मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| अध्याय चवदावा चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - अध्याय चवदावा श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी अध्याय चवदावा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: ॥ श्रीआनंदमूर्तये नम: ॥ कोणे ऐके दिवशीं ॥रामनमीचे उत्साहासीं । परशुराम प्रतिनिधींसी । उत्सवास आणिलें होतें ॥१॥माध्यान्ह समयीं ब्राम्हाण पंक्ती । बैसल्या होत्या भोजनार्थीं ॥इतुक्यांत बहिष्कृती । विप्र मधुकरी मागों आला ॥२॥तो होता अति पातकी । मातृगमन पापाच्या पंकीं ॥बुडाला हें सर्व लोकीं । जाणोन बहिष्कृत केला असे ॥३॥तेणें मधुकरीस आगमन । केलें हें श्रीनें देखोन ।मग पुसिलें त्या कारण । ब्राम्हाण किंवा कोण आहां ॥४॥ब्राम्हाण असल्या बैसावें । पंक्तीस भोजन करावें ॥मधुकरी हे कशास्तव । ऐशा समारंभांत ॥५॥येरू बोले मी पापिष्ट । मात्नागमन - दुरितें क्लिष्ट ॥यास्तव धर्मांतून भ्रष्ट । झालों असे गुरुवर्या ॥६॥तेव्हां श्रीनें आज्ञापिलें । कृष्णेंत स्नान करा पहिलें ॥श्रीपदतीर्थानें वहिलें । पाप जाईल सत्य हें ॥७॥ऐसें तयें ऐकून । कृष्णेंत स्नान करून ॥स्वामींपाशीं येऊन । उभा ठाकला सन्मुख ॥८॥श्रीचरणींचें तीर्थवणी । देते झाले आनंदमुनी ॥आज्ञापिलें त्यालागुनी । पंक्तीस बसा भोजना ॥९॥तेव्हां मग तो पंक्तीतें । येवोनि बैसला स्वस्थचित्तें ॥वरकड विप्रसमुद्राय तेथें । कलहालागीं प्रवर्तला ॥१०॥प्रत्यक्ष पापी बहिष्कृत । केवि बैसला पंगतींत ॥आम्ही भोजन न करूं येथ । पात्रें टाकोन ऊठले ॥११॥जो जेवील या पंगतींत । त्यास करूं अपंक्त ॥ऐसें ऐकून तयांतें । बोलिले आनंदमूर्तीं ॥१२॥करून साष्टांग नमस्कार । सर्वत्रांस जोडोनी कर ॥विनीत शब्दांनीं उत्तर । बोलूं लागले महाराज ॥१३॥काय निमित्त कलह करतां । बहिष्कृत तयास म्हणतां ॥पंक्तीस न घ्याबें सर्वथा । माझा आग्रह नसे हो ॥१४॥परंतु आपुले प्रत्ययास । गोष्ट पुसतो आपणास ॥जेव्हां आला मधुकरीस । तेव्हां याची चर्या कशी ॥१५॥स्नान करोन येथें आला । श्रीपदतीर्थोदक लाधला ॥ब्राम्हाण शरणागत जाहला । मुखचर्या पालटली ॥१६॥तदाही सर्वीं देखिलें । आतांही आपण निरखिलें ॥मी म्हणतों हें आपुलें । चित्ता मानेल तरी पहा ॥१७॥मग पुसती एकमेकां । मागें याचें रूप देखा ॥अति कुश्चिळ नव्हतें कां । अंत्यजाहून नि:सार ॥१८॥आतां जाहला पालट । मुखश्रीवर कळा प्रगट ॥शुद्धत्वाचें तेज स्पष्ट । दिसों येतें पाहतां ॥१९॥ऐसें ऐकतां कितीएक । होते आग्रह - वादक ॥बोलूं लागले निष्टंक । काय समजून बोलतां ॥२०॥आहो पापी चांडाळ । मातृगामी केवळ ॥श्रीपदतीर्थानें निर्मळ । झाला कैसा म्हणतसां ॥२१॥एतद्विषयीं प्रायश्चित्तें । बोलोन गेले शास्त्रकतें ॥तीं सर्वही झालीं व्यर्थे । या बोलण्यावरोनी ॥२२॥यांनीं तीर्थप्रसाद दिला । इतुक्यानें पुनीत झाला ॥शास्त्रार्थ सर्वही बुडाला । वर्णसंकर करितसां ॥२३॥ऐसे आग्रहवादी विप्र । बोलूं लागले स्पष्टोत्तर ॥मग ते श्रीवर्य गंभीर । काय वदले तें ऐका ॥२४॥अहो हा ब्राम्हाण निर्दोष । द्दष्टी पडत असतां देख ॥अजुनी तुम्ही संशयात्मक । आग्रह धरूनि बोलतां ॥२५॥एतद्विषयीं श्रीरघुवीर । दाखवील तुम्हां चमत्कार ॥उठा म्हणतां सर्व विप्र । सहित उठले श्रीमूर्तीं ॥२६॥हातीं धरोनि विप्रमेळा । आले कृष्णातटाकाजवळा ॥अडचण निबिडस्थळा । माजीं जावोन लक्षिलें ॥२७॥त्या ब्राम्हाणाचा पापपुरुश । देहधारीं बैसला असे ॥अतिकुश्चित पाहतां चिळस । वाटों लागली सर्वत्रां ॥२८॥सर्वत्रांस आनंद ऋषी । बोलों लागले पुण्यराशी ॥देखिलें काय पुरुषासी । देहधारी पाप हें ॥२९॥त्या ब्राम्हाणाचें शरीरांत । संचरलें होतें जें दुरित ॥श्रीपदतीर्थ होतां प्राप्त । निघालें त्या देहांतुनी ॥३०॥तोचि हा होय कां नव्हे । सर्वांनीं यास विचारावें ॥मग तो सांगेल आपुला भाव । खूण पोचेल सर्वांतें ॥३१॥मग सर्वीं त्यास पुशिलें । येरें यथार्थ कथिलें ॥संशय सर्वांचें निरसले । विस्मय पावले अंतरीं ॥३२॥म्हणती ऐसें विपरीत कोठें । कदाकाळीं न दिसे स्पष्ट ॥श्रीचरित्र सेवा श्रेष्ठ । अगम्य लीला साधूची ॥३३॥पश्चात्ताप झाला त्या सर्वां । म्हणती स्वामी देवदेवा ॥संशय परिहार आघवा । गेला सर्वां अंतरींचा ॥३४॥मागें ब्रम्हाग्रह उद्धरिला । आतां पापी निष्पाप केला ॥पापपुरुषचि दाखविला । सर्वही दृष्टिगोचर ॥३५॥आतां आपणांस दु:खशब्द । बोलतील जे ब्रम्हावृंद ॥तेचि पापी शुद्ध बुद्ध । यदर्थीं संशय नसेची ॥३६॥ब्राम्हण तो निष्पाप झाला । आतां पंक्तीस घेऊम याला ॥म्हणोनिया विप्रमेळा । स्वस्थ आसनीं बैसला ॥३७॥यावरि आनंदमूर्ती संत । घेवोनि सर्व साहित्य ॥पातले ब्राम्हण पूजेतें । पंक्तीमाजि तेधवां ॥३८॥आसनादि अर्घ्यापाद्यविधी । पूजोनिया विप्र - मांदी ॥चरणतीर्थ अनवधी । ब्रम्हावृंदांचें घेतलें ॥३९॥सर्व ब्रम्हावृंदाप्रती । बोलते झाले आनंदमूर्तीं ॥प्रशस्त वाटेल तुमचे चित्तीं । तेंचि करा स्वामीहो ॥४०॥आणखी एक विनवणी । परिसावी सर्व ब्राम्हाणीं ॥सर्व समाज येथें मिळणी । जाहली हें भाग्य दुर्लभ ॥४१॥ब्राम्हाण स्वरूप सर्व । श्रीरघुनाथाचे अवयव ॥एतद्विषयीं विपरीत भाव । नसे हे आण वाहतसे ॥४२॥आपुलें देवोन अंघ्रितीर्थ । स्वामी कीजे हा पुनीत ॥‘पूतोभव’ असें त्यांतें । वरप्रदान अर्पावें ॥४३॥मग जेवावें पंगतीस । येणें संतोष श्रीस्वामींस ॥ऐसें द्दढतर प्रत्ययास । प्रसाद घ्यावा स्वामींचा ॥४४॥जरी हें कृत्य करणें उचित । मान्य करिती श्रीरघुनाथ ॥तरी व्हावा डोल त्वरित । गोचर सर्वां वृंदावनीं ॥४५॥ऐसें बोलोन महाराज । सवें घेवोन विप्रसमाज ॥वृंदावनस्थ श्रीगुरुराज । प्रार्थिले कर जोडोनी ॥४६॥स्वामी विप्र बहिष्कृत । दैवगत्या पावला येथ ॥यासीं वृंदावनाचें तीर्थ । दुजें तीर्थ ब्राम्हाणांचें ॥४७॥दीधलें असताम हा पुनीत । होईल जरी पापरहित ॥हें प्रमाण जरी सत्य । डोल व्हावा वृंदावनीं ॥४८॥स्पष्ट पाहो हा ब्राम्हाण समाज । उभारावा कीर्तिध्वज ॥कृपा करावी श्रीगुरुराज । प्रत्यय द्यावा सर्वांतें ॥४९॥ऐसें प्रार्थितां तये वेळां । डोल सदभुत तेव्हां जाहला ॥गोचर होतां सर्वत्रांला । श्रीहरहर गर्जले ॥५०॥फिटला पातक विटाळ । एसे बोलले विप्र सकळ ॥निष्पाप झाला तो केवळ । पंक्ति घ्यावा नि:संशय ॥५१॥स्वाम्यंघ्रि - ब्राम्हाणांचें तीर्थ । आनंदमूर्तीं स्वहस्तें तेथ ॥तया ब्राम्हाणांतें देत । सर्वही बोलले “पूतो भव”पंक्ती घेवोन भोजन केलें । वृत्त हें चौखंडीं श्रुत जाहलें ॥धन्यता वाखाणूं लागले । आबालवृद्ध स्वामीची ॥५३॥संतचरित्न वर्णावयास । चित्ता होतो उल्हास ॥गोपाळसुतोंच मानस । चरितामृतीं सदा वसे ॥५४॥आनंदचरितामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ॥उल्हासें परिसोत संत । चतुर्दशाध्याय गोड हा ॥५५॥॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP