मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|
आठ श्राद्धें.

धर्मसिंधु - आठ श्राद्धें.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


त्यांत आपस्तंब, हिरण्यकेशीय इत्यादिकांचा अग्नौकरणपिंडादिरहित सांकल्पिक प्रयोग आहे. आश्वलायन इत्यादिकांचा सपिंडक पार्वण आहे. त्यांत प्रथमतः सव्यानें यवोदकानें श्राद्धांगतर्पण करावें. तर्पणाच्या देवताः--

'' ब्रह्माणं तर्पयामि, विष्णुं तर्पयामि, महेश्वरं०, देवर्षीन्०, ब्रह्मर्षीन्०, क्षत्रर्षीन्०, वसून्०, रुद्रान्०, आदित्यान्०, सनकं०, सनंदनं०, सनातनं, पंचमहाभूतानि०, चक्षुरादिकरणानि०, भूतग्रामं०, पितरं०, पितामहं०, प्रपितामहं०, मातरं०, पितामहीं०, प्रपितामहीं०, आत्मानं०, पितरं०, पितामहं०, ''

असेंच नदी इत्यादि तीर्था तर्पण करुन घरी आल्यावर देशकालांचें स्मरण करावें व

'' करिष्यमाण संन्यासांगत्वेनाष्टौ श्राद्धानिपार्वणविधिनान्नेनामेन वा करिष्ये ''

असा संकल्प करुन क्षण द्यावा. या श्राद्धांत सर्व कर्म नांदीश्राद्धाप्रमाणें करावें; ह्नणून अपसव्य नाहीं. तिलस्थानीं यव घ्यावे. ब्राह्मणांची संख्या सम असावी; ह्नणजे देवस्थानी दोन व आठ श्रांद्धांचे सोळा मिळून अठरा ब्राह्मण सांगावेत.

'' सत्यवसु संज्ञका विश्वेदेवा नांदीमुखाः स्थानेक्षणः कर्तव्यः ''

असें म्हणून एका ब्राह्मणास वरुन दुसर्‍या ब्राह्मणास वरावें. याचप्रमाणें पुढेंही जाणावें. पहिल्या देवश्राद्धीं,

'' ब्रह्मविष्णुमहेश्वरा नांदीमुखाः स्थानेक्षणः ''

दुसर्‍या ऋषिश्राद्धी

'' २ देवर्षि ब्रह्मर्षि क्षत्रर्षयः नांदी मुखाः स्थाने०'' तिसर्‍या दिव्यश्राद्धीं ''

३ वसुरुद्रादित्यानांदी '' चवथ्या मनुष्यश्राद्धी '' ४ सनकसनंदनसनातना नांदी '' पांचव्या भूतश्राद्धी

'' ५ पृथिव्यादि पंचमहाभूतान्येकादशचक्षुरादिकरणादिचतुर्विधभूतग्रामानांदी०''

सहाव्या पितृश्राद्धी '' ६ पितृपितामहप्रपितामहानांदी० '' सातव्या मातृश्राद्धी '' मातृपितामही प्रपितामह्यो नां० '' व आठव्या आत्मश्राद्धी '' ८ आत्मपितृपितामहा नांदी० '' ' पितृपितामह ' या स्थानी ' आत्मांतरात्मापरमात्मा ' असा उच्चार करावा, असें कोणी म्हणतात. याप्रमाणे दोन दोन ब्राह्मण वरावे. सर्व ठिकाणीं नांदीमुख हें विशेषण योजावें. ब्राह्मणांची संख्या सम असावी व देव सत्यवसु किंवा दक्षक्रतु घ्यावे. नंतर सर्व ब्राह्मणांस पाद्य देऊन पूर्वाभिमुख व उत्तर संस्थ बसवून

'' संन्यासार्थमहं श्राद्धं कुर्वे ब्रूत द्विजोत्तमाः । अनुज्ञां प्राप्य युष्माकं सिद्धिं प्राप्स्यामि शाश्वती ॥ ''

अशी त्यांची प्रार्थना करावी. अशी प्रार्थना केल्यावर '' कुरु '' असें ब्राह्मणांनी प्रतिवचन दिल्यावर यवासह सरळ दोन दूर्वा इत्यादि घेऊन उदकदान करावें व संबुध्यंत उच्चार केल्यावर '' इदमासनं '' असें ह्नणून अठरा ब्राह्मणांस आसन द्यावें. नंतर आश्वलायनांनीं अर्घ्य पात्रें मांडावींत. आपस्तंबादिकांचा सांकल्पिक विधि असल्यास अर्घ्य नाहीं. देवांकरितां एक व आठ पार्वणांकरितां आठ मिळून नऊ पात्रें मांडावीत. सर्वत्र दोन दोन पवित्रकांनी आच्छादिलेल्या पात्रांत '' शंन्नोदेवी०'' या मंत्रानें उदक घालून विश्वेदेवपात्रांत '' यवोसि०'' या मंत्रानें यव टाकावेत. आठ पात्रांत '' तिलोसि०'' या मंत्राच्या ऊहानें यव टाकून गंधादिकानें पूजा करावी. तो ऊह असाः--

'' यवोसि सोमदेवत्यो गोसवे देवनिर्मितः । प्रत्नवद्भिःप्रत्तःपुष्ट्या नांदीमुखान् देवान् प्रीणयाहि नः स्वाहानमः ''

या मंत्रानें पहिल्या पात्रांत, '' नांदीमुखानृषीन्० '' असा दुसर्‍या पात्रांत, तिसर्‍यांत '' नांदीमुखान्दिव्यान्प्री० '' चवथ्यांत '' नांदीमुखान्मनुष्यान्प्री० '' पांचव्यांत '' नांदीमुखानि भूतानि प्री० '' सहाव्यांत, सातव्यांत व आठव्यांत '' नांदी० पितृन्प्रीणया० '' इत्यादिक ऊह जाणावा. एकेक पात्र दोन दोन वेळ वांटून सर्वत्र '' या दिव्या० '' हा मंत्र म्हटल्यावर '' विश्वेदेवानांदीमुखाइदंवोर्घ्य '' असें म्हणून अर्घ्य द्यावे, व '' ब्रह्मविष्णुमहेश्वरा नांदीमुखा इदं वोर्घ्य स्वाहानमः '' इत्यादि प्रकारानें यथायोग्य सोळा ब्राह्मणांचे हातांवर अर्घ्य द्यावे. नंतर '' या दिव्या '' या मंत्रानें स्त्रवणार्‍या उदकाचें अनुमंत्रण केल्यावर पात्र उपडें करुन गंधादिकापासून आच्छादनापर्यत पूजा करावी. पूजा करतांना सर्वत्र संबुध्यंत नांदीमुख विशेषणयुक्त उच्चार करावा. भोजनपात्रें मांडून ब्रह्मादिक सोळा ब्राह्मणाचे हातांवर '' अग्नयेकव्यवाहनाय स्वाहा, सोमाय पितृमते स्वाहा '' या दोन मंत्रांनीं दोन आहुति द्याव्या. आपस्तंब इत्यादिकांस हें अग्नौकरण नाही. पात्राला तूप लावून अन्न वाढावें, अन्न नसल्यास आमान्न किंवा त्याचा निष्क्रय प्रोक्षण करुन '' पृथिवीते पात्रं० '' इत्यादि मंत्रांनी दैवतानुसार अन्नाचा किंवा आमान्नाचा त्याग करावा. यावर '' ये देवास०, प्रजापतेन० ब्रह्मार्पणं ब्रह्म० अनेनाष्ट श्राद्धेन नांदीमुखा देवादयः प्रीयंतां '' असें म्हणून उदक सोडावें. आपोशन दिल्यावर चित्राहुति वर्ज्य करुन ब्राह्मणांनी भोजन करावें. तृप्त झाल्यावर '' उपास्मै० अक्षन्नमी० संपन्नं० '' असें विचारिलें असतां सर्व ब्राह्मणांनी '' रुचिरं '' असें म्हणावें. आमान्न असल्यास हें नाही. आंचवल्यावर यव, लाह्या, दहीं व बोरें यांनीं युक्त असलेल्या अन्नाचे अठ्ठेचाळीस पिंड करुन पश्चिमेकडून पूर्वेकडे काढलेल्या व उत्तरेकडे समाप्त केलेल्या अशा आठ रेषा काढून त्यांवर उदक सिंचन करावें व कुश किंवा दूर्वा पसरुन चोवीस पिंडस्थानी उदक सिंचन करावें. तें असेः-- '' शुंधंतां ब्रह्मणोनांदीमुखाः शुंधंतां विष्णवोनांदीमुखाः शुंधंतां महेश्वरानांदी० '' असें म्हणून पहिल्या रेषेवर त्याच्या उत्तर रेषांवर '' शुंधंतां देवर्षयोनां० शुंधंतां ब्रह्मर्षयोनांदी० '' इत्यादि ऊह जाणावा. नंतर '' ब्रह्मणेनांदीमुखाय स्वाहा '' असें म्हणून एक पिंड द्यावा व दसराही असाच द्यावा किंवा मंत्ररहित द्यावा. याप्रमाणें प्रत्येक देवतेस दोन पिंड द्यावे व पुढेंही '' विष्णवेनांदीमुखाय स्वाहा '' इत्यादि स्वाहांत पिंड देण्याचे मंत्र जाणावे. '' अन्न पितरो मादयध्वं '' इत्यादिकांपासून पुनः शुंधंतां येथपर्यत तंत्र, अंजन, अभ्यंजन हीं कृताकृत आहेत. पिंडांची गंधादिकानें पूजा करुन नमस्कार करावा व '' उपसंपन्नं '' असें म्हणून पिंडाचें विसर्जन करुन ब्राह्मणांस दक्षिणा देणें इत्यादि तंत्न करावें. हें पिंडदानादिक आपस्तंबांदिकांस नाहीं. कात्यायन शाखीयांस आश्वलायनाप्रमाणें पिंडदानादिक आहे.

अष्टश्राद्धें झाल्यावर त्या दिवशीं किंवा दुसर्‍या पिवशीं शिखेचे सहा केश ठेवून कक्षोपस्थ केश, श्मश्रु, नखें इत्यादिकांचें वपन करवून स्नान करावें व कौपीन, आच्छादनादि व होमद्रव्य यांखेरीज इतर सर्व द्रव्यादिक ब्राह्मण व पुत्र यांस द्यावें. कौपीन, छाट्या इत्यादिकांस कावेचा रंग देऊन त्वचायुक्त बांबूचा दंड, शिर, भिंवया किंवा ललाट यांतून कोणत्याही प्रमाण उंचीचा समूल असून अंगुल परिमित जाड, ब्राह्मणानें आणलेला असावा व अकरा, नऊ, चार व सात यांतून कोणत्याही परिमित पेरांच्या गांठींनी युक्त व मुद्रायुक्त असा दंड मिळवून प्रणव पुरुषसूक्त व केशवादि नामांनीं शंखोदकानें स्नान घालून ठेवावा. नंतर कमंडलु, कौपीन, आच्छादन, कथा व पादुका ठेवाव्या. शिंके, पात्रादिकही ठेवावी, असें कोणी म्हणतात.

देशकालांचें संकीर्तन केल्यावर '' अशेष दुःख निवृत्ति निरतिशयानंद प्राप्ति परमपुरुषार्थ प्राप्तये परम हंसाख्य संन्यास ग्रहणं करिष्ये । तदंगतया गणपति पूजन पुण्याहवाचनमातृका पूजन नांदीश्राद्धानि करिष्ये ॥ '' असा संकल्प करुन नांदीश्राद्धें केल्यावर '' ब्रह्मणेनमः विष्णवे० रुद्राय० सूर्याय० सोमाय० आत्मने० अंतरात्मने० परमात्मने० अग्निमीळे० ऋक्, इषेत्वोर्जेत्वा० अग्न आयाहि० ऋक्, शन्नोदेवी० ऋक् '' असा जप करावा. जप झाल्यावर सातूंचें पीठ तीन मुठी प्रणव मंत्रानें तीनदां प्राशन करुन '' आत्मने स्वाहा, अंतरात्मने स्वाहा, परमात्मने स्वाहा, प्रजापतये स्वाहा, ॥ '' या मंत्रानें नाभीस स्पर्श करावा. नंतर दूध, दहीं यांनी मिश्रित घृत किंवा उदकच '' त्रिवृदसि '' या मंत्रानें पहिल्यानें, '' प्रवृदासि '' या मंत्रानें दुसर्‍यानें, '' विवृदासि '' या मंत्रानें तिसर्‍यानें, प्राशन करावें व '' आपःपुनंतु '' या मंत्रानें उदक प्राशन करुन आचमन करुन '' उपवासं करिष्ये '' असा संकल्प करावा.

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP