अभंग ८

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - शंकरा
चाल : प्रणती तुज शंकरा

देवा ऐसी राहो माझी वत्ती ॥
सतत ध्यास तुझा मम चित्ती ॥धृ॥
नयनीं अखंड तुझी मूर्ती ॥
नित्य तुझें नाम गावें गीती ॥१॥
दुजा विचार न येवो चित्तीं ॥
तूंची एक प्रभो रुक्मिणीपती ॥२॥
द्वैत भावनेची अन्यमती ॥
नको नको देवा कमळापती ॥३॥
ऐक्याची ही सुखप्राप्ती ॥
अखंड लाभो दासी प्रती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP