मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| श्री कल्याणकृत अष्टपदी श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्री कल्याणकृत अष्टपदी ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक २५४ वरून Translation - भाषांतर अष्टपदी उच्चारा रा मा प ती त पा व ना ।आत्मारा म स्मरणभावे वारी यातना ।अखंड चित्तीं चिंतन जाल्या उन्मनी मना ।आनंदाचे ठाव रंगी नाहीं अनुमाना ॥ध्रु.॥राम नाम उफराटें पावे वाल्मिक उद्धारा ।राम३ नाम ध्यातां चि प्रचीत आली शंकरा ।राजीवेश दाविला सूर्यवंशी साजिरा ।राजित शरयूतीरा आले अयोध्यापुरा ॥१॥मागुनि विश्वामित्रें राया ऋषीच्या कामा ।मारुनि राक्षस बळिये सिद्धी पावविले होमा ।मार्गीं शिळा करुनी बाळा धाडी आश्रमा९ ।माहा विक्रमें पर्णुनि सीता आले निजधामा ॥१२॥पट्ट रामराज्याचा कैकै केला विक्षेप ।परदेशीं वनवासीं करनें लागलें तप ।परेश फणिवर सीता देवी लावण्यरूप ।पञ्चवटिके येउनि रावण हरी पापरूप ॥३॥तीकारणें उभयतां नाना वनें धुंडितीं ।तीव्र विरहानळ मानसीं लागली खंती ।तीगुणांपरता जो कवणा नेणवे गती ।तीर्थ६ वंदी कार्या कार्या कारण शिव हा मुकती ॥४॥तये अटव्यीं फीरत पंपा सरोवरा येत ।तत्काळिक सैन्येसीं सुग्रिव भेटे हनुमंत ।तये चि वेळीं रामें वाली केला नि:पात ।तीर्थ वंदी जो श्री राघव ऋष्यमूक पर्वत ॥५॥पाठविले हनुमंता सीता शुद्धी स्वरूपा ।पाहुनि माता भीम मोडी वनीं पादपा ।पाडुनि राक्षस बळिये जाळी लंकेच्या पडपा ।पाउनि वार्ता क्षेम सांगे अयोध्याभूपा ॥६॥वहिले सिंधू तरोनि टाकी सूवेळा ठाव ।वधिला रावण सहपरिवारीं विजयी राघव ।वधूसि अंकीं घेउनि स्थानीं स्थापीले देव ।वचन खरें करुनी आले अयोध्ये सर्व ॥७॥नाना सोहळे रामराज्या आनंदघना ।नागर चवघे बंधू माता सुख जालें जना ।नायकसहीत गौख केला बोळविली सेना ।नाना महोत्छाव जाला आनंद त्रिभुवना ॥८॥नाहीं संशय पाहातां रामदासाच्या दासा ।कृपाळू कल्याण जाणे भावें कोंवसा ।येश कीर्ती प्रताप महिमा प्रत्ययो ऐसा ।पूर्ण वर दीधला स्वामी रामदासा ॥९॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP