मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग| वेषधार्याच्या भावना संत एकनाथांचे अभंग मंगलाचरण गर्गाचार्याचे जातक श्रीकृष्ण भगवानाचें चौर्यकर्म विचार वेणी-दाढीची ग्रंथी गौळणीस श्रीकृष्णाचा वेध गौळणींची विरहावस्था वनक्रीडा काला श्रीकृष्णमाहात्म्य पंढरी महात्म्य श्रीविठ्ठलमहात्म्य श्रीविठ्ठलनाममहिमा श्रीरामनाममहिमा शिवमाहात्म्य हरिहर ऐक्य श्रीदत्तनाममहिमा श्रीदत्तमानसपूजा श्रीहरिनाममहिमा हरिपाठ चिंतनमहिमा नाममहिमा नामपाठ गीताज्ञानेश्वरीपाठ संत महिमा श्रीविठ्ठलभावभक्तिफल नवविधा भक्ति उपदेश कलिप्रभाव वेषधार्याच्या भावना विद्यावंत वेदपाठ वेषधार्याच्या भावना संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. Tags : bhajanekanathasantएकनाथभजनसंत वेषधार्याच्या भावना Translation - भाषांतर १कलिमार्जी दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकू । फजीतखार एम देव तयाचे तोडावर धुंकू ॥३॥एका जनार्दनीं सर्वभावे सोपा पंढरीराव । तया सांडोनि कोण पुसे या देवांची कासया माव॥४॥२भक्त रागेला तवकें । देव फोडोनि केले कुटकें ॥१॥कटकट मूर्ति मागुती करा । मेण लावुनी मूर्ति जडा ॥२॥न तुटे न जळे काही न मोडे । त्या देवाचे केले तुकडे ॥३॥रांडवा म्हणती आगे आई । कैसा देव फोडिला बाई ॥४॥जवळींच शुद्ध असतां देवा । भक्तांसी पडिला सदेवो ॥५॥शाळीग्राम शुद्ध शिळा हारपलीया उपवास सोळा ॥६॥चवदा गांींचा बांधिला दोरा । तोहि अनंत नेला चोरा ॥७॥अनंतासी अंतु आला । भक्ता तेथे खेदु जाहला ॥८॥एका जनार्दनी भावो । नाहीं तंव कैंचा देवो ॥९॥३देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चा करिती पाही ॥१॥नैवेद्य वहाती नारळ । अवधा करिती गोंधळ ॥२॥बळेंचि मेंढरे बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥बळेंचि आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ॥४॥सकळ देवांचा देव । विसरती तया अहंभाव ॥५॥एका जनार्दनीं ऐसा देव । येथं कैसा आमुचा भाव ॥६॥४प्रेमें पूजी मेसाबाई । सांडोनियां विठाबाई ॥१॥काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥आपुलीये इच्छेसाठीं । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥तैसी नोहे विठाबाई । सर्व दीनाची ती आई ॥४॥न सांडीची विठाबाई । एका जनार्दना पाहीं ॥५॥५सांडोनिया विठाबाई । कां रे पूजितां मेसाई ॥१॥विठाबाई माझी माता । चरणों लागो इचे आतां ॥२॥अरे जोगाई तुकाई । इजपुढे बापुड्या काई ॥३॥एका जनार्दनी माइश आई । तिहीं लोकीं तिची साई ॥४॥६आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाधा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥ठकलों ठकलों वाउगा सीण । थारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । भेटवा मज पंढरीरावो ॥४॥रांडापर्पोरें त्यजिली जालों काळतोंडा ॥३॥गेले दोनी ठाव आतां कोर्ट उरला वाव । एका जनार्दनों७पूजिती खंडेराव पतर भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥लावूनिभंडार दिवटा घेती हाती । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥ऐसियासी भाव सांगावा तो कवण । एका जनार्दनी काया वाचा शरण ॥३॥८फजितीचे देव मागती पुटीरोटी । आपणासाठी जगा पीडिती काळतोंडे मोठी ॥१॥नको तया देवा आठव मजसी । विठ्ठल मानसीं आम्ही ध्याऊं ॥२॥अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणे मारिती पशुधात ॥३॥एका जनार्दनीं जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचे काळे तोंड ॥४॥९म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगडगोटे ॥१॥कष्ट नेणती भोगिती । वहा दगडातें म्हणती ॥२॥जीत जीवा करूनि वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥रांडापोरें मेळ जाला । एक म्हणती देव आला ॥४॥नाक घासूनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ॥५॥एका जनार्दनीं म्हणे । जन भुलले मूर्खपणें ॥६॥१०पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥शा तयां म्हणताती देव । विसरूनी देवाधिदेव ॥२॥मारिती पशूच्या दावणी । सुरापाणी आल्हाद जयां ॥३॥आमुचा देव म्हणती भोळा । पहा सकळां पावतसे ॥४॥ऐशा देवा देव न म्हणे कोणीही । एका विनवी जनार्दनीं ॥५॥११प्रतिमेचा देव केला । काय जाणे ती अबला ॥१॥शा नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२॥न कळेचि मूढा वर्म । कैसे जाहालेंसें कर्म ॥३॥प्रतिमा केलीसे आपण । तेथें कैंचें देवपण ॥४॥देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनीं रडती पोटा ॥५॥१२देव दगडाचा भक्त तो मेणाचा । ऐका दोहींचा विचार कैसा ॥१॥खरेपणा नाहीं देवाचे ते ठायी । भक्त अभाविक पाहीं दोन्ही एक ॥२॥एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजरे जाण उभयतां ॥३॥१३करूनि नवस मागती ते पुन । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥शा सदा सर्वकाळ निंदावे सज्जन । काया परद्रव्या ॥३॥परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ॥४॥ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ॥५॥एका जनार्दनीं नवसाचे फळ । कुळी झाला बाळ बुडवणा ॥६॥१४जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्देवा ॥२॥मुळीच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ॥३॥विसरूनी खन्या देवासी । भुलले आपुल्या मानसी ॥४॥सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥१५वोस घर वस्तीस काहा । तैसें देवा कोण पुसे ॥१॥सांडोनियां पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥घेती मांसाचे अवदान । देवपण कैंचें तेथें ॥३॥ऐसिया देवासी पूजणें । एका जनार्दनी खोटें जिणें ॥४॥१६येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामूर्ख ॥१॥दगडाच्या देवासेंदुराचा भार । दाविती वडिवार पूजनाचा ॥२॥रांडापोरे घेती नवसाची यगाड़ । नुगये लिगाड तयाचेनि ॥३॥आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यवाणं ॥४॥एका जनार्दनी ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥१७भजन चालिले उफराटें । कवण जाणे खरे खोटें ॥१॥जवळी अमतां देव । भक्तां उपजला संदेह ॥२॥सचेतन तुळशी तोडा । वाहाती अचेतन दगडा ॥३॥बेला केली ताडातोडी । लिंगा लाखोली रोकडी ॥४॥अग्निहोत्रीचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ॥५॥तिन्ही देव पिंपळांत । अमिहोत्री केला घात ॥६॥मुख बांधोनी बोकड मारा । म्हणती सोमयाग करा ॥७॥चवदा गांठींचा अनंत दोरी । तो प्रत्यक्ष नेला चोरी ॥८॥' शालिग्राम शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥९॥एका जनार्दनीं एक भाव । कुभाषिका कैंचा देव ॥१०॥१८प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो अंगों अंगी ॥१॥असतां सर्वत्र बाहेरी अंतरीं । संतुष्टा भीतरी म्हणे देव ॥२॥तेचि ते द्वारका तेचि हे पंढरी । सर्वत्र न धरी तोचि भाव ॥३॥तीर्थयात्रा करी देव असे क्षेत्रीं । येर काय सर्वत्री बोस पडलें ॥४॥पुण्य क्षेत्रीं पुण्य अन्य क्षेत्रीं पाप । नवल संताप कल्पनेचा ॥५॥एका जनार्दनी स्वत:सिद्ध अस । नाथिलेची पिसे मत वाद ॥६॥१९देव देही आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे ॥१॥ऐसे ते भुलले देवा विसरले । तपताती वहिले करूनी कष्ट ॥२॥देवाची ती भेटी नाहीं जाहली तया । शिणताती वायां कर्महीन ॥३॥एका जनार्दनीं जवळी असानी देव । कल्पनेनें वाव केला मनें ॥४॥२०सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो ॥१॥ऐशी भुलली कर्मासी । आचरती ती दोषासी ॥२॥शा सर्व ठायी व्यापक हरी । कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥ऐसे अभागी ते हीन । भोगिताती जन्मपतन ॥४॥नको ऐसें ब्रह्मज्ञान । एका जनार्दनीं शरण ॥५॥२१देव सर्वाठायीं वसे । परि न दिसे अभाविकां ॥१॥शा जळी स्थळी पाषाणी भरला । रिता ठाव कोठे उरला ॥२॥जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥३॥एका जनार्दनी नाहीं भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥२२लटिक्या भावाचें । देवपण नाहीं साचें ॥१॥भाव नाहीं जेथें अंर्गी । देव पाहतां न दिसे जगीं ॥२॥सर्व काळ मनीं कुभाव । जैसा पाहे तैसा देव ॥३॥लटिकी भंड फजिती । एका जनार्दनी निशिती ॥४॥२३देही असोनियां देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥जाय देवळासी स्वयें । मी आशा दुसरी वाहे ॥२॥बैसोनी कीर्तनी । लक्ष लावी सदां धनीं ॥३॥करूं जाय तीर्थयात्रा । गोविले मन विचारा ॥४॥ऐशियासी न भेटे देव । एका जनार्दनीं नाहीं भाव ॥५॥२४ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण ॥१॥पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महादोषी ॥२॥ब्रह्मीं नाहीं दोष गुण । पाहती ते मूर्ख जाण ॥३॥जे गुणदोषी देखती । एका जनार्दनीं नाडती॥४॥२५मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥तेथे असे माझा वास । नको भेद आणि सायास ॥२॥कलियुगी प्रतिमेपरतें । आसना साधन नाहीं निरूतें ॥३॥एका जनार्दनीं शरण । दोन्ही रूपं देव आपण ॥४॥==============================ब्राह्मण१स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ॥१॥कनकफळ नाम गोमटें । बाहेर आंत दिसे कांटे ॥२॥शरीर श्वेत निर्नासिक । तोंडाळ ओढाळ पतिनिंदक ॥३॥ऐशी आचारहीन बापुडीं । एका जनार्दनी न धरी जोडी ॥४॥२सुंदर विभूती लावी अंगी । मिरवी जगीं भूषण ॥१॥घालूनियां गळां माळा । वागवी गवाळा वोंगळ ॥२॥नेणे कधी योगयाग । दावी सोंग भाविकां ॥३॥एका जनार्दनीं भाव । नाहीं तेथें कदा देव ॥४॥३द्रव्याचिया लोभे । तीर्थामध्ये राहती उभे ॥१॥सांगती संकल्प ब्राह्मण । तेणें निर्फल तीर्थ जाण ॥२॥संकल्पाने नाड । उभयतां ते द्वाड ॥३॥संकल्पाविरहित धन । एका जनार्दनीं पावन ॥४॥नवल दंभाचे कौतुक । अग्नहोत्री म्हणती याज्ञिक ॥५॥मंत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण ॥६॥आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन । दंभे म्हणती आपणा जाण ॥७॥दांभिकांची भक्ति वाव । एका जनार्दनीं नाहीं ठाव ॥८॥४वेदाचिया बोला कर्मातें गोविला । परी नाहीं भजला संतालार्गी ॥१॥शा घोकूनियां वेद द्वैत नवजाय । वाउगाची श्रम तया ॥२॥तया अद्वैताच्या वाटां जाय तो करंटा । शीण तो अव्हाटा आदिअंत ॥३॥एका जनार्दनीं संतांसी शरण । गेलीयां पठण सर्वजोडे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 03, 2025 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP