अभंग ६

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - घानी
चाल : अवघाची संसार

जीवाचा जिवलग सखा पांडुरंग
त्याचीये चरणी नमन साष्टांग ॥धृ॥
सगुण निर्गुण दोन्ही एकरुप ॥
भाग जैसा आपुला तैसे दावी रुप ॥१॥
हृदयाभितरीं पाहतां नित्य ॥
शामसुंदर श्रीहरी दिसेल सत्य ॥२॥
भावनिष्ठा पूर्ण ठेवा हरी पदीं ॥
साक्षात्कारे येईल मग प्रचीती ॥३॥
हा दासीचा अनुभव सांगते सत्य ॥
अनुभवें कळेल यांत मुळी न असत्य ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP