-
वि. १ ताबा , अंमल यासंबंधीं ; गुण , स्वभाव , नांव धारण करणारा ; मालकीचा . उदा० पुणेंशाई , मुंबईशाई , सुरतशाई . २ कडून प्रस्थापित ; संबध्द ; वाच्य - वाचक . उदा० शिंदेशाई ; होळकरशाई , अप्पाशाई , बाबाशाई . ३ नाणीं , चाली , रीतरिवाज , पध्दती , कायदे वगैरे . उदा० शिवशाई , आदिलशाई , इ० ४ विशिष्ट जातिगुणादिवाचक . उदा० ब्राह्मणशाई , शूद्रशाई , मोंगलशाई , सोदेशाई , शिनळशाई , लबाडशाई . - स्त्री . १ अंमल ; सत्ता ; अधिकार ; आमदानी ; कारकीर्द . शिंदेशाई पुण्यामध्यें झाली . २ ( राज्य , गांव , लष्कर , इ० मध्यें राहणारा विवक्षित ) जनसमूह ; समाज . उ० सगळया शाईत यासारखा शूर दुसरा कोणी नाहीं . होळकरशाईमधें मल्हारबा होता एकच पूत . - ऐपो ९० , ११० , १२७ , इ० . ३ राजमंडळ ; राज्य . ४ आणखीं निरनिराळे संकीर्ण उपयोगाचे प्रकार . उदा० ढपळशाई , फुकटशाई , बागशाई , लंगडशाई . [ फा . शाही ]
-
स्त्री. १ मषी ; लिहिण्यासाठीं बनविलेला रंगित द्रव पदार्थ . शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्याच काळानें झाला - ज्ञाको २० . १५ . २ लोखंडाच्या किसापासून तयार केलेलें मृदंग , पखवाज इ० स लावण्याचें लुकण , रोगण . [ फा . सियाही ]
-
०शिरस्ता पु. १ सार्वजनिक किंवा सर्वसाधारण चालरीत , पध्दत ; रिवाज , रूढी ; जनरीति . २ राजशिरस्ता ; राजरीत . चांगलें माणूस मिळऊन शाई शिरस्त्याचें मर्द माणूस पाहून - समारो १ . १३ .
-
०घालणें नाश करणें . त्या सुंदर चित्रावर त्या दुष्टानें शाई घातली .
Site Search
Input language: