TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
श्राद्ध शब्दाचा अर्थ.

धर्मसिंधु - श्राद्ध शब्दाचा अर्थ.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


श्राद्ध शब्दाचा अर्थ.

मृत पिता इत्यादिकांस उद्देशून विहितकालीं व देशीं पक्वान्न, आमान्न व हिरण्य यांतून कोणत्याही एका द्रव्याचें विधियुक्त दान करनें तें श्राद्ध होय. त्यांत अग्नौकरण, पिंडदान व ब्राह्मणभोजन हें प्रधान आहे. कारण होम, पिंडदान व ब्राह्मण भोजन या तीन कर्मांनीं मिळवून झालेल्या विशिष्ट कर्मास श्राद्ध असें म्हटलें आहे. क्वचित् स्थळीं वचनावरुन किंवा सामर्थ्य नसल्यामुळें पिंडदानादिक न केलें तरी ब्राह्मणभोजनादि मात्र करणें तें श्राद्ध होय. असा श्राद्ध पदाचा अर्थ सिद्ध होतो. याप्रमाणें चौथ्या पदाचा अर्थ सांगितला. तसेंच दुसरेंही वचन आहे तें असें :--- "पिंडदान हेंच यजुःशाखीयांचें श्राद्ध होय, द्विजांचें पूजन हेंच ऋक्‌शाखीयांचें श्राद्ध होय, व पिंडदान व ब्राह्मणपूजन हें सामवेदीयांचें श्राद्ध होय." पितर नाहींत असें अश्रद्धेनें मानून जो श्राद्ध करीत नाहीं त्याचे पितर रुधिरपान करितात.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-28T05:56:30.8100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खडक

  • पु. १ मोठा दगड ; पत्थराची जमीन ; दगडाची रांग ; कातळ ; शिळा , धोंडा ; खडपा ; पाषाण . ' ज्वालामुखींतुन चळवळींत रस बाहेर घेऊन ... त्याचें थराथर थर बसतात . या थरांतील उष्णता निघुन गेली म्हणजे त्यांचेच खडकाचे थर बनतात .' - सृष्टि ( खगोल ) ३८ . २ कातळांचा समुह ; शिला . ३ मोठा खडक ; कातळ . ४ ( ल .) कठोर , अंतःकरणाचा ; पाषाण . हदयीं माणुस . ' खडकाशीं धडका घेऊन काय फळ . ' म्ह०खडकावर पेरलें व्यर्थ गेलें . - वि . १ वाळुन कोरडा ठणठणीत झालेला ; खडखडीत ( धुतलेलें कापड , काष्ठ ); ' हीं काष्ठें खडक झाली आहेत .' अगदी कोरडी , आटलेली ( विहीर , तळें गाई - म्हशींची कास , किंवा एखाद्या स्त्राचें स्तन ). ३ लक्ख ; चकचकीत ( प्रभात , उषा ). ४ तीव्र , कडक ( ऊन , भूक .) याशिवाय आत्यंतिक , पुर्ण , तीव्र याअर्थी वापराअत . कित्येक वेळी ' कडक ' शब्दबद्दलहि योजतात . ( सं . काठ = खडक , दगड ; काठक . तुल० ध्व . खड ; किंवा सं . कटक ; प्रा . कटग - पर्वतभाग , माची ) ( वाप्र .) 
  • ०लागणें नफा किंवा सुपारिणामाची आशा धरली असतां निष्फळ होणें . ' त्यांचे घरी रुपयांसाठीं गेलो होतों परंतु तेथें खडक लागला . ' खडकावर पोट भरणें - कोठेंहि पोट भरणें . सामाशब्द - 
  • ०खडक खडक (- वि .) पहा . 
  • खडक लागणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.