥१०॥महा सुंदरी ऊदरीम शस्त्र घाली । विदारी दरी मूळ विद्या निघाली ।जवादी चुवा गंध सूगंधनाभा । गमे ते रमेतुल्य चातुर्यरभा ॥११॥कुशी द्वादसी वर्षवासी कुवासी । म्हणे शूक मी कष्टलों गर्भवासीं ।तुझ्या ऊदरीं जन्मतो पुण्यरासी । तरी पावतो सूखसंतोषराशी ॥१२॥दधीजा म्हणे कोण आश्चर्य मोठें । चमत्कारिली चाविलीं युग्मबोटें ।पुढें पाहतां चंद्रजोती विझाली । तयाचे परी दृश्य अदृश्य जाली ॥१३॥चळे मेरुमांदार जीच्या प्रतापें । चळे चंद्र तारा ज्वरें सूर्प कांपे५ ।चळे सागरू आगरू लोणखाणी । चळेना शुकेंद्रू महा योग ठाणीं ॥१४॥रिपू षष्ट जिंकी असा कोण साधू । जनीं शब्द वाचाळ बोध प्रबोधू ।वृक्षा भांडती निंदिती येकमेकां । भरा दुर्भरा कारणें शिष्यशाखा ॥१५॥सहस्रामर्ध्ये वीरुळा येक संतू । गिता तत्त्वता वाक्य बोले सतंतू ।पहा गुप्त चिंतामणी हेमखाणी । आव्हांवेल कल्पतरूची सिरानी ॥१६॥नसे कामधेनू खडाणे उदंडें । महीमंडळीं माजलीं थोर बंडें ।असो बोलतां बोलतां शीण होतो । प्रभू रामचंद्राविणें काळ जातो ॥१७॥गुरूची दया ऊदया सीघ्र पावे । तरी अंतरीं विभ्रमानंद फावे ।नसे वैर निर्वैरता आत्मदृष्टी । जगीं धन्य तो धन्य कल्याण सृष्टी ॥१८॥इति श्री शुकआख्याननिरुपणं समाप्तमस्तु ॥ Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP