मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत केशवदास महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत केशवदास महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : bookmarathi booksantपुस्तकमराठी पुस्तकसंत संत केशवदास Translation - भाषांतर संत केशवदास (सु. १५५५–सु. १६१७). भक्तियुगातील एक प्रख्यात हिंदी संतकवी आणि रीतिकाव्याचा प्रवर्तक. त्याच्या जन्म – मृत्युतिथींबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. त्याचा जन्म ओर्च्छा (मध्य प्रदेश) येथे एका नावाजलेल्या विद्वान कुटुंबात झाला. त्याच्या पूर्वजांना राजाश्रय होता. संत केशवदास ही ओर्च्छाधिपती इंद्रजीत सिंह याचा आश्रित होता. अकबर, बिरबल, तोडरमल, उदयपूरचा राणा अमरसिंह यांसारख्या मातबर माणसांशी त्याचा चांगला परिचय होता. तो रसिक, पंडित व व्यवहारकुशल होता. साहित्य, संगीत, धर्मशास्त्र, राजनीती, वैद्यक, ज्योतिष इ. विषयांत त्याची चांगली गती होती. त्याच्या रसिकप्रिया (१५९१), कविप्रिया (१६०१) आणि छंदमाला ह्या काव्यशास्त्रीय ग्रंथांचा रीतिकालीन हिंदी साहित्यावर खूपच प्रभाव पडला. संपूर्ण संस्कृत काव्यशास्त्र हिंदीत आणण्याचे श्रेय केशवदासाला दिले जाते. त्याने रामकथेवर लिहिलेले रामचंद्रिका (१६०१) हे काव्य प्रख्यात असले, तरी त्यातील त्याच्या पांडित्यप्रदर्शनाच्या हव्यासामुळे, काव्यगुणद्दष्ट्या ते तितकेसे सरस ठरत नाही.आज केशवदासाचे नाव उत्तम कवी म्हणून जरी घेतले जात नसले, तरी हिंदी साहित्यातील मध्ययुगात त्याला ‘आचार्यकवी’ म्हणून विशेष मानाचे स्थान होते. त्याचा प्रभाव बिहारी, देव यांसारख्या मोठ्या कवींवरही पडलेला दिसतो. त्याने लिहिलेले इतर प्रमुख काव्यग्रंथ म्हणजे वीरचरित्र (१६०६), विज्ञानगीता (संस्कृतमधील प्रबोधचंद्रोदयवर आधारित, १६१०),जहांगीरजसचंद्रिका (जहांगीरच्या दरबाराचे वर्णन, १६१२),रतनबावनी (रत्नसेनाच्या पराक्रमाचे वर्णन) व नखशीख हे होत.त्याची रचना मुख्यत्वे ब्रज भाषेत असली, तरी तिच्या संस्कुत प्राचुर्य आणि अलंकारांचा सोस यांमुळे ती दुर्बोध बनली आहे. N/A References : N/A Last Updated : September 01, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP