अभंग ३७

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - हमीर
चाल : “ लौकिकापुरती ”

नव्हे हे लिखाण लौकिकासाठीं ॥
या योगे नित्यमुखी राही जगजेठी ॥धृ॥
कैसीया परी नाम रहावे मुखांत ॥
हेच तत्त्व मनीं हरी, गावे गीत ॥१॥
कोणी करीती जपतप ध्यान ॥
कोणी करीती हरी कथा कीर्तन ॥२॥
जे जयाच्या आवडी घेती हरीनाम ॥
तैसे कृष्ण प्रेम आवडी गाईन नाम ॥३॥
वेडीवाकुडी शब्दपुष्पे करुनी एकत्र ॥
गुंफुनी माला दासी हरीचरणी अर्पित ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP