मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत विसोबा खेचर महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत निवृत्तीनाथ संत महात्मा बसवेश्वर संत कबीर दास संत गाडगेबाबा संत सावता माळी संत वेणाबाई संत सेवालाल महाराज संत महदंबा संत जनाबाई माहिती संत मीराबाई संत गुलाबराव महाराज संत विसोबा खेचर संत दामाजी पंत संत नरहरी सोनार संत रोहिदास संत जगनाडे महाराज संत चोखामेळा संत गोरा कुंभार संत मुक्ताबाई संत जगमित्र नागा संत परिसा भागवत जोगा परमानंद राका कुंभार संत भगवानबाबा संत वामनभाऊ संत सखू काशिबा महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज संत नामदेव संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत विसोबा खेचर संत विसोबा हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले Tags : bookmarathi booksantvisobaपुस्तकमराठी पुस्तकविसोबासंत संत विसोबा खेचर Translation - भाषांतर संत विसोबा हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. संत विसोबा खेचर हे शैव पंथीय होते; परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशीही जवळचा संपर्क आला. विसोबा खेचर हे खरेतर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करत असत; परंतु एकदा संत ज्ञानेश्वर यांच्या पाठीवर संत मुक्ताबाई यांनी मांडे भाजले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले संत विसोबा संत ज्ञानेश्वरांना शरण गेले. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !एकदा संत नामदेव महाराजांना पांडुरंग म्हणाला, तुझ्या जीवनात सद्गुरु नाहीत. जोपर्यंत तुझ्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत तुला माझ्या निर्गुण निराकार सत्य स्वरूपाची ओळख पटणार नाही. तू विसोबा खेचर यांना भेट. ते मोठे सत्पुरुष आहेत. ते तुला दीक्षा देतील.पंढरपूर तालुक्यात असलेल्या कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिरातील शिवपिंडी ! येथेच संत विसोबा आणि नामदेव महाराज यांची भेट झाली.पांडुरंगाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले. एका ज्योर्तिलिंग मंदिरात त्यांचे सद्गुरु विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांची अवस्था पुढीलप्रमाणे होती : एका वृद्ध पुरुषाप्रमाणे त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून पू वहात होता. त्यांच्या अंगावर असलेल्या सर्व जखमांवरून माशा फिरत होत्या. अंगाला दुर्गंधी सुटली होती. पायात तेलाने लडबडलेल्या वहाणा घालून शंकराच्या पिंडीवर त्यांनी आपले चरण ठेवले होते. आपल्या भावी सद्गुरूंची अशी दुरावस्था पाहून नामदेव महाराजांना खूप दु:ख झाले; पण संत विसोबा खेचर नाटकच करत होते. हे नामदेव महाराजांना ज्ञात नव्हते.बार्शी, जिल्हा सोलापूर येथील उत्तरेश्वर मंदिराच्या बाजूला असलेली संत विसोबा यांची समाधी ! तिचे भावपूर्ण दर्शन घेऊया.नामदेव महाराज संत विसोबा यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, अहो, तुम्ही शंकराच्या पिंडीवर आपले पाय ठेवून बसला आहात ? चला, उठून नीट बसा. त्यावर संत विसोबा खेचर नामदेव महाराजांना म्हणाले, बाबा रे, काय करू ? इतका देह क्षीण झाला आहे की, मी हलू शकत नाही. ती वात्रट मुलं आली, त्यांनी माझे पाय धरले आणि पिडींवर नेऊन ठेवले. पाय हलवायचेसुद्धा त्राण उरले नाहीत. त्यामुळे तूच आता माझ्यावर कृपा कर आणि जिथे पिंडी नाही, तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांना त्यांचे बोलणे स्वाभाविक वाटले आणि त्यांनी त्यांचे चरण उचलून बाजूला केले, तर तिथे पुन्हा पिंडी तयार झाली. ज्या दिशेने पाय हलवावेत, त्या दिशेने पिंड ! हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले.श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या या शिवपिंड्या म्हणजे नामदेव महाराजांना संत विसोबायांनी ईश्वर सर्वत्र असल्याची अनुभूती दिल्याचे पवित्र स्थान !जेव्हा नामदेव महाराजांनी आश्चर्याने विसोबांकडे पाहिले,तेव्हा त्यांच्या शरिराची सर्व दुर्गंधी नाहीशी झाली होती.अगदी तप्त मुद्रांकित ब्राह्मण, असे एकदम तेजस्वी शरीर नामदेव महाराजांना दिसले.संत विसोबा यांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला, त्या क्षणी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग दिसायला लागले.पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे खरोखर हे अधिकारी पुरुष आहेत,याची खात्री पटताच नामदेव महाराजांनी ताबडतोब संत विसोबा यांचे चरण धरले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. N/A References : N/A Last Updated : September 04, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP