अभंग २६

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - मांडपहाडी
चाल : अती उल्हासे

भक्तीप्रेमाने गोविला शारंगधर ॥
भक्तांचे निर्विषय प्रेम आवडे त्या फार ॥धृ॥
मग तो न आणी मनी गरीब वा थोर ॥
भक्तिप्रेमाचा भुकेला असे गिरिधर ॥१॥
हीन कामे करी झाला भक्तांचा चाकर ॥
भक्तांच्या प्रेमावर भुलला श्रीधर ॥२॥
पाहुनी त्यांचा निर्धार करी संकट दूर ॥
कारुण्ये हांका मारीता धावे सत्वर ॥३॥
भक्तिभाव निष्ठा ठेवीता हरीवर ॥
दासी म्हणे श्रीहरी मग नसे दूर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP