TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग १८

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग १८

मनाची चंचळता । मोडोनि स्वरुपीं पडला गुंता ।

मिळोनि गेलें आत्मया अनंता । मन मुकलें मनपणा ॥१८॥

टीकाः

जेथ उरलें नाहीं गगन । तेथ कैंचे शब्दपण । शब्दचि ना तेथ मन । कैंचे उरे ॥१॥

अवकाश अधिष्ठान । तेथेंचि जालें सुक्ष्म मन । शुद्ध संकल्प अतिगहन । महाशुन्यीं ॥२॥

रामकृष्णीं शुद्ध संकल्पा जे कां स्थिती निर्विकल्प । मनः संकल्पी विकल्प । उदेला कां ॥३॥

मनःसंकल्प नोहे शुद्ध । येरवी चिदानेदी बिद । स्वरुपी गुंतडा अगाध । जीवनाठायीं ॥४॥

शुद्धसंकल्प मनकमळी । जीवन चाले जीवनकळी । तेथ आपणचि जाली । विश्रांति की ॥५॥

स्वरुपीं गुंतलें मन । गुरुकृपेचें विज्ञान । परतले उन्मनपण । सनधान अखंड ॥६॥

शुब्दसंकल्प गेल विरोन । ऐसें रामकृष्णजीवन । श्वेतश्यामकळीं पुर्ण । आत्मया ऐसे ॥७॥

म्हणोनि आत्मा तो अनंत । जीवविला साक्षी जेथ । मिळोनि गेलियाजि तेथ । कैसेनि मन ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:46.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Gesneriaceae

  • शिलापुष्प कुल, जेस्नेरिएसी 
  • पाथरफोडी (शिलापुष्प) 
  • जेस्नेरिया डग्लसी इ. वनस्पतींचे (बियात दोन दलिका असलेल्या फुलझाडांचे) कुल, याचा अंतर्भाव पर्साएनेलीझ गणात करतात. प्रसार - उष्ण व उपोष्ण कटिबंध, प्रमुख लक्षणे- औषधी झुडपे, वृक्ष, वेली व काही अपि वनस्पती, पाने साधी, समोरासमोर, क्वचित थोडीफार विभागलेली, फुलोरा कुंठित, किंवा फुले एकेकटी, ती द्विलिंगी, पंचभागी, आकर्षक, संदले जुळलेली व तशीच प्रदले, केसरदले दोन, चार किंवा पाच, पाकळ्यांस चिकटलेली, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ, क्वचित अधःस्थ व जुळलेली, किंजपुटात एक कप्पा व अनेक बीजके, मृदुफळ किंवा शुष्कफळ (बोंड) 
  • बिया लहान, असंख्य, बाम्ही कुल, टेटुकुल व बंबाखू कुल याशी साम्य, पाथरफोडी औषधी आहे. ग्लॉक्सीनिया, जेस्नेरिया यांच्या जाती बागेत लावतात. 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.