अभंग २८

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - बसंत

बहुतकाळीं बहुरूपाने भुवरी अवतरलासी ॥
वेळोवेळीं संकटी साह्य केलें भक्तांसी ॥धृ॥
ऐसा तूं उदार राणा वैकुंठवासी ॥
भक्त हाकेसी निरंतर धाव तूं घेसी ॥१॥
भक्तांचा नाममहिमा तूंच वाढविसी ॥
कृपादृष्टी ठेऊनी त्यावर भक्तां उद्धरीसी ॥२॥
ऐसा तूं दयाळू देव त्रिभुवन निवासी ॥
तुझा महिमा नित्य गाई आवडीने दासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP