मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| पद २ चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - पद २ श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी पद २ Translation - भाषांतर श्रीरघुनाथ स्वामीचेंभोळी रुद्राबाई बैसली त्रिपुरपुर - शिखरीं हो ॥धृ०॥पद्मासन मांडुनी श्रृंगीं बाहुनि सप्त स्वरीं हो । अनुहात ध्वनी गर्जती अबरी हो ॥भोळी०॥१॥गंगाजळ मस्तकीं जटा बांधुनिया कूसरी हो । शोभति कानीं मुद्रा चंद्र ठेउनि मौलावरी हो ॥पंचानन पद्माक्षी अंबा विषम - नेत्न - धारी हो । रुंडमाळा गळा सर्प चुळ्बुळती शरीरीं हो ॥भोळी०॥२॥भस्मांकित शरीरीं त्र्यंबक धनुष्य घेउनि करीं हो । त्रिशूळ डमरु. चर्म - वसन गज चर्माचें धारी हो ॥आशीविष - प्राशिनी अंबा नीलग्रीव गौरी हो । क्षुद्रघंटिका कटितटीं अंकीं हेमागिरी कुमरी हो ॥भोळी०॥३॥त्रिपुर - मर्दन बाळी मन्मथ लीलामात्नें जाळीं हो । अंधक - मस्तक फाळी बहुकाळी कपाळी हो ॥उदार निर्जरपाळी दुसरी नाहीं भूमंडळीं हो । देव टाळी नाचति ब्रम्हादि सकळीं हो ॥भोळी०॥४॥चरणीं ब्रीदावळी चरण सप्तही पाताळीं हो । द्वारीं गण गंधर्व पूजा करिती सर्वहि काळीं हो ॥कलिमल - नाशन नाम वदति ब्रम्हादि सकळी हो । सकळा घटिं पटिं पूर्ण बाळी भोळी तूं वेल्हाळी हो ॥भोळी०॥५॥कृशानु रेत तुझा मोठा नवलाव सुंदरी हो । भूतांचे स्वामिनी विचरसि भूतांचे अंतरीं हो ॥बाम्हांतरिं व्यापुनि अससी नलिनी - पत्रापरी हो । अकळे न कळशी कुणा अपरंपरा परी हो ॥भोळी०॥६॥अतर्क्य तर्काची किती छाया तसवराची हो । निद्रा उन्मनीची किती पाल्हाळिण पवनाची हो ॥लहरी आनंदाची किती शांती उदबोधाची हो ॥भोळी०॥७॥हर्षे अंबा कैशी मूर्तीं अमृताची जैसी हो । अमरा अमर वल्ली भिल्ली भूषण पुण्यराशी हो ॥कलिमल बव्हल नाशी तारक मंत्रातें उपदेशी हो । भवभय भंजन नाशी काशीपुर - पट्टनिवाशी हो ॥भोळी०॥८॥करुनी वेणीस्नान येती तुझिया गोंधळासी हो । माघ कृष्ण - पक्षीं पुण्यतिथी चतुर्दशी हो ॥रात्रीं जागृत राहुनि अपरापूजा अर्पिति ते दिवशीं हो । हरहर नामें उदोऽबोलति चरणापाशीं हो ॥भोळी०॥९॥सन्निध सुरगण दाट अजगर हार घालुनि कंठीं हो । व्याघ्राजिन कटितटीं तेजें सत्रावी गोरटी हो ॥परात्पर मोठी ध्येय - ध्यानाची धूराटी हो । ध्येय - ध्यान - ध्याता जेथें नाहीं नाहीं ही त्रिपुटी हो । ऐशी सदगुरु कृपें रामें ऐक्यें दिली भेटी हो ॥भोळी०॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP