मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|
प्रेषोच्चार

धर्मसिंधु - प्रेषोच्चार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.


'' ॐ भू० संन्यस्तं मया ॐभुवः संन्यस्तं मया ॐभूर्भुवः स्वः संन्यस्तं मया '' असें त्रिवार मंद, मध्य व उच्च अशा स्वरांत म्हणून '' अभयं सर्व भूतेभ्यो मत्तः स्वाहा '' या मंत्रानें उदक उदकांत टाकावें. नंतर शिखा उपटून यज्ञोपवीत हातांत घेऊन '' आपो वै सर्वा देवताः सर्वाभ्यो देवताभ्यो जुहोमि स्वाहा ॐभूः स्वाहा '' या मंत्रानें उदकांत उदकासह हवन करुन '' त्राहिमां सर्व लोकेश वासुदेव सनातन । संन्यस्तं मे जगद्योने पुंडरीकाक्ष मोक्षद ॥ युष्मच्छरणमापन्नं त्राहिमां पुरुषोत्तमः '' या मंत्रानें प्रार्थना करावी. यानंतर दिगंबर होऊन उत्तराभिमुख पांच पावलें जावें. विविदिषु असेल तर त्यास आचार्यानें नमस्कार करुन भगवें कौपीन आच्छादन देऊन दंड द्यावा. नंतर त्यानें कौपीन व वस्त्र परिधान करुन '' ॐ इंद्रस्य वज्रोसि सखे मां गोपाय '' या मंत्रानें दंड ग्रहण करावा. व '' वार्त्रघ्नःशर्म मे भव यत्पापं तात्निवारय '' हा मंत्र म्हणून प्रणवानें किंवा गायत्री मंत्रानें कमंडलु घ्यावा. '' इदंविष्णु० '' या मंत्रानें आसन घ्यावें. नंतर समित्पाणि होऊन गुरुला नमस्कार करावा व गरुडासन घालून बसून '' त्रायस्व भोजगन्नाथ गुरो संसारवह्निना । दग्धं मांकालदष्टंच त्वामहंशरणागतः ॥ योब्रह्माणं विदधाति पूर्वे योवेवेदांश्च प्रहिणोति तस्मै । तंहदेवमात्मबुद्धि प्रकाशं भुमुक्षुर्वैशरणमहं प्रपद्ये ॥ '' असें गुरुस म्हणावे. अशी गुरुची प्रार्थना केल्यावर दक्षिण जानु भूमिस्थ करुन गुरुचे पाय धरावे व '' अधीहि भगवोब्रह्मा '' असें म्हणावें. आपण ब्रह्मरुप आहों असें गुरुनें ध्यान करुन जलानें भरलेला शंख बारा प्रणवमंत्रांनी अभिमंत्रित करावा व त्या उदकानें शिष्यास अभिषेक करुन '' शन्नोमित्र० '' या मंत्रानें शांति पठन करुन शिष्याच्या मस्तकावर हात ठेवून पुरुषसूक्ताचा जप करावा. नंतर हदयावर हात ठेवून '' मम व्रते हहयं ते दधामि० '' इत्यादि मंत्राचा जप केल्यावर उजव्या कानांत प्रणवाचा उपदेश करुन प्रणवाचा अर्थ व पंचीकरणादि यांचा बोध करुन शिष्याची शाखा असेल तिला अनुरुन '' प्रज्ञानंब्रह्म अयमात्मा ब्रह्म तत्त्वमसि अहं ब्रह्मास्मि '' अशीं जीं ऋग्वेदादिक महावाक्यें आहेत त्यांतील कोणत्याही एका वाक्याचा अर्थबोध शिष्यास करावा. नंतर तीर्थाश्रमादि सांप्रदायानुसार नांव ठेवावें. त्यानंतर पर्यकशौच करवून योगपट्ट द्यावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP