श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २८

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अधिष्ठान ॐ कार मेळी । वेधिलें अष्टदळकमळीं ।

सोहंकारे लागली टाळी । चिन्मय भोंबरा ॥२८॥

टीका

ॐकार नादाचिये । मेळीं अधिष्ठान सहस्त्रदळीं । तेणें वेधिलें अष्टदळी । ब्रह्मचक्रा ॥१॥

टाळी लागली सोहंकारी । चिद्पात जे लहरी । उसळली चिंदाबरी । सहस्त्रदळीं ॥२॥

चिन्मयाची भोंवरी । नवलावें भोंवरा करी । भोवरीं फिरे सरोभरी । चंचळपणें ॥३॥

ब्रह्मचक्र सिवेनीपासोनि । भोवरां चिदाकाशगगनी चिंदुगगनाचें अधिष्ठानी । अवकाशी ॥४॥

सिवनीपासोनि सहस्त्रदळीं । एकचि येथ जाली टाळी । टाळी नामेचि उटाळी । स्वरुपाच्या ॥५॥

एकत्व आनाद्यनंत । ऐसा प्रत्यय बोलिले संत । अनुभव तोचि येथ । स्वरुपाचा ॥६॥

चिद्वस्तु हे सर्व व्याप्त । तेथेचि जडोनि गेले संत । पुर्णापर्नी सदोदित । अखंडचि ॥७॥

म्हणोनिं हें एकसुत्र । जोडे ब्रह्मासहस्रचक्र । ऐसे बोलिले ज्ञानेश्वर । गौप्य येथ ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP