TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३०

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग ३०

सदगुरुवाणी बैसे गगनगोळी । वस्तु कोठडी नयन खोली ।

आजपजपाचा तागडी तोली । ग्राहीक कोण मिळेना ॥३०॥

टीकाः

पहातां गगनाचे गोळीं । बैसलोसे गुरुमाऊली । सुर्यचंद्र डोळीयां खोली । निजवस्तु ॥१॥

सुर्यचांद्रचिये पोटीं । पहातां गगनाची दिठी । सुर्यचंद्राचे शेवटी । अग्नि आत्मा ॥२॥

सोहं अनुवृत्ति निज । जेथ जालें द्वैतबीज । कोहधारणा सहज । उदया आली ॥३॥

इंद्रिया सवडी जे निज । लपोनि ठेले वस्तुबीज । उघड डोळिया उघड सहज । दावियेले ॥४॥

सकार हकार तागडी तोली । पाहे ग्राहीकाची वाटुली । परि ग्राहक इयेवेळीं । मिळेचिना ॥५॥

वैष्णवावाचोनि आवडी । कोणा नामामृताची गोडी । रामनामाची तागडी कळेल कोणा ॥६॥

जरी उगवेळ प्रारब्ध । तरीच उमजेल हा बोध । जरी आपुला भाव शुद्ध । गुरुकृपा सहजेचि ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:51.1700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चून

  • न. ( कु . गो . ) नारळाची खरवड ; खवलेलें खोबरें . २ ( व . ) बेसन . ३ घासकामांत खालीं पडलेला पत्र्याचा भुसा ४ ( गो . ) चूर्ण ; औषधी पूड . [ सं . चूर्ण ; हिं . चून = पीठ , चूर्ण ] 
  • चून कांतून आनी उतर चिंतून पळौंचें 
  • (गो.) खोबरे काढले म्‍हणजे नारळ कसा आहे ते समजते. माणसाची परीक्षा त्‍याच्या प्रश्र्नोत्तरांवरून, त्‍याला प्रश्र्न टाकून कळून येते. 
  • n  Cocoanut-scrapings. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site