मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| अभंग चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - अभंग श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी करुणामृत Translation - भाषांतर सद्गुरु श्रीराम जे दिनीं भेटला । श्रम पै तुटला संसारींचा ॥१॥संसारींचा श्रम अनादि पै होता । चरणदर्शन होतां भस्म केला ॥२॥प्रथम दर्शन नमस्कार होतां । मूर्ति पै पाहतां श्रम गेला ॥३॥अनादि संसार नाहीं ऐसा केला । ब्रम्हानंदें ठेला ब्रम्हानंदीं ॥४॥अनधिकारी झालों विषयीं लंपट । उद्धरी चोखट कृपामात्रें ॥५॥समर्थाची करणी रंका उद्धरण । दीनासि स्थापन संनिधानीं ॥६॥गांवरस होता गंगा वरी आली । तैसी परी झाली अनधिकारी ॥७॥चिरगूट पै होतें निशाणीं लाविलें । संरक्षण पडिलें राजयासी ॥८॥विषाचा कल्लोळ शंकरें धरिला । अंगिकार केला आवडीनें ॥९॥तैसें मज केलें विषयीं लंपटा । संतांच्या चोहटा बैसवीलें ॥१०॥प्रथम दर्शन धन्यग्रामीं झालें । देखतांचि गेलें संशयजाल ॥११॥सखा आपा नामा याचे बागेमध्यें । मन तें निमग्न पादपद्मीं ॥१२॥देहाचा अभिमान शरीरीं पै होता । जाणिवेचा ताठा लोकमान्य ॥१३॥भिक्षुक पै देह चावट शोधक । विद्या वयें उन्मत्त सप्तदशीं ॥१४॥सप्तदश वर्षीं अंगिकार केला । आनंद तारिला पादपद्मीं ॥१५॥पादरजस्नानें पावन पै केले । यत्नें सहय केले अपराध ॥१६॥सद्गुरु श्रीराम प्रसन्न हौनी । निरंजन लिंबोणी गंगास्नान ॥१७॥तेथें पै नेवोनी उत्साहभुवनीं । स्वामी संतोषोनी दया केली ॥१८॥पद्महस्त माथा स्वामींनीं ठेविला । तेचि समयीं केला गुणतील ॥१९॥गुणातीत सुखमय मज केलें । संबोधितां गेलें मायाजाळ ॥२०॥मायाजाळ मग नाहीं ऐसें केलें । ब्रम्हासुखीं ठेलें आपेंआप ॥२१॥आपेंआप ऐस स्वानंदभुवनीं । विपरीत त्यजोनी नामरूप ॥२२॥ऐसा आशीर्वाद देवोनी ठेविलें । मज बैसवीलें संतांपाशीं ॥२३॥बाळराजा होतों पदरीं पडलों । वडिलीं दवडिलों अनावडीं ॥२४॥परमार्थी जाहलों प्रपंचीं मूकलीं । देहजना वीटलों कृपायुक्त ॥२५॥संसारीं उदास हौनी वर्तत । गृहिणी - गृहांत पराङमुख ॥२६॥देखोनी निराश्रय अंगिकार केला । कृपेनें पाळिला रात्रंदिवस ॥२७॥माझा अभिमान त्रैलोक्यीं रक्षिला । त्यानें पूर्ण केला कृपामात्रें ॥२८॥कोणे एके क्रिये उणेंचि पडेनां । यश समस्त दीना रक्षियलें ॥२९॥संसाराचा वारा म्यां नाहीं देखिला । समर्थाच्या उदरा पूर्ण आलों ॥३०॥देशकाल नेणे युगाचे पै धर्म । साम्राज्य - संभ्रम नित्य वसा ॥३१॥चिंता मज कांहीं संसाराची नाहीं । चरित्रें पै पाही पदोपदीं ॥३२॥अनेक चरित्रें लोकां दाखविलीं । गुढी उभारिली रामराज्य ॥३३॥अनाथ दीनाचा अन्नसत्रमेळा । पुरवितो सोहळा याचकाचा ॥३४॥राया रंका सुख अदभुत देवोनी । उत्साह भुवनीं करवीतसे ॥३५॥कर्ता कोणी नाहीं आपणची कर्ता । जढमूढ समस्तां पाळीतसे ॥३६॥जें जें वेळीं जैसें पाहिजेसें होतें । पुरवितसे तें तें स्वामी माझा ॥३७॥धनधान्य सर्व जे वेळा पाहिजे । आणोनी पुरविजे सर्वस्वेंसी ॥३८॥आनंदमूर्तीसी माझा मीच आहे । ऐसी कृपा बाहे अभयेंसी ॥३९॥पुत्र मित्र बंधु सुखाचे शेजारी । अंगराखी झाले कार्यरूपी ॥४०॥कार्यरूपा वर्तती आपुलिया स्वार्था । एवढा रथा चालविता स्वामी माझा ॥४१॥अंध पंगु बधिर व्रात्य पोटा आलों । समर्थं पाळिलों स्वसामर्थ्यें ॥४२॥लौकिकीं मिरविला नामधारक केला । संजीवनमेळा जीवन ज्याचें ॥४३॥कोणाची पै नांवें किती पै वर्णावीं । काशी रामेश्वरी प्रीतीपूर्वीं ॥४४॥गुरुरूपी अवतार होती थोरथोर । अहर्निसीं विचार सर्वकाळ ॥४५॥तेचि माझी चिंता सर्वकाळ कर्ते । श्रीगुरु समर्थं देवरूपें ॥४६॥रंका दिव्यरूप करोनी ठेविलें । आनंदमूर्ति केलें आनंदरूप ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP