श्रीपूर्णानंद चरित्र - प्रस्तावना

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे . या संप्रदायाची बरीच नोंद पूर्णानंद चरित्र ग्रंथात आहे . त्यात नाथ महाराजांचे नात जावई नारायण पूर्णानंद आणि पणतू शिवराम यांच्या दोन पिढ्यांचा इतिहास पण आहे . त्या दृष्टीने या ग्रंथाचे आगळे महत्व ठरते . हाग्रंथ हनुमदात्मज कवीने लिहिलेला असून याच कवीची रचना दासोपंत चरित्र ही आहे . शके १९५३ (इ .स .१८३१ ) खरनाम संवत्सर चैत्र शुद्ध १५ रोजी हा ग्रंथ पूर्ण झाला . विदुरनगरी बीदर येथील कृष्णा हनुमंत कुलकर्णी याने हनुमदात्मज नावाने हा ग्रथ हैद्राबाद येथे लिहिला . ग्रंथाचे अठरा अध्याय असून एकूण ओवीसंख्या २२८१ आहे . या ग्रंथातील सोळाव्या अध्यायात संप्रदायाची माहिती आहे . रामदास पंचायतानातील केशव , रंगनाथ , जयराम यांचा संबंधही या परंपरेशी आहे . त्यामुळे समर्थ पण कल्याणीस आले . वैशाख शके १६०२ मध्ये कल्याणीस समर्थ पंचायतनाचे संमेलन झाले . नाथांचे पणतू शिवराम स्वामीच त्याचे संयोजक होते .

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP