अभंग ११

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - मांडपहाडी
( चाल  : इथेच थारा )

मिटली जिवाची तळमळ आता ॥
भेटला माझा सखा विठ्ठल राजा ॥धृ॥
पाहुनी श्रीमुख जीव आनंदला ॥
प्रेमभरे मग भेटले हरीला ॥१॥
आनंदाश्रूचा नयनी पूर आला ॥
शब्द उमटेना कंठ दाटला ॥२॥
हरी जवळूनी मग पाय निघेना ॥
पुन्हा भेटेल कधी पंढरी राणा ॥३॥
अत्यादरें नमन करी हरीचरणा ॥
दासीचा जीवनाधार विठ्ठलराणा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP