मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
अर्घ्यपात्राचे स्थापन

धर्मसिंधु - अर्घ्यपात्राचे स्थापन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आता अर्घ्यपात्राचे स्थापन सांगतो - ब्राह्मणाच्या अग्रभागी दक्षिण दिशेस अग्रे होतील असे तीन तीन दर्भ आस्तीर्ण करून त्या दर्भावर आग्नेयीसंस्थ प्रत्येक पार्वणास तीन तीन पात्रे मांडून पितृपात्राचे पश्चिम प्रदेशी मातामहादि पार्वणांची प्रत्येक पार्वणी एक ब्राह्मण असा किंवा नऊ ब्राह्मण असा पक्ष यापैकी कोणताही पक्ष असला तरी तीनच पात्रे मांडावी. एक ब्राह्मण असेल तर त्याच्याच हातावर तीन अर्घ्ये द्यावी. नऊ ब्राह्मण इत्यादि पक्ष असेल तर एकेक अर्घ्यपात्र ३।३ ब्राह्मणास वाटून द्यावे. प्रत्येक पात्रावर दक्षिण दिशेस अग्रे होतील असे मध्ये मोडून दुप्पट केलेले साग्र किंवा निरग्र ३।३ कुश ठेवावेत. पितृ-तीर्थाने त्या अर्घ्यपात्रात उदक घालून 'शन्नोदेवी' या मंत्राने सर्व पात्राचे एकवार अभिमंत्रण आश्वलायनांनी करावे. आश्वलायनशाखीयांहून भिन्न असलेल्या कात्यायनादि शाखीयांनी 'शन्नोदेवे' या मंत्राने प्रत्येक पात्रात मंत्रावृत्तीने उदक घालावे, हिरण्यकेशीय तर 'शन्नोदेवी' हा मंत्र इच्छित नाहीत. सर्वांच्या मताने 'तिलोसि' या मंत्रावृत्तीने प्रत्येक पात्रात तिल घालावे. येथे पितृशब्दाचा ऊह करु नये असे सांगितले आहे. गंधादिक द्रव्ये टाकणे ती पूर्वीप्रमाणे टाकावी. यावर 'पित्रर्घ्य पात्रं संपन्न' इत्यादि जसे लिंग असेल त्याप्रमाणे संपत्ति वदवून उदक देऊन दक्षिणाभिमुख व्हावे; व डावा हात कुशतिलांनी युक्त असा ब्राह्मणाच्या डाव्या गुडघ्यावर ठेवून पितृपितामहांचा द्वितीयाविभक्त्यंत उच्चार करून 'भवासुआवाहइष्ये' असे म्हणून पंक्तीच्या आरंभी बसलेल्या ब्राह्मणांस प्रश्न करावा. सर्व ठिकाणी पंक्तीचा पहिला ब्राह्मण असेल त्यासच प्रश्न करावा. 'आवाहय' अशी अनुज्ञा झाल्यावर 'उशंतस्त्वा' या मंत्रावृत्तीने 'अमुकममुकनाम गोत्र रूपमावाहयामी' असे म्हणून प्रत्येक ब्राह्मणाचे मस्तकापासून पायापर्यंत अंसादिक युग्म अंगावर तिल टाकून आवाहन करावे. याप्रमाणे सर्व ब्राह्मणांचे आवाहन केल्यावर 'आयंतुनः पितरः' या मंत्राने एक वेळापार्थना करावी. या स्थानी कात्यायन शाखीयांनी 'नमोवः पितरः' इत्यादिकांपासून 'इह संतस्याम' येथपर्यंत मंत्राने अर्चन सांगितले आहे. आवाहनाविषयी सव्य व अपसव्य यांचा विकल्प आहे. आवाहन करून हातावर शेष राहिलेले तिल ब्राह्मणाच्या अग्रभागी भूमीवर टाकून 'पित्रदर्भपात्रसंपत्तिरस्तु' असे म्हणून प्रतिवचन मिळाल्यावर सव्य करून उदक देऊन भूमीवर आस्तीर्ण केलेल्या दर्भासहित एकेक अर्घ्यपात्र दोन्ही हातांनी उचलून ब्राह्मणाच्या अग्रभागी 'स्वधार्घ्याः' या मंत्रावृत्तीने स्थापन करावे. ब्राह्मण एक असेल तर एकाच्याच अग्रभागी तीन पात्रे मंत्रावृत्तीने स्थापन करावे. ब्राह्मण एक असेल तर एकाच्याच अग्रभागी तीन पात्रे मंत्रावृत्तीने स्थापावी. नऊ ब्राह्मण असतील तर पितृस्थानी जे तीन ब्रह्मण त्यातील मुख्य ब्राह्मणाच्या अग्रभागी मंत्राने पात्रे स्थापन करावीत. याप्रमाणे पितामहादिकांचे स्थानी मुख्याचे अग्रभागीच पात्रे स्थापन करावी, याप्रमाणे प्रत्येक पार्वणाचे वेळी 'स्वघार्घ्याः' असा तीन वेळच उच्चार करावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP