संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|आरती| जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधि... आरती जयदेव जयदेव गणपति गजवदना ... जय शंभो शशिशेखर विश्वेश्व... जयदेव जयदेव जय श्रीमांगीश... जयजय श्रीपाद श्रीवलभ गुरु... जयजय श्रीगुरुभूमन् नृसिंह... जय शंभो शशिशेखर अमरेश्वर ... जयदेवि जयदेवि जय श्रीरेणू... जयदेव जयदेव जयरुक्मिणिकां... जय भगवान् जयभूमन् श्रीदत्... जयदेवि जगदंब सचित्सुखमोर्... जयदेव जयदेव मारुतिवरधीरा ... जयदेव जयदेव जय श्रीपादगुर... जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधि... जयजय श्रीमद्गुरुवर स्वामि... कृष्णावेणीपंचगंगासंगमीं ।... श्रीदत्ताची आरती - जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधि... आरती म्हणजे हिंदू उपासनेचा एक विधी. Tags : aartidattaआरतीदत्तसंस्कृत श्रीदत्ताची आरती Translation - भाषांतर जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा । पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥जयदेव०॥ वास तुझा ब्रह्मांडीं चालक तूं देवा । अससी तूं सर्वांचा आनंदठेवा । वदती वेद सरस्वति न होय हा ठावा । कामति माझी नमितों पदिं देईं ठावा ॥१॥ सद्दाता तव महिमा वर्णितसे वेद । मोक्षाची सत्रें हीं ठेविलिं बहुसुखद । अतिदु:खें शक्ति नसे हरि माझा खेद । ज्ञानामृत पाजुनि दे अखंड तव पद ॥२॥ लीला अनंत तूझ्या वदता आनंत । चारी साही आठरा पाहता नच अंत । नारदव्यासमुनींद्र ध्याता नच येत । तो तूं देहा धरुनी देसि करीं स्वार्थ ॥३॥ पदिं गंगा कटिं शोभे शाटी कौपीन । हृदयीं लक्ष्मीकौस्तुभभृगुपदलांछन । दंडकमंडलु हातीं रवींसुदम वदन । राहो माझे हृदयीं हेंचि सदा ध्यान ॥४॥ आलिंगो त्वड्मूर्ती दिसोच हे नयना । ऐको कर्ण गुणांतें नामामृत रसना । त्वत्पदसुमगंध सदा लागो हा घ्राणा । दे परभक्ति श्रद्धा सतत करूं नमना ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP