मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची|
संत शेख महंमद

संत शेख महंमद

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे.


सोळाव्या शतकातील संत परंपरेतील साहित्य क्षेत्रातील सर्वांत श्रीमंत संत कोणते असतील तर संत शेख महंमद महाराज. मुस्लिम समाजात जन्म घऊन सुध्दा तमाम बहुजन समाजाच्या उध्दारासाठी साहित्य लिहून ठेवले मात्र ज्यांच्या साठी लिहून ठेवले त्यांना त्याची किंमत कळाली नाही असेच म्हणवे लागले. त्यांनी १० ग्रंथ लिहीले पैकी काही प्रकाशीत झाले तर अझुनही काही ग्रंथ अप्रकाशीत आहेत. १ ) योगसंग्राम २) पवन विजय ४) निष्कलंक प्रबोध ४) साठी संवत्सर ५) स्फुट रचना ६) अभंग ७) गायका ८) मदालसा ९) हिंदी कवीता १०)  ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले आहेत. यामध्ये योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. यात १८ अध्याय आहेत. वरील ग्रंथापैकी साठी संवत्सर व ज्ञान गंगा हे ग्रंथ अप्रकाशीत आहेत.
शेख महंमद – वाहिरा येथील सनद
वाहिरा येथील- (सनदेचा मजकूर) (मूळ मजकूर उर्दू) त्याचा मराठीत मजकूर असा-
1277 हिजरी रोजी सनद सादर होऊन मौजे वाहिरे व नालकोल रुई 3 चाहुर व 1 चाहुर असे एकूण चार चाहूर जमीन वंशपरंपरेने उपभोग घेऊन आशीर्वादाप्रित्यर्थ बहाल इनाम सनदशीर इस्त्रीईलखान यांनी मशिदीची दिवाबत्ती करून खिदमत करावया करता बहार इनाम दिलेले आहे शेख महंमद यांचे मुलगे ह्यांनी वंशपरंपरेने उपभोग घ्यावा सनदेचा कोणीही हुजूर करू नये असे फर्मावले आहे.
नखळ अल्लाहू परवाना मुहर मुरोद आलमगीर बादशाह अजफरार साह गरह मूहर 1077 मुहर मुताबिक 10 जुळूस वालद मुस्तादयीन महमातहाळ व इस्तकबाळ परगना  पांडेपेडगाव मानोर.
मोगल सत्तेला वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज यांना इनाम जमीन द्यावीशी वाटली या घटनेतून महाराजांचे सामर्थ्य स्पष्ट होते. स्वतःला जिंदा पीर म्हणविणारा आलमगीर बादशहा संत शेख महंमद महाराजांना शरण आला.शेख महंमदम हाराजांच्या अध्यात्मज्ञानाचा साक्षात्कार हेच महत्त्वाचे कारण ठरते. निजाम, निजामशाहीतील अनेक अधिकारी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असलेले शूर सेनानी सरदार मालोजीराजे यांनी संत शेख महंमद महाराजांचे गुरुत्व स्वीकारले. शस्त्र, शक्ती आणि महत्वकांक्षा यांच्या आधीन असलेल्या व्यक्ती केवळ दिव्यज्ञानापुढेच  शरण येत असतात. संत शेख महंमद महाराजांपुढे अवघ्या भरतखंडाला हादरे देणार्‍या राजकीय व्यक्ती शरण आल्या ही त्यांच्या संतत्वाची शक्ती आहे. दिव्यज्ञानच नवसमाज घडवू शकते हे संतांनी जाणले होते. मरगळलेल्या समाजाला तेजस्विता आणि तत्परता या गुणांनी उजळण्याचे कार्य संत शेख महंमद महाराजांनी केले.
मालोजीराजेंचे ‘आशिर्वाद प्रित्यर्थ’ बहाल इनाम…
मालोजीराजे यांचे श्रीगोंदामार्गे जाणे येणे असायचे. वेरूळवरून शिखर शिंगणापूरला जाताना एकदा श्रीगोंदा येथे थांबले. शेख महंमद महाराजांची कीर्ती ते ऐकून होते. शेख महंमद महाराजांच्या भेटीनंतर शेख महंमद हे थोर सिद्धपुरूष आहेत. ते ज्ञानी, योगी, तपस्वी आहेत. साक्षात अवतारी पुरूष आहेत. मालोजीराजे व बाळाजी कारभारी यांनी शेख महंमद महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले. मालोजीराजे व बाळाजी कारभारी यांनी शेख महंमद कडून अनुग्रह घेतला. आणि पाच चाहूर जमीन इनाम देऊन आजच्या मठास कोट विहीर बांधून दिली. इनाम पत्र दिले ते असे आहे.
तुम्ही आमचे गुरू आहात व आपण तुमचे शिष्य आहो. म्हणून पाच चाहूर खरेदी जमिनीतून बारा बिघे इमान तुम्हास मुकर्रर दिला असे, यास जर कोणी दावा करील तर त्यास आपण वारू. यामुळे शेख महंमद महाराजांना मालोजीराजे भोसले ह्या वजनदार व मातब्बर मनसबदारांचा  आश्रय लाभला होता. पुढे शहाजी राजे हे सुध्दा शेख महंमद महाराजांना गुरु मानत.
मोगल सत्तेने वाहिरा येथे इनाम जमीन दिली व मालोजीराजे यांनी श्रीगोंदा येथे इनाम जमीन दिली. यावरून संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा व वाहिरा येथे जास्त काळ वास्तव्यात होते. त्यांची कर्मभूमी वाहिरा व श्रीगोंदा होती.
शेख महंमद – लौकीक प्रपंच
शेख महंमद महाराजांना वारकरी व सुफी संप्रदायाचा वारसा घरातुनच लाभला होता.
वडील राज महंमद यांनी आपल्या तोडीस तोड घराण्यातील फातीमाबाई (फातीमाबी) या मुलीशी शेख महंमदाचा विवाह लावून दिला. पुढील काळात फातीमाबाई या महाराजांच्या सर्व कार्यात सक्रीय होत असतील.
फतीमाबी आणि शेख महंमद महाराज यांचे पती-पत्नी संबंध, कुटूंब व संसारीक स्थिती याचे कुठेही स्पष्ट उल्लेख अढळत नाही.
त्यांच्या पत्नी फतीमाबी या धार्मिक वृत्तीच्याच असाव्यात कारण जर त्यांना तसा विरोध झाला असता तर त्यांनी लेखणात ऐनकेनप्रकारे व्यक्त केला असता.
त्यांना दावलजी, अजमजी, हकीमजी ही तीन मुले झाली.
संत शेख महंमद महाराज व फातीमाबी या दांपत्याचे संस्कार मुलांवर झाले.
एकुण संपूर्ण घराणेच वारकरी संप्रदयाचा विचार जाणत होते.
संत शेख महंमद महाराजांची योगसाधना व विद्वत्वा याचा विचार करता त्यांच्या तिनही मुलांनी
दावलजी, अजमजी, हकीमजी यांनी महाराजांना गुरु मानुन दिक्षा घेतली असावी.
शेवटच्या टप्प्यामध्ये फतीमाबी यांनीही शेख महंमद महाराजांना सोब समाधी
घेण्यासंबंधी गळ घातली असणार म्हणून श्रीगोंदा येथे व वाहिरा येथे सपत्नीक समाधी आहे.
संत शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधी काळ
संत शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधीकाळा संदर्भात अभ्यासकांमध्ये एकमत पहायला मिळत नाही.
जसे अनेक संतांच्या बाबतीत घडते तसेच महाराजांच्या बाबतीतही घडत आहे.
डॉ. भिमा मोदळे यांनी संत कवी शेख महंमद:
एक चिकित्सक अभ्यास या पुणे विद्यापीठात सादर केलेल्या टंकलिखीत प्रबंधात
संत शेख महंमद महाराजांच्या जन्मशकांविषयीच्या मतभिन्नतेचा साक्षेपाने आढावा घेतला आहे. त्यानुसार
चरित्रकार बा.ना.शिंदे यांच्या मते शके १५४८ (इ.स.१६२६)
महाराष्ट्र सारस्वत पुरवणी लेखक शं.गो. तुळपुळे यांच्या मते शके १४८२ (इ.स.१५६०) जन्मकाल नोंदवला आहे.
तर श्रीगोंद्यातील मठात, फलकावर नोंदवल्या प्रमाणे शके १५४८ असा दिलेला आहे.
मालोजीराजे यांनी मठ उभारणीसाठी दिलेल्या चकनाम्याची घटना इ.स.१५९५अशी आहे.
जयरामस्वामींच्या समाधीचा (इ.स.५ सप्टेंबर १६७२)
उल्लेख व त्यानंतर संत शेख महंमद महाराजांची समाधी
सुमारे अडीच वर्षांनंतर झाली असे गृहीत धरुन महाराजांचे समग्र साहित्य संपादक
वा.सी.बेंद्रे महाराजांचा समाधीकाळ इ.स. १६७२ असा मानतात.
डॉ.गं.ना. मोरजे यांच्या नोंदीप्रमाणे बेंद्रे यांनी इ.स. १५६० ते १६६० असा शेख महंमदांचा काळ मानला आहे.
ही मतभिन्नता लक्षात घेऊन डॉ. भिमा मोदळे यांनी शेख महंमद महाराजांचा कालखंड तारतम्याने
इ.स.१५७५ ते १६७४ असा मानावा असे म्हटले आहे.
त्यानुसार संत शेख महंमद महाराजांचा जन्मकाळ पंधराव्या शतकाचा उत्तरार्धात अखेरीस झाला आसावा असे मानता येते.
नदीचे मूळ आणि ऋषीचेकुळ शोधू नये असे म्हणतात.
ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे ||
काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा ||
फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे ||
नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन ||
शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद ||

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP