TransLiteral Foundation

s siddharudhaswami

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हात

 • स्त्री. संवय ; खोड . तरुणपणाची ऐट आणण्याची विलक्षण हात होती . - महाराष्ट्रशारदा , नोव्हेंबर १९३६ . 
 • पु. 
  1. हस्त ; बाहु ; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग . कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग .
  2. कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप . हा पंचा साडेचार हात भरला .
  3. उजवी किंवा डावी बाजू . तरफ . आमचें घर वाडयाचे उजव्या हातास आहे .
  4. ताबा ; आटोका ; अधिकार ; खातें . तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं . ( कारक विभक्तींत प्रयोग ).
  5. स्वतः व्यक्तिगत मनुष्य . अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं .
  6. स्वामित्व ; कबजा ; मालकी ; ताबा . सांप्रत माझ्या हातीं पैसा नाहीं .
  7. हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप .
  8. डाव ; खेळ ( काठी , लाठी , पट्टा इ० शस्त्रांचा ). पट्टयाचे दोन हात करून दाखव .
  9. कर्तृत्वशक्ति ; अंग ; हस्तकौशल्य ( एखाद्या विषयांतील , कलेंतील ). त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे .
  10. कुलुपाची किल्ली ; चावी . कुलपाचा हात इकडे दे बघूं .
  11. सोंगटया , पत्ते इ० खेळांतील डाव , खेळण्याची पाळी , खेळ ; खेळणारा गडी . अजून आमच्यांतील एक हात खेळावयाचा आहे .
  12. हस्तक ; मदतनीस ; साहाय्यक ; हाताखालचा मनुष्य .
  13. ज्यावर दंड , जोर काडावयाचे तो लांकडी , दगडी ठोकळा ; हत्ती
  14. ( रंग देणें , सारवणें इ० कामीं ) वरून हात फिरविणें ; हातानें दिलेला थर , लेप .
  15. ठोंसा ; तडाखा ; हस्तक्रिया ( भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं ).
  16. ( तेली - घाणा ) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा .
  17. हात टेकावयासाठीं , हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग . खुर्चीचे - रहाटाचे - हात .
  18. हाताच्या आकाराची कोणतीहि वस्तु .
  19. ( सोनारी ) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार .
  20. ( नृत्य ) दोन हातांनीं मिळून करावयाचे अभिनयाचे प्रकार . हे ४० प्रकारचे आहेत .
  21. ( शिंपी ) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप ; गज .
  22. पान्हा ( नटबोलट फिरविण्याचा ). [ सं . हस्त ; प्रा . हत्थ ; हिं . गु . हाथ ; बं . हात ; आर्मे . जि . हय , अथ ; पॅलेस्टाईनजि . हस्त ; पोर्तुजि . बस्त ]
   म्ह०

   1. हात ओला तर मैत्र भला - नाहींतर पडला अबोला - जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात.
   2. हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा .
   3. हातपाय रोडया , पोट लोडया ; हातपाय काडया , पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा .
   4. हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे , तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबडयाच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्रय येतें .
   5. आपला हात जगन्नाथ ( जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून ) वाटेल तेवढें व तसें घेणें ; प्राचुर्य .
   6. हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे ( आपणांस मिळावयाचेंच आहे ) तें सोडून जे अनिश्चित आहे तें मिलविण्याच्या नादीं लागूं नये .
   7. हातच्या कांकणास आरसा कशाला ? ( हातांतील कांकण डोळयानें दिसण्यासारखें आहे , आरसा आणणें वेडेपणा )= जी गोष्ट उघड सिध्द आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं .
   8. हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें .
   9. हातपाय लुले तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ , मुजोर माणूस .
   10. हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें .
   11. हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडी नाहीं पण डौल बादशहाचा . ( वाप्र . )
   
 • ०आंखडणें देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें ; देण्याचें प्रमाण कमी करणें , बंद करणें . 
 • ०आटोपणें मारणें इ० हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.