अभंग ३४

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - भूप
चाल: “ आवडे हे रूप गोजिरेसगुण ”
पंढरपूर मुक्कामी शके १८८३
आषाढ शु. १३ ता. २६-६-६१

कोण जाणे केव्हां देवा होईल तुझी भेट ॥
कर ठेऊनी कटी उभा, पायातळी वीट ॥१॥
ऐसे रूप अखंड असे, ध्यानी मनी ॥
निरोप घेता तुझा देवा, आश्रु आले नयनी ॥२॥
कंठ आला दातुनी जाता माय तात सोडुनी ॥
स्थिरावले नयन रूपी, पाय उचलेना पुढती ॥३॥
ऐसी झाली जेव्हां गत, मन झाले दु:खित ॥
जाणुनिया प्रेम भावा, दासीवरी कृपा ठेवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP