TransLiteral Foundation

श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २०

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग २०

इडापिंगालासुषुम्नामेळीं । खेळी महाचातुयेंचे खेळी ।

मग सहजस्वरुपी लागली टाळी । योगीराजा ॥२०॥

टीकाः

इडापिंगलाचे मेळीं । सुषुम्ना वाहे उर्ध्व गोळी । महातुरीय खेळीखेळी । जीवन हें ॥१॥

इडापिंगली जीवन । परि तयांचे पृथकपण । दोनो माजी समसमान । सकळ पिंडीं ॥२॥

रामकृष्न नामेंकरुन । होतां तयांचे मीलन । सहज होय परिपुर्ण । गिळोनि गगन या देहीं ॥३॥

गगने तयांचे पृथःकरण । चिढांश पहातां अपूर्ण । तयाचियें अधिष्ठान । गतिरुप ॥४॥

पहातां इथे चंचळगती । शद्बगुणांची हे स्थिती । घेतली रोकड प्रचिती । संतजनीं ॥५॥

इडापिंगला एक होवुन । जाले पुर्ण गुणी जीवन । ऊर्ध्वमुख करी गमन । गगनातु ॥६॥

मग स्वरुपीं लागली टाळीं । अद्वय नामचिये मेळी । हरिनामांचें कल्लोंळीं । सहजेचि ॥७॥

सकार हकार जन्मा आले । तेचि सहजरुप आतुडलें । परम योगिया लाधलें । सहजपणें ॥८॥

सहज लाधली चित्काळा । गवसिली योगिया कळा । तेथ जडोनि गेला डोळा । गगनाचा ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:47.2870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नास

  • स्त्री. १ तपकीर . २ नाकाने ओढण्याचे , नाकांत घालण्याचे औषध . - एभा १० . १६ . [ सं . नस्य ; हिं . ] 
  • पु. १ नाश पहा . २ नाश करणारे एक पिशाच्च . [ सं . नाश ] नासकवणी - न . दूषित , नासके बिघडलेले पाणी किंवा रस . [ नासके + पाणी ] नासका - वि . १ नासलेला ; नाशित पहा . २ सहज , कवकर नासणारा , बिघडणारा , नष्ट होणारा ; न टिकणारा . नासके केणे - न . १ लवकर खराब होणारा , नासणारा . ( फळे , भाजीपाला वगैरे विक्रीचा ) जिन्नस . २ नासलेला अथवा बिघडलेला जिन्नस . ३ ( ल . ) वाईट किंवा दुबळी वस्तु , प्राणी वगैरे . ( उदा० लग्नासाठी दाखविलेली ओगट मुलगी ; विकावयास आणलेला दुबळा तट्टू इ० ) [ नासके + केणे = पदार्थ ] नासडा - पु . पूर्ण नाश - तोटा . नासाड पहा . नासणे - उक्रि . १ नाशणे पहा . २ वायां जाणे . तरी सांगावे सुहृदी कथिला जो मंत्र तो न नासेल । - मोविकृ ८८ . ६१ . ३ गुण किंवा सत्त्व नाहीसे होणे . म्ह ० नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाहीत किंवा जोंधळ्याला विकत नाहीत . ४ - अक्रि . ( ल . ) मरणे . लग्न केले परी भ्रतार नासला । हितावह झाला तोहि मज । - ब ९५ . इतर अर्थी नाशणे पहा . [ सं . नाशन ] 
  • ०तूस धूस धोस धूळ - स्त्रीपु . १ अत्यंत नासाडी ; सत्यानाश ; धूळधाण ; दुर्दशा . २ व्यापारांत बूड , तोटा . ( क्रि० येणे ). [ नाश द्वि + धूळ ] नासरा - वि . नाशक , नाशा पहा . 
  • ०वणी न. १ पिकाची नासाडी करणारा पाऊस . २ नासकवणी पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site