मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत महदंबा महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत निवृत्तीनाथ संत महात्मा बसवेश्वर संत कबीर दास संत गाडगेबाबा संत सावता माळी संत वेणाबाई संत सेवालाल महाराज संत महदंबा संत जनाबाई माहिती संत मीराबाई संत गुलाबराव महाराज संत महदंबा १३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. Tags : bookmahadambamarathi booksantपुस्तकमराठी पुस्तकमहदंबासंत संत महदंबा Translation - भाषांतर संत महदंबा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा ऊर्फ रूपाईसा (जन्म : इ.स.१२३८; मृत्यू : इ.स.१३०८). ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री होती. १३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण त्यांना आऊसा म्हणजे आई म्हणत.संत महदंबा – व्यतिगत माहितीमहदंबा यांचे जीवन विलक्षण होते. त्यांने बालविधवा ते विद्वान संन्यासिनी कवयित्री असा प्रवास केला. महादाईसाचे घराणे तसे विद्वानांचेच होते.त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले. ती वडिलांकडे परत आली. तिला भक्तिमार्गाची व परमार्थाची ओढ होती. परमार्थाच्या ओढीने प्रथम ती दादोसाच्या शिष्या झाली.त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली.श्री चक्रधर स्वामींनी सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले.महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता. संन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला.संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत त्यांच्या भक्तीत रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्त्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली.तिची भक्ती डोळस होती बुद्धीची आणि चौकसपणाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती.हे पहा:- तीर्थक्षेत्र संपूर्ण माहिती संत महदंबा – महदंबेच्या जन्मस्थळमहदंबा जालना जिल्ह्यातील रामसगाव या गावच्या आहेत. तसं त्यांचं कुटुंब हे आजची पुरी पांढरी जि. बीड येथील होत. पंरतु नंतर सर्व कुटुंब हे रामसगाव येथे आले होते आणि हेच त्यांचे गाव झाले होते. लिलाचहरित्रातील उपलब्ध पुराव्यानुसार ती रामासगाव येथील असल्याचे सिद्ध होते.संत महदंबा – काव्येमातृकी सैवरं (स्वयंवर ), गर्भकांड ओव्याआणखी माहितीचक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरत असत. त्या तुलनेत गोविंदप्रभू हे एकाच ठिकाणी असत. त्यामुळे ती चक्रधरांच्या अनुज्ञेनेच गोविंदप्रभू यांच्याजवळ राहिली. तिच्या जन्ममृत्यूबद्दल मात्र माहिती उपलब्ध नाही. तिचे धवळे नावाचे लेखन महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे. तो वाड्मयीन रचनाप्रकार झाला. धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची वरगाणी अर्थात विवाहविषयक गीत होय. त्याची निर्मिती ‘श्रीगोविंदप्रभूचरित्रा’तील ‘विव्हावो स्विकारू’ या लीळेवरून कळते.गोविंदप्रभूगोविंदप्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या तेलिणीस पाहून एकदा विवाह प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली. त्या गीतांत विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन आले आहे. ढवळ्यातील मुख्य विषय रूक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग आला आहे. तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे. उत्तरार्धात पासष्ट कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्रकवित्व दिसते. धवल या संस्कृत शब्दावरून ‘धवळा’ व ‘ढवळा’ हा शब्द आलेला आहे. ते विवाहप्रसंगी भक्तांकडून गायले जात असत.प्राचीन काळातील लोकगीतातील ढवळे उपलब्ध नसले तरी महदंबा, एकनाथ, दासोपंत, रामदास इत्यादी कवींनी रचलेले ढवळे उपलब्ध आहेत. महदंबेच्या ढवळ्यांची भाषा साधी, सुबोध व तात्कालिक बोलीभाषेच्या रूपाची आहे. महदंबेने ढवळ्यांप्रमाणेच ‘मातृकी रुक्मिणीस्वयंवर’ या काव्याची निर्मिती केली आहे. त्याची ओवीसंख्या एकशेनऊ आहे. त्या काव्याचे विशेष असे, की त्यातील कडव्यांत अ, आ, इ, ई पासूनची अक्षरे आणली आहेत. उदाहरणार्थ कासे पितांबरू कंठी कुंदमाळा : कांतु शोभे सावळा : रुक्मिणीचा ||१|| तिचा प्रत्येक ओळीतील आद्याक्षरांचा क्रम साधण्याचा प्रयत्न आहे. तोच प्रकार पंडिती काव्यात नंतरच्या काळात दिसतो. कृष्णवर्णन, पाठवणी, कृष्णदर्शनामुळे रुक्मिणीने सज्जावरून उडी घेणे इत्यादी प्रसंग आले आहेत.गर्भकांड ओव्यागर्भकांड ओव्या हे महदंबेने लिहिलेले छोटेसे प्रकरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. महदंबेचे महानुभाव संप्रदायात स्थान महत्त्वाचे होते. ती ‘तरी मज वेष द्यावा’ असे म्हणते. तिला पंथाचा वेष दिला जातो. ती मठव्यवस्था बघते, सर्व भक्तांची उठबस करते, चक्रधरांचा पूजावसर संभाळते, संन्यासिनींवर करडी नजर ठेवते- त्यांना फटकारते. त्यावरून तिने महानुभाव संप्रदायाची शिस्त स्वीकारली होती हे दिसून येते. “संत महदंबा माहिती-मराठी” “संत महदंबा माहिती-मराठी” “संत महदंबा माहिती-मराठी”संत प्रवचनतिच्याविषयी उषा देशमुख या समीक्षक लिहितात तिच्या मानसिक आणि शारीरिक कोंडमाऱ्याचे चित्र तिच्या कृती-उक्तीतून लीळाचरित्रात दिसून येते. संन्यासीपण, निवृत्ती, जीवनभोगापासून दूर राहणे आणि आध्यात्मिक पातळीवर विचारदर्शन घडवणे अशी महदंबेच्या आयुष्याची वाटचाल ठरली. महदंबा ही संवेदनशील सौंदर्यदृष्टी असलेली, नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा असलेली सुगरण, गाणे गाणारी, रांगोळी सुंदर काढणारी दक्ष कार्यकर्ती होती. नागदेवाचार्यांनी ‘म्हातारी माझी प्रीतीदक्ष: धर्मरक्षक की गा:’ असे तिच्याबाबत म्हटले आहे. ती नागदेवाचार्यांची चुलत बहीण होती. N/A References : N/A Last Updated : September 03, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP