अभंग २५

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - मांडपहाडी
चाल : क्रुष्णनाथ भृंग

उत्सुक बहु मुरली रव ऐकण्या कानीं ॥
अकस्मात वेणुध्वनी पडला कानीं ॥धृ॥
आश्चर्यानें बघता विस्मित होऊनी ॥
तव कोनी न दिसे पाहता नयनीं ॥१॥
हर्षे रोमांचला देह, ऐकता ध्वनी ॥
बहुदिसांची आस होती मनी ॥२॥
कोणत्याही कारणे तो मुरलीध्वनी ॥
सुस्वर मधुर नाद पडला कानीं ॥३॥
श्रीहरीची न कळे अगाध करणी ॥
पुरवी दासीची आस पुर्णपणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP