TransLiteral Foundation

श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ३२

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग ३२

अलक्षमुद्रेचे लागतां ध्यान । हारपेलें देहाचे देहभान ।

योगी स्वरुपीं मिळोन । स्वरुपचि होती ॥३०॥

टीकाः

सहजाचें सहज ध्यान । घालिता सहज सहजा सन । तेणें सहज समाधान । सहजचि लाभे ॥१॥

ऐसे लागतां अलक्ष ध्यान । लक्षालक्षांचे मीलन । जीव शिव एकात्मपण । कोना कोण पहालें ॥२॥

म्हणोनि पहाणेंचि दर्शन । केवल पहाणें आत्म पण । जयांचें पहातां अधिष्ठान । आत्माचि उरे ॥३॥

जेथ जाले एकात्मपण । जैसे सागरीं लवण । किंवा इंधनी सर्पण । तैसे जाले ॥४॥

येथें नासिली त्रिपुटी । आत्मापणें आत्मया भेटी । तेथ द्वैतचिये गोष्टी । बोलोचि नये ॥५॥

स्वयें आत्माराम जाला । देहभाव सर्व निमाला । अवघा परिपुर्ण जाला । विश्वाकार ॥६॥

स्वरुपीं स्वरुपाचि जाला । ऐसा योग पहातां आगळा । तोचि ज्ञानराजें साधिलां । गुरुकृपें ॥७॥

काळ ग्रासोनि अग्निसीं मिळे । तेथ शुद्ध सत्व राहिलें । तेणें आत्मया व्यापिलें । सहस्त्रदळीं ॥८॥

प्रेमसुत्र येथ ओविलें । पंचप्राण नामी कोंडिलें । जीवनाचिये जीवन मेळे । शिवाचे जाले जीवपण ॥९॥

मग तें उरलें निरंजन । आत्मा राम स्वानंदघन । ज्ञानराज जाले आपण । सहजेचि ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:52.3600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नवरी

  • स्त्री. १ वधू . २ विवाहयोग्यता आलेली , उपवर मुलगी . ३ ( खा . ) पत्नी ; बायको ( प्रायः ऋतुस्नात न झालेल्या विवाहित मुलीस उद्देशून योजतात ). ४ उंसाच्या चरकाच्या दोन लांटांपैकी किंचित लहान असलेली ला‍ट ; मादी . ४ दाराच्या झडपांना असलेली लोखंडी पट्टी ; मादी . [ सं . नववरिका - नोवरिका - नोआरिआ - नवरिआ - नवरी - मसाप १ . २ . १० ] 
  • f  A bridge. A girl arrived at the marriageable age. 
  • स्त्री. ( व . ) ज्वारी खुडण्याची मजुरी देण्याची टोपली . आज खुडण्याचा भाव किती नवर्‍या आहे . 
  • स्त्री. ( सांकेतिक ) पैसा . नवरी कोट ( एक कोट रुपये ) पावली . - रा ३ . २२० . 
RANDOM WORD

Did you know?

Are the advertisements necessary on your pages?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.