TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्रीआनंद - ओव्या

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


ओव्या
शके सतराशें एकाहत्तर । सौम्यनाम संवत्सर ॥
भाद्रपद वद्य सप्तमी प्रहर । द्वितीय, वार आदित्य हा ॥८२॥
तये दिनीं समाप्त । ग्रंथ आनंदचरितामृत ॥
लेखनकृत्य समाप्त । ब्रम्हावृंदें ब्रम्हानाळीं ॥८३॥
सर्वीं लिहोनिया ग्रंथ । नेवोनि ठेविला मठांत ॥
तें पाहोनी श्रीगुरुनाथ । संतुष्टले सर्वांतें ॥८४॥
संतुष्ट होती श्रीगुरूमूर्ती । सर्वां आनंद न माय चित्तीं ॥
धन्य धन्य ते मानिती । आपणांतें सर्वही ॥८५॥
प्रसन्न झालिया देवो । काय न पाविजे जीवो ॥
पुरुषार्थ चतुर्विध सर्व । घालोनि वरील तयातें ॥८६॥
इतिश्री आनंदचरितामृत ग्रंथ । जे रक्षति अति स्वार्थ ॥
धर्मार्थ काम मोक्ष तेथें । सर्वकाळ नांदती ॥८७॥
आनंदचरितामृत ग्रंथ । बापानंदविरचित ॥
प्रेमळ संत परिसोत । षोडशाध्याय समाप्त हा ॥८८॥


॥ श्री रघुनार्थापर्णमस्तु. ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:51:47.8270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सोन्याचें गोकर्ण तोंडांत धरणें

  • गर्भश्रीमंत असणें 
  • श्रीमंताच्या पोटीं जन्मास येणें. To be born with a silver spoon in the mouth - ‘ वास्तविक पं. जवाहरलाल हे सोन्याचें गोकर्ण तोंडांत धरुनच जन्मास आलेले ’ -दि. वा. दिवेकर-स्वभावचित्रें. 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.