मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मयुरानंद धारामृत| अध्याय पाचवा श्री मयुरानंद धारामृत चरित्रगाथा पारायण पध्दत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा श्रीमयुरानंद स्वामींची आरती आत्मलिंग चंद्रशेखराची आरती श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय पाचवा श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा Tags : abhangmarathimayuranandअभंगमयुरानंदमराठी अध्याय पाचवा Translation - भाषांतर ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥ॐ नमो नम: परब्रह्मणे । प्रज्ञापूर निवासिने । नमो वटपत्र शायने । श्री स्वामी शिवाय नम: ॥२॥स्वामीचे मोरेश्वरा आज्ञापन । करणे राममंदिर निर्माण । दशके गेली निघून । तरी कार्य होईना ॥३॥मंदीर निर्मितीस । धन लागे अमूप । धन संचय करीत । पौरोहित्य विदागी कीर्तनीय ॥४॥मंदी निर्मितीस । गर्भागार, दर्शनमंडप सभागृह । सीताराम लक्ष्मणासहीत । हनुमंत मूर्ती आवश्यक ॥५॥पूर्वमंदीर निर्माण । मूर्ती असंख्यात सुलक्षण । चालले विचारमंथन । वदती कर्ते करविते स्वामी ॥६॥भार वाहिला स्वामी चरणास । परी यत्न करणे अवश्य । काळबादेवी भुलेश्वरास । मुंबापुरीत मूर्ती पाहती ॥७॥मूर्ती पाहिल्या अगणीत । परी नसती लक्षणयुक्त । एकदां होऊनि हताश । बसले ग्रँटरोड स्थानकासी ॥८॥मयुरानंदा पानथरी विकार । गांजा धूम्रपान तया औषध । उदरी वेदनी संभावत । चिलीम ओढीत बैसले ॥९॥तेथ एक राजस्थानी । विनवी मयुरानंदा येऊनी । तया दोन गांजागोळ्या देऊनी । दिधली चिलीम ॥१०॥एक झुरका मारीत । निघती ज्वाळा लोट । दोन गोळ्या एका क्षणात । फस्त केल्या तयाने ॥११॥मयुरानंदांची उदर व्यथा त्वरीत । गेली निघूण क्षणांत । पुनरपी कदापि तयांस । आजन्म उदर व्यथा न जाहली ॥१२॥राजस्थानी पुसे तयांस । आगमन येथ किमर्थ । कविता मनीचा हेत । राजस्थानी बोले तया ॥१३॥मी असे मूर्तिकार । श्रीराम मूर्ती आहेत पेटार्यांत । कोण्या संस्थानिके मज । मूर्ती करण्या कथिले ॥१४॥परी अन्य मूर्तिकाराकडून । घेतल्या मूर्ती क्रय करुन । दिसती सत्पुरुष आपण । अवलोकावे मूर्तीसी ॥१५॥इहपर कोणास । मूर्ती विकणे नसे आम्हांस । लक्ष्मण रामसीतेसहीत । दान आपणां देतसे ॥१६॥मूर्ती पाहती मयुरानंद । अती तेजस लक्षणयुक्त । आणि वदले मूर्तिविकारास । मूर्ती आहेत उत्तम ॥१७॥दान नको आम्हांस । स्वीकारावे मानधनास । दोघे नकारती एकमेकास । गाडी येता मूर्तिकार गेला ॥१८॥वाटले तया वाईट । मूर्ती होत्या सतेज । नाही जाहली तडतोड । गेले निधान हातचे ॥१९॥मोबदला देणे असे । तो स्विकारीत नसे । कर्माचे फासे । कैसे पडती विपरीत ॥२०॥परंतु काही दिवसांत । विरारस्थानक नियंत्रक । आला तयांचा निरोप । यावे त्वरीत स्थानकासी ॥२१॥मयुरानंद जाता तेथ । तया दिधले पत्र । पेटार्यासी करी निर्देश । आपुल्या नामे हा असे ॥२३॥उघडता पत्र । वाचिती मूर्ती दिधल्या आपणास । अमुल्याचे मूल्य । कोणी कैसे करावे ॥२३॥मयुरानंद स्तंभित । श्री स्वामींचे हे कृत्य । पाचारुनी विश्वकर्म्यास । धाडिल्या मूर्ती ॥२४॥परंतु हनुमंताविण । कैसे करावे प्रतिष्ठापन । राममूर्ती प्रमाणे । स्वामी इच्छे येईल हनुमंत ॥२५॥स्मरणगामी हनुमान । जाणती माझे अंतर्मन । एका हनुमानरुपे स्वामी दर्शन । स्मरण तया जाहले ॥२६॥चक्रेश्वराचे डावे बाजूसी । मंदिराचा पाया खणती । त्वरीत उद्भवली मूर्ती । मारुती वायुनंदन ॥२७॥मूर्तिकारास धाडले पत्र । आपणा येणे मूर्ती प्रतिष्ठेस । आमुच्या उत्कट इच्छेस । आपण कृपा करावी ॥२८॥प्राणप्रतिष्ठा समयास । अचानक आला मूर्तिकार । तीनशे एक रुपये इह मूर्तीस । दिधती तया दक्षिणा ॥२९॥विश्वकर्मा शांतचित्त । वदे मयुरानंदास । अव्हेर न करी दक्षिणेस । रामधन हनुमंताचे ॥३०॥मयुरानंदांचे पुत्र । गोविंदबुवा नामक । प्राणप्रतिष्ठा सपत्निक । जाहली तयांचे हस्ते ॥३१॥शुध्द द्वादशी, वैशाख मास । अठराशे बारा शक । इसवी सन अठराशे नव्वद । जाहले रामप्रभू स्थानापन्न ॥३२॥समारंभ होता पूर्त । निघे मूर्तिकार स्वग्रामास । परंतु पाहता हनुमंतास । वाटे आश्चर्य समस्ता ॥३३॥हनुमंताचे पदापाशी । होते दक्षिणाधन परियेसी । विश्वकर्मावच स्मरणासी । रामधन हनुमंताचे ॥३४॥प्रात:काळी संपादूनी नित्यकर्म । मयुरानंद चिंतनी मग्न । तव अवचित यतीपरम । आले घरासी ॥३५॥वदले मयुरानंदांस । आपण स्वामी कृपांकित । म्हणून आपल्या दर्शनास । पातलो आम्ही ॥३६॥काही औषधे आपणांस । कथिणे ऐसा मानस । तरी लेखणी कागद । त्वरित सिध्द करावे ॥३७॥यती सांगती जडीबुटी । मयुरानंद लिहून घेती । जया उदरी कृमी होती । तया उत्तम औषध ॥३८॥जया नसे संतान । तयासी औषधी रसायन । जडीबुटीचे प्रमाण तैसे मिश्रण विधी ॥३९॥कोणी रुग्णाइतास । द्यावे हे औषध विशेष । कृमिघ्न काढा नामयास । माफक धन घेईजे ॥४०॥कोणी मागितल्यावीण । न द्यावे रसायन । श्रध्दावंतासी पूर्ण । रसायन त्रैलोक्य चिंतामणी ॥४१॥झोळींत घालूनी हात । नाणेप्रसाद देत । नित्य धन प्राप्त । तुज होईल या योगे ॥४२॥तुमचा योगक्षेम । मी स्वत: चालविन । ऐसे तयां आशिर्वचून । यती झाले मार्गस्थ ॥४३॥तयां शोधू पहाता । अदृश्य झाले तत्त्वता । स्वामी वचन सत्यता । एकदां येईन वच गृही ॥४४॥त्रैलोक्य चिंतामणी रसायन । वा काढा कृमिघ्न । बाहात्तर रोग नाशन । रामबाण असे औषधी ॥४५॥अद्यापि तयांचे वंशज । देती काढा इच्छितास । साक्षात स्वामी भैषज । असंभव रोग व्याधी ॥४६॥जय जय स्वामी समर्था । तुम्ही कर्ता करविता । सर्वत्र तुमची सत्ता । सत्ताधीशा तुज नमो ॥४७॥इतिश्री स्वामी कृपांकित । श्री मयुरानंद धारामृत राममंदीर निर्माणं तथा कृमिघ्न रसायन प्रदानं नामो,पंचमोध्याय: । श्री रामसमर्थार्पणमस्तु ॥शुभम् भवतु॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP