मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

वेदपाठ

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




वेदविधि कांहीं न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥
दशग्रंर्थी ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥
सर्व ब्रह्मरूप ऐसे बोले वेद । तेथें वादावाद उरला नाहीं ॥३॥
ओऽहं सोऽहं कोऽहं नाही ठाव । उगेचि गौरव मिरवी ज्ञान ॥४॥
एका जनार्दनीं ब्रह्मज्ञानासाठी । हिंडताती कोटि जन्म घेत ॥५॥



वेद वोलिला जो जो गुण । तो तो नव्हेचि पठण ॥१॥
वेदें सांगितले न करी । ब्रह्मद्वेषो दुराचारी ॥२॥
न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ॥३॥
ऐसी वेदाची मर्यादा । न कळेचि मतिमंदा ॥४॥
निजमुखें स्वयें बोले वेदु । न करावा परापवादु ॥५॥
एका जनार्दनीं शरण ।वेदाचें नोहे आचरण ॥६॥
वर्ग:

  संत एकनाथ यांचे साहित्य

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP