मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| अध्याय सहावा चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - अध्याय सहावा श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी अध्याय सहावा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: ॥ नृसिंहजोशी तिसिंगीकर ॥ कथाश्रवणीं सदार ॥वक्ता बापू दिनकर । तेही ज्योतिषी तेथींचे ॥१॥गजरवाडी माजी जाण । नृसिंह राहिले वास्तव्य करून ॥बापाजी हे लीलेकरून । सहज आले एकदां ॥२॥आगत स्वागत झालियावरी । आसनीं बैसले भोजनोत्तरीं ॥सहज बोलण्या माझारी । गोष्ट निघाली पूर्वील ॥३॥आनंदमूर्तिचरित्र । ऐकूं इच्छितों पवित्र ॥तुमचे मुखें युग्मश्रोत्र । पावन होत स्वामिया ॥४॥अवश्य म्हणोनी बापाजी । चरितामृत श्रवणीं पाजी ॥सौरस्य जया कथेमाजी । लीला आनंदमूर्तींची ॥५॥पंचमाध्यायीं कथा गहन । आनंदमूर्ती कुलुपांतून ॥निघोन गेलिया दिलेलखान । विस्मय करी बहुसाल ॥६॥सांगलीहुनी वार्तिक येत । सांगती आनंदमूर्ती ख्यात ॥हिंदूका फकीर योग्य बहुत । साक्षात्कारी गुरुमार्गीं ॥७॥हें परिसोन दिलेलखान । परीक्षा षाहावी म्हणोन ॥साक्षेपें उद्योग करोन । योजिलें कंत्रण तयावरी ॥८॥द्दष्टी न पडे जरी चमत्कार । काढीन त्याचें शिखासूत्र ॥सुंता करोन तो विप्र । अविंधांत मिळवीन ॥९॥ऐसी धरोन वासना । सिद्ध करोन शिबिका - याना ॥बोलावूनि सभ्य कारकुना । सांगे सांगलीस जावया ॥१०॥कोणी ब्राम्हाण हिंदू फकीर । आनंदमूर्ती नामधर ॥मुरीदमार्गी पीर । रघुनाथ स्वामी बोलती ॥११॥मुरीद नेकजात यावैनकी । पीर तुर्बत डोले निकी ॥ऐसी बखवा बोली लोकीं । तें ऐकिलें विपरीत ॥१२॥यावरून तयासी येथें आणा । म्हणोनी धाडिलें कारकुना ॥त्यानें सांगलीस येऊनी जाणा । वंदिलें आनंदमूर्तीतें ॥१३॥बोलिला तुम्हांस दिलेलखानें । पाचरिलें प्रीती करून ॥यालागीं पालखींत बैसोन । शीघ्र आपण चलावें ॥१४॥येरू म्हणे कासया । आम्हांस पाचारिलें भेटावया ॥भिक्षुक वृत्ती करोनिया । काळ कंठितों गुरूभजनीं ॥१५॥आमुचे येणेचें कारण । नाहीं नाहीं सहसा जाण ॥मग बोलिला कारकून । स्वस्थ मनें ऐकावें ॥१६॥सकळ दुष्टांचा नायक । दिलेलखान तो प्रमुख ॥तुम्ही न येतां तुम्हां सुख । पडा देणार नाहीं जी ॥१७॥मग तैसेचि निघाले । सवें क्षेत्रस्थ ब्राम्हण भले ॥ऐसा स्तोम चरणीं चाले । शिबिका चाले रिकामी ॥१८॥येवोन पोचले मिरजेप्रती । वार्तिक नबाबा सांगती ॥ऐसें समजतां त्वरित गतीं । सामोरा ये नबाब तो ॥१९॥पूजा सत्कार करोन । शहरांत आणिले सह ब्रम्हाण ॥पवित्र स्थळ नेमून । बिर्हाड दिधलें ब्राम्हाण ॥नबाब निजस्थाना गेला । खर्चाचा बेत सांग केला ॥साहित्यसह पाठविला । सुज्ञ ब्राम्हाण त्याकाळीं ॥२१॥ऐसें जहाले एक दोन दिवस । सुचली बुद्धी त्या यवनास ॥रजत ताटीं भरोनि मांस । रंभापत्र वरी झांकलें ॥२२॥त्यावर सरपोसास खुतनीच्या । घालोनी समयीं पूजेच्या ॥हातीं धाडी ब्राम्हाणाच्या । पुष्पें म्हणोनि पूजेसि ॥२३॥संगें दिधले सेवक । जे परम विश्वासुक ॥यवनांमाजी प्रमुख । निकटवर्ती आपुले ॥२४॥सर्वज्ञता जरी त्यां आहे । तरी त्यास त्यांचेनि स्पर्श नोहे ॥ऐसें मनांत आणोनि पाहे । बुध्द्या मांस पाठविलें ॥२५॥दृष्टी पडेल चमत्कार । तरीच त्या होईल बरें ॥नातरी धरोनि बलात्कारें । यवन करीन स्वहस्तें ॥२६॥ऐसें बोलोनिया स्पष्ट । भरोनि धाडिलें मांस - ताट ॥ब्रम्हाणें आणोनि पूजे निकत । पुष्पें म्हणोनि ठेविलें ॥२७॥यवन होते जे संगतीस । तेही वदले ऐसें त्यांस ॥नबाबें धाडिलीं आपणांस । पूजेलागीं पुष्पें हीं ॥२८॥श्रीनें उदक घेऊन हातीं । प्रोक्षण केलें तया वरुती ॥सरपोस काढोन जंव पाहती । पुष्पें झालीं नानापरी ॥२९॥ऐसा पाहतां चमत्कार । विस्मिय पावले बहुसाल ॥३०॥श्रीलागी बोलली सर्व मंडळी । आपणां भ्रष्ट करावया ये काळीं ॥कापट्या - रचना यवनें केली । सामर्थ्य आपलें पाहिलें ॥३१॥परंतु लीला ही अगाध । काय जाणे तो अविंध ॥ऐसें बोलोन श्रीसन्निध । मग पातले यवनाकडे ॥३२॥झाला वृत्तांत केला श्रुत । म्हणती चमत्कार अद्भुत ॥धन्य साधु श्रीगुरुभक्त । त्यासी छळतां बरें नाहीं ॥३३॥हें वृत्त परसोन यवन । अंतरीं झाला कंपायमान ॥त्राहे त्राहे म्हणोन । तोबा तोबा ऐसें वदे ॥३४॥अंतरीं उपजली अत्यंत भीती । आतां यांसी विषम चित्तीं ॥धरिलिया न दिसे उत्तम गती । ऐसें गमे पारीच्छिन्न ॥३५॥पश्चात्ताप पावला मनीं । श्री निकट पातला सायान्हीं ॥विनयें मस्तक ठेविलें चरणीं । म्हणे स्वामी कृपा कीजे ॥३६॥भीतास अभय दीजे । लडिवाळ स्वकीय मानिजे ॥स्वामींस छळिलें हे माझे । अपराध पोटीं घालावे ॥३७॥ऐसें विनवोन दिलेलखान । सवस्त्र पोषाख आणवोन ॥विपुल द्रव्य ही पुढें ठेवून । गौरविली श्रीमूर्ती ॥३८॥उभा ठाकिला बद्धांजली । विनंती करी स्वामी जवळीं ॥कांहीं सेवा सांगोन या काळीं । सनाथ कीजे स्वामिया ॥३९॥ऐकोन वदे श्री दयाघन । तुमचे छायेस ब्राम्हाणजन ॥वसती यांचा अपमान । सहसा न करणें यावरी ॥४०॥ऐसें बोलोन यवनाप्रती । सांगलीस गेले आनंदमूर्ती ॥परंतु दिलेलखानाचे चित्तीं । उत्कंठा कांहीं उपजली ॥४१॥थोर गुरुभक्त ब्राम्हाण । यांस कांहीं भूमिदान ॥देवोन करावा साधूचा मान । सत्पात्रदाना योग्य असे ॥४२॥ऐसें चित्तीं धरोन । विजापुरास पत्रें लिहून ॥स्वकीय वकील अभिधान । शिवाजीपत प्रसिद्ध ॥४३॥त्यांस लिहिला सविस्तर । श्रीगुरुभक्ताचा प्रकार ॥मिरजप्रांतीं जे ग्रामांतर । त्यांसीं हुकूम आणविले ॥४४॥गांवोगांव इनाम करून । ताकिदी दिल्या सुभ्याकडोन ॥सह मुद्रा पत्रें लिहून । दिधलीं आनंदमूर्तींस ॥४५॥तैं पासोन गांवोगांवीं । ब्रम्हानाळींचे गोसावी ॥इनाम आकारीं पाहावी । जमीन वजा पडतसे ॥४६॥निर्वेध भोग असे चालत । मठांत वसून निर्भय प्रस्तुत ॥निस्तोष पत्रें मठांत । आहेत अद्याप वरी ॥४७॥शिवाजीपंत वकील । श्रींचे अनुगृहीत पहिले ॥तेणें श्रींचें महत्व वहिलें । कथिलें सांग पाच्छाहा ॥४८॥हुकूम होतांची पाही । पत्रें लिहून लबलाहीं ॥व्यवधान न करोन कांहीं । सुभ्यालागीं पाठविलीं ॥४९॥त्या समयीं दिलेलखानें । मिरजेस स्थळही नेमून ॥मठाकरितां दिधलें जाण । मठही बांधून दीधला ॥५०॥तें स्थळ अद्याप पर्यंत । राममठ असे विख्यात ॥रामोपासक संत तेथें । वास्तव्य करोनि राहती ॥५१॥एके काळीं नवमीस पाही । श्रीरामाच्या उत्साहीं ॥रंगनाथ निगडीकर पाही । प्रस्थान केलें यावया ॥५२॥गोपाळस्वामी वडगांवींचे । निघाले समागमें तयांचे ॥मार्गीं जाता बाहे क्षेत्राचे । सन्निधानीं पातले ॥५३॥रामलिंग निकट जाऊन । स्नानसंध्यादि जपध्यान ॥फलाहारादि सर्व सारोन । ब्रम्हानाळमार्गें निघाले ॥५४॥बाहेकर महारूद्रपंत । भाविक कुलकर्णीं याचें शेत ॥स्वांगें नांगर धरिला तेथ । चैत्रमासीं मध्यान्हीं ॥५५॥तें पाहून श्रीरंगनाथ । अंतरीं कळवळला बहुत ॥पहाहो ब्राम्हाण उष्णांत । श्रम करितो बहुसाल ॥५६॥गोपाळ स्वामीही बोलिले । ब्राम्हाण होत्साते श्रम केले ॥असेंच परमार्थावरी वहिलें । चित्त ठेविल्या उणें काय ॥५७॥असो त्या ब्राम्हाणाचा भाग्योदय । यालागीं स्वामींचा आगमनसमय ॥जेवि कां वत्सालागीं गाय । निकट येत धावोनी ॥५८॥तेवीं उभयता तयाजवळें । जावोनी तयातें विचारिलें ॥तुम्ही कोण सांगा वद्दिले । उष्णांत श्रम फार करितां ॥५९॥येरू बोले ते अवसरीं । कन्या पुत्र कलत्र घरीं ॥बहुकुटुंबी गृहस्थाचारीं । निर्वाह नोहे कृषीवीण ॥६०॥दयावंत श्रीरंगमूर्ती । स्वयें वदले तयाप्रती ॥ब्रम्हानाळीं आनंदमूर्ती । ऐकिलें असेल तुवांही ॥६१॥त्यांचे मठीं श्रीरामनवमी । उत्साहालागी जातसों आम्ही ॥आम्हां समवेत यावें तुम्ही । उत्सव दृष्टी पडेल ॥६२॥सदन्नस्नान सत्समागम । श्रीचें भजन निरुपम ॥कृष्णास्नानें सर्व काम । पूर्ण होती जाण पां ॥६३॥समीचीन तूप पोळ्या । अनेक मिष्टानें मिळती सखया ॥आनंद रात्रौ कीर्तनीं विलया । दोष जाती पै तुझे ॥६४॥चार दिवसां पुनरागम । होईल तुझा हा वचन नेम ॥परिसोन चलावें समागमें । अवश्य म्हणे द्विजवर्य ॥६५॥भाग्योदय त्या ब्राम्हणाचा । दर्शन लाभ साधूंचा ॥तदनुरूप मनोभाव त्याचा । अनुसरला या साधूंतें ॥६६॥नांगराचे गडी आले । त्यांच्या स्वाधीन बैल केले ॥महारूद्रपंत निघाले । सत्समागमें ब्रम्हानाळा ॥६७॥ब्रम्हानाळीं झाला सायान्ह । पोचले श्रीसहवर्तमान ॥आनंदमूर्तींपाशीं जाऊन । जाणविलें वार्तिकीं ॥६८॥आनंदमूर्ती सहसाधुवृंद । सामोरे येती आनंद ॥मृंदगताल सहित वाद्य । समारंभें निघाले ॥६९॥वीणा तुतारे आणि भेरी । निशाण झांज आणि खंजिरी ॥विविध वाद्यें महागजरीं । संगमापर्यंत पावले ॥७०॥नमस्कार चमत्कार । आगतस्वागताचा प्रकार ॥कुशलार्थ पुसोन वारंवार । गौरविलें अतिमानें ॥७१॥भेटी होतांच ब्रम्हानंद । साधुसहित मूर्ती आनंद ॥वृंदावनाचे सन्निध । सर्व आले गजरेंसी ॥७२॥उत्तमासनीं बैसवोन । पाद्यार्घ्यादि सविधी पूजन ॥मंगलारती करून । कृतार्थ मानी आनंदमूर्ती ॥७३॥सर्वों वंदिलें वृंदावना । निकट बैसका केल्या जाणा ॥बोले श्रीरंगनाथ वचना । महारुद्रपंतातें ॥७४॥हे आनंदमूर्ती साधू । साम्य - दृष्टी अभेदू ॥निर्मत्सर निर्द्वंदू । यांसी नमस्कार करावा ॥७५॥हें परिसतां महारुद्र । शीघ्र करी नमस्कार ॥आशीर्वाद देती येर । अभीष्ट कल्याण हो तुझें ॥७६॥मग बोलले निगडीकर । हे कुलकणीं बाहेकर ॥कृषिकर्मीं परम सुगर । श्रमकर्ते बहुसाल ॥७७॥मार्गीं आपुले शेतांत । स्वांगें नांगर होते हांकीत ॥माध्यान्हीं प्रखर उष्णांत । कांहीं श्रम न गणोन ॥७८॥येथील प्रशंसा बोलोन । उत्सवकीर्ती सांगोन ॥परभारें आणिले शेतांतून । विनोदें कांहीं बोलूनिया ॥७९॥उत्साहीं पुष्कळ तूप पोळ्या । सदन्न भोजन मिळे सखया ॥कीर्तनीं जागरीं दोष विलया । निक्षेपें जाती पै तुझे ॥८०॥हो जी म्हणून भोळा विप्र । अनुगत निघाला पै सत्वर ॥आलिया अंघ्रिद्वय पवित्र । दर्शनलाभ पावला ॥८१॥हांसोन बोलले क्षमानिलय । त्याचिये भाग्याचा उदय ॥म्हणोन श्रीरंगा तुमचे पाय । आश्रयिले पै तेणें ॥८२॥मग भोजन समारंभांत त्यास । निकट बैसवोन पंगतीस ॥तूप पोळया आसमास । समीचीन वाढविल्या ॥८३॥साधुमठींचें सदन्न । वरी कृष्णेचें विमल जीवन ॥यथेष्ट तृप्ती वरोन । समाधान पावले ॥८४॥चार दिवस उत्सवांत । चित्त झालें आनंदभरित ॥जों जों सद्वाक्य ऐकत । तों तों विटला संसृतीस ॥८५॥अनुतापें सबाहय व्यापिला । सद्भाव मनीं उदेला ॥चित्तीं म्हणे चित्सुख मजला । कैं प्राप्त होईल गुरुसेवा ॥८६॥संत येती उत्सवास । त्यांचिया पवित्र चरणास ॥नम्रत्वें सर्व भूतांस । होणें होंचि आवडे ॥८७॥श्रीरंगनाथावरी केवळ । कुर्वंडी करी प्राण सकळ ॥ऐसें महत्व आगळ । प्राप्त होतें सत्यंसें ॥८८॥उत्साह समाप्त जहालियावरी । कोणी एक गृहस्थाचारी ॥आनंदमूर्तींसी नमस्कारी । अनुग्रह मागे श्रीपासीं ॥८९॥स्वामियें कृपा करून । त्यास अनुग्रह दिधला जाण ॥महारुद्रें ऐसें पाहून । मनीं धरला हा हेतू ॥९०॥रंगानाथशिष्या लागून । महारुद्र पुसे साक्षेपें करून ॥गुरूपदेश घेतल्यानें । काय होतें मज सांगा ॥९१॥सांप्रदायिक बोले त्यास । अल्प तों नेणे या महिम्यास ॥गुरुकृपेवीण जीवास । मुक्तकर्ता कोण आहे ॥९२॥जन्मा आलियाचेम सार्थक । साधावि गुरुकृपा एक ॥खेरीज साधनें अनेक । करून विफळ संसारीं ॥९३॥कर्णरंध्रीं महामंत्न घेणें । गुरु सांगतो तेंवि वर्तणें ॥तनुमनधन अर्पणें । यांतचि असे सार्थक ॥९४॥गुरुकृपेवांचूनि कैची । प्राप्ती होईल परमार्थाची ॥गुरुमाय छाया कृपेची । करील तरीच सार्थक ॥९५॥हें ऐकतां ते अवसरीं । अनुताप भरला अंतरीं ॥श्रीरंगनाथा प्रार्थना करी । उपदेश देणें मजलागी ॥९६॥मग बोलले श्रीरंगमूर्ती । ऐसें तुझे जरी चित्तीं ॥सांगेन आनंदमूर्तीप्रती । ते तुज देतील उपदेश ॥९७॥महारूद्रा भरला संशय । म्या निकट केले श्रीरंगपाय ॥ते म्हणती उपदेश स्वयें । आनंदमूर्ती देतील ॥९८॥बरें घडेल तें पाहावें । श्रीगुरुइच्छा स्वस्थ राहावें ॥ऐसें म्हणोन स्वभावें । गेला कृष्णास्नानातें ॥९९॥इकडे आनंदमूर्ती रंगनाथ । कृष्णास्नान करूनि निगुतें ॥बृंदावनसन्निधानातें । संध्या करीत बैसले ॥१००॥इतुक्यांत महारुद्रपंतानें । पूजासामुग्री घेऊन ॥नमस्कारिलें वृंदावन । उभय मूर्तींतें पाहिलें ॥१०१॥लोपलें रंगनार्थाचें रूप । दोघे आनंदमूर्तिस्वरूप ॥द्दष्टी देखतां संशय अमूप । पडला तेव्हां महारुद्रा ॥१०२॥याचे मनींचा अभिप्राय । जाणे दयाळू श्री गुरुमाय ॥यालागीं एकरूप दावोनि ठाय । करूनि पाय दाखविले ॥१०३॥चरित्र पाहे महारुद्रपंत । उभा राहोनि तटस्थ ॥क्षण होतां विपरीत । रूपपालट जहाला ॥१०४॥लोपोन आनंदमूर्ति रचना । दोघे रंगनाथ दिसती जाणा ॥अत्याश्चर्य वाटलें मना । संशयीं पडिला पुनरपि ॥१०५॥नावेक पाहे होऊनि स्थिर । गोचर झाले सिनार ॥एक रंगनाथ निगडीकर । एक आनंदमूर्तीं दिसतसे ॥१०६॥बाष्पें भरून कंठ येत । दंडप्राय पडला तेथ ॥सद्नद म्हणे मनोगत । जाणियलें स्वामियें ॥१०७॥संशयनिवृत्त व्हावयास । स्वामियें कौतुक दाविलें ऐसें ॥आतां कृपाळू व्हावें दीनास । सनाथ केलें पाहिजे ॥१०८॥रंगनाथ आज्ञेवरून । आनंदमूर्तीस जहाला शरण ॥मूर्ध्नी करकमल ठेऊन । ब्रम्हास्वरूप तो केला ॥१०९॥बहुत केली श्रीगुरूभक्ती । तत्वज्ञानाची झाली प्राप्ती ॥उत्तमज्ञान तया म्हणती । येतें झालें अनायासें ॥११०॥जय जय आनंदमूर्ती म्हणोन । आरती महारुद्रपंतानें ॥केली ती प्रस्तुत जाण । गाती सद्वंश आवडी ॥१११॥दुर्मीळ परिस प्राप्त होय । तरी लोह सुवर्ण न करी काय ॥कीटक भृंगीरूपा जाय । ध्यानयोगें करून ॥११२॥गोपाळ - तनय विनवी संतां । अल्पावधान करा आतां ॥पुष्पाश्रयें शंभूच्या माथा । न चढे काय पिपीलिका ॥११३॥इति श्री आनंद - चरित्रामृत । बापानंद - विरचित ॥सदा परिसोत भक्त । षष्ठाध्याय रसाळ हा ॥११४॥॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP