मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| विरनाथ महाराज महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार विरनाथ महाराज महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : bookmarathi booksantvirnathपुस्तकमराठी पुस्तकविरनाथसंत विरनाथ महाराजांचा जन्म Translation - भाषांतर निलावती नगरी(निलंगा) मध्ये मल्लप्पा सावकार व त्यांची पत्नी शिवम्मा राहात होते .दोघेही पती-पत्नी अत्यंत सात्विक आणि साधू वृत्तीचे होते. निलावती नगरीत यावेळेस पीर पाच्छा नावाचे एक सुफी संत राहत होते. ते रोज अन्नदान करीत असत. मल्लाप्पा सावकारांचे वाण साहित्याचे दुकान होते. मल्लप्पा पिरच्छनां अन्नदानासाठी नित्य विनामूल्य वाण साहित्य पूरवित असत. मल्लाप्पानां संतान नव्हते .पीर पिच्छा यांच्या आशिर्वादाने मल्लाप्पा आणि शिवम्मा यांना पुत्र प्राप्ती झाली. श्रावण कृ.अष्टमी गुरुवार शके 1692 म्हणजे गोकुळाष्टमी दिवशी वीरनाथांचा जन्म झाला. पीर पाच्छानीं बाळास आशिर्वाद रूपात आपला हिरवा रुमाल दिला आणि मल्लाप्पानां सांगितले की हा मुलगा भगवत भक्त होईल .प्रपंचात याचे फारसे लक्ष असणार नाही .मल्लपा हे जन्माने वीरशैव होते. शिवभक्ती हा त्यांच्या कुळाचा नेम होता. परंतु विरनाथ मात्र वयाच्या आठव्या वर्षीपासून विठ्ठल भक्ती करू लागले. शैव आणि वैष्णव यांच्यातील मतभेदाचा तो काळ होता. यामुळे वीरनाथांना त्यांच्या विठ्ठल भक्ती साठी विरोध होऊ लागला. घरून आणि इतर समाजातूनही त्यांच्या या विठ्ठल भक्तीला प्रखर असा विरोध होऊ लागला. परंतु तरीही विरनाथ महाराजांचे विठ्ठल भक्ती करणे सुरूच होते. वयाच्या आठव्या वर्षीपासून बाराव्या वर्षापर्यंत त्यांचा हा विठ्ठल भक्तीचा नेम कितीही प्रयत्न केला तरी कोणी मोडून काढू शकले नाही .यामुळे मल्लप्पांनी वीरनाथांना घराबाहेर काढले. सात दिवस अन्न पाण्यावाचून विरनाथ महाराज घराबाहेर होते.परंतु त्यांची विठ्ठल भक्ती मात्र सुरूच होती. मल्लप्पा सावकारांना एके दिवशी स्वप्नात दृष्टांत झाला की विरनाथांना भोजन द्यावे . याप्रमाणे मल्लाप्पा सावकारांनी शिवम्मा यांना सांगितले की रोज दुसऱ्या प्रहरी एक भाकरी तू वीरनाथांना देत जा. याप्रमाणे जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आणि विरनाथ महाराज घराच्या बाहेरच राहून त्यांची विठ्ठल भक्ती करत होते. गावकऱ्यांच्या मतानुसार मल्लाप्पा सावकारांनी पुन्हा वीरनाथांना घरी बोलावले. दिवसभर घरचे कार्य करावे आणि रात्री दोन प्रहर पर्यंत विठ्ठलाचे स्मरण करावे .असा त्यांचा नित्यनेम सुरू होता .वीरनाथ महाराजांची विठ्ठल भक्तीवीरनाथ महाराज विठ्ठल भक्तीमध्ये संपुर्णतहः रममान झालेले होते. त्यांचा विवाह करावा आणि त्यांना आपल्या वाण साहित्याच्या दुकानाची जबाबदारी द्यावी असा विचार मल्लप्पा सावकार यांनी केला. यानुसार इ.स. 1785 दरम्यान मल्लप्पांनी वीरनाथांचा विवाह केला. पण वीरनाथांच मन काही प्रपंच आणि व्यापार यात रमल नाही . त्यांनी दुकानातील सर्व साहित्य वाटुन दिल . मल्लप्पांना याच अत्यंत राग येऊन त्यांनी वीरनाथांकडुन व्यापाराची जबाबदारी काढुन घेतली. वीरनाथ आता पुन्हां अधिकाधिक विठ्ठल भक्ती करू लागले . फक्त 1 प्रहर निद्रा आणि 7 प्रहर भजन करू लागले. प्रत्येक एकादशीस ते आपल्या सवंगड्यासोबत निलावती नगरीस प्रदक्षिणा करत .एकदा असा प्रसंग घडला की वीरनाथ आणि त्यांचे सोबती नगर प्रदक्षिणा करण्यास नगराबाहेर गेले असता नगराचा यवन अधिकारी याने जनतेच्या सांगण्यावरून नगरद्वारास कुलुप लावले.वीरनाथांच्या विठ्ठल भक्तीस विरोध करणारी मंडळी हर प्रकारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असत . नगर प्रदक्षिणा करून सर्व जण नगराच्या प्रवेश द्वाराजवळ आले असता कुलुप पाहुन वीरनाथांचे सोबती घाबरले. वीरनाथांच्या हाताचा स्पर्श होताच कुलुप गळून पडले. हा प्रकार यवन अधिकार्यास समजला . त्याला वीरनाथांच्या विठ्ठल भक्तीची कल्पना आली होती. त्यांने नगरातील जनतेस सक्त ताकीद दिली की वीरनाथांचा कोणी छळ करू नये.वीरनाथांची विठ्ठल भक्ती पाहुन मल्लप्पा सावकार यांनीही आता वीरनाथांना पंढरपूरला जाण्यास परवानगी दिली. वीरनाथ एके वर्षी कार्तिक वारीसाठी पंढरपूरला आले असता त्यांची आणि स.गुरुगुंडा महाराज देगलुरकर यांची भेट झाली. स.गुरुगुंडा महाराज यांच्या कडुन वीरनाथांना गुरुउपदेश प्राप्त झाला . N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP