मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत बहिणाबाई महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत बहिणाबाई महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : bookmarathi booksantपुस्तकमराठी पुस्तकसंत संत बहिणाबाई Translation - भाषांतर संत बहिणाबाई (जन्म : इ.स. १६२८ (शके १५५१); मृत्यू २ ऑक्टोबर १७००). संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे.बहिणाबाई पाठकजन्म अंदाजे इ.स. १६२८देवगावीमृत्यू अंदाजे इ.स. १७००राष्ट्रीयत्व भारतीयनागरिकत्व भारतीयपेशा वैद्यकीयजोडीदार रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठकवडील जानकीआई आउजी कुलकर्णीसंत बहिणाबाई – जीवनबहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होती.संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्यास घेतला.तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले.तिने आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि ‘श्री गजानन विजय’कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात. पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर … त्यांच्या अभंगांंपैकी ‘संत कृपा झाली। इमारत फळा आली ॥ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि “घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥ हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे.संत बहिणाबाई – चमत्कारअसे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय. संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले.या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा : नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला. परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, “ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन.” ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या.त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.संत बहिणाबाई – रचनाबहिणाबाईंचे एकूण ७३२ अभंग प्रकाशात आले आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे. संपूर्ण अभंग असा –संत कृपा झाली इमारत फळा आली |ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |तुका झालासे कळस भजन करा सावकाश |बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा || N/A References : N/A Last Updated : September 01, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP