मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मयुरानंद धारामृत| अध्याय आठवा श्री मयुरानंद धारामृत चरित्रगाथा पारायण पध्दत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा श्रीमयुरानंद स्वामींची आरती आत्मलिंग चंद्रशेखराची आरती श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय आठवा श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा Tags : abhangmarathimayuranandअभंगमयुरानंदमराठी अध्याय आठवा Translation - भाषांतर ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥जय जय जगदाधारा निरंजना । श्री स्वामी समर्था पूर्णब्रह्मा । सिध्दांत अवधूत चिंतना । शिव दत्तात्रेय नमो नम: ॥२॥मळ्यास लागली आग । स्वये विझवी पद्मनाभ । अति विषण्ण भावनावश । तुटे देहभाव मयुरानंदांचा ॥३॥मानव असती जगांत । वर्तन त्यांचे चतुर्विध । अत्यानंद प्रपंचात । ते प्रपंचग्रस्त म्हणावे ॥४॥जे चिंता, व्याधीने ग्रस्त । वा आप्तेष्टांपासून त्रस्त । ते जाणा प्रपंचत्रस्त । शांती समाधान तया नसे ॥५॥बहिष्कृत आप्तांपासून । जमेत ना खर्ची जाण । नसतां खोळंबा, असता अडचण । ते प्रपंच त्रयस्थ ॥६॥जगी वर्ते परी अलिप्त । सदा रमवी आकाशतत्त्वांत । जीवन जगती कमलपत्रवत । तो मुक्तात्मा प्रपंची ॥७॥नाही भूतकाळाचे स्मरण । नसे भविष्य चिंतन । विरुन गेला वर्तमान । मयुरानंदांची ब्राह्मी अवस्था ॥८॥जड समस्त भासमान । अजड तेही बंधन । सूक्ष्माचे जरी ज्ञान । तो ही अडसर जाणावा ॥९॥नाही पुण्य, नाही पाप । नाही सुख नाही दु:ख । रुप, अरुप, स्वरुप । अवस्था तुर्येच्या ॥१०॥जेव्हा सरे मीपण । अहंभावाचे निरसन । सगुण निर्गुण विसर्जन । सरती साकार निराकार ॥११॥दिवस आणि रात्र । दोन्ही जाती संपुष्टात । स्वहित, परहित । सरे बंध, मोक्ष, मुक्तता ॥१२॥ऐसी निरानंद स्थिती । मयुरानंद भोगिती । जव आरंभ तंव इति । उरले एक कर्तव्य ॥१३॥रामनवमीचा दिवस । मयुरानंद उभे कीर्तनास । नसे पगडी नारदीय वेष । कंठी रुद्राक्ष स्फटीक माळ ॥१४॥नेमले पंचा बंडी अंगात । आज्ञापिती गोविंदास । पाठीमागे रहाणे तुज । वाटे भाषा निर्वाणीची ॥१५॥श्रीराम जन्माचे आख्यान । अतीव असे उत्तम । मग्न झाले श्रीतृजन । युग विश्वी जन्म सोहळा ॥१६॥राम सर्वा रक्षीत । नंदन कौसल्या सर्व सिध्द । दर्शनांत परमानंद । मयुरानंद बसले आद्याक्षरी ॥१७॥समस्तांसी बोधित । आलांत श्रीरामोत्सवास । सांगती कीर्तनी लीलाप्रभाव । रामदास हनुमंताचा ॥२०॥जरी समाप्त रामावतार । तरी राहिला नामावतार । हनुमान कृपेविण रामदर्शन । कदा कोणासी होत नसे ॥२१॥राम सेवितां एकमुख । लंका संगरी पंचमुख । पाताळनगरी एकादशमुख । ऐसी रुपे हनुमंताची ॥२२॥असे चिरंजीव दैवत । स्मरणमात्रे प्रकटन । येन प्रकट मात्रेण । सर्व विद्या विनिर्युयु: ॥२३॥श्री सप्तशृंग भगवती कृपा । झाला भक्तीमार्ग सोपा । प्रज्ञापुरीच्या परब्रह्मरुपा । मजसी रक्षिलेस ॥२४॥नाही सेवा नाही नेम । प्रथम दर्शनी प्रसाद पूर्ण । लळीत सोडूनी कीर्तन । जन्म झाला कृतार्थ ॥२५॥रंगती स्वामी स्मरणांत । निर्वाण अवस्था जागृत । निश्चल नि:स्तब्ध नि:शब्द । परी परा स्फुरतसे ॥२६॥परा प्रकाश वैखरीत । उमटती ईश्वरी वच । पंचश्लोकी स्वामी तारक स्त्रोत्र । जाहले वदते ॥२७॥आणि विनविती हनुमंतास । प्रथम कीर्तन तव साक्षीत । जेथ प्रथम तेथ अंतिम । सेवा वाहिली तव पदी ॥२८॥हनुमंताचे पुजारी भट्ट । मयुरानंद श्रीफळ देत । निमंत्रण हे पुढील वर्षास । जाहले वदते ॥२९॥श्रीफळ ते पुनश्च । घातले भट्ट पदरात । अखेरचे येणे येथ । जाणे असे अष्टमीसी ॥३०॥सर्व भक्त समुदायास । स्वये सुंठवडा वाटीत । कदां न विसरा आम्हांस । वदता अश्रू ओघलले ॥३१॥ज्ञात होता ऐसी मात । त्वरीत येती आप्त इष्ट । चैत्र वद्य अष्टमीस । हालचाल मंदावली ॥३२॥सांगती गोविंदास । करणे भगवत् गीता पाठ । सखाराम शास्त्री राजवैद्य । म्हणती पाठ राहील अपूर्त ॥३३॥वदले मयुरानंद । आम्हा स्वामी अभयप्रद । काळ झाला स्तंभीत । श्री स्वामी आज्ञेने ॥३४॥चालले गीता पठण । भक्तवृंद करी भजन । पाठ होतां पूर्ण । श्री स्वामी पुढे ठाकले ॥३५॥स्वामीस करिती वंदन । घोषांत चालले भजन । क्षणी स्वानंदी झाले निमग्न । कळले ना कोणासी ॥३६॥चैत्र वद्य अष्टमीस । अठराशे चौतीस शक । इसवी सन एकोणीसशे वारांत । अदृश्य रुपे स्थिरावले ॥३७॥तये वेळी आला एक । छायाचित्रकार अचानक । मयुरानंदांची छबी सुरेख । घेतली त्यांनी ॥३८॥स्वानंद यात्रारंभ प्रभातीस । विचरे सर्व ग्रामात । समस्तांसी चरणस्पर्श । आली सायं ते राममंदिरी ॥३९॥राममंदीरा बाजूस । ब्रह्मानंद गुहेत । रक्षिला पंचभौतिक देह । प्रकाशमय उजळला ॥४०॥स्वामींनी प्रथम भेटीत । दिधल्या होत्या अश्मपादुका । त्या मस्तकी ठेविल्या देखा । समाधीद्वार बंद केले ॥४१॥समाधीनंतर साक्षीत्व । अनुभक्ती भक्त । विस्तार होईल ग्रंथ । म्हणून वर्जीतसे ॥४२॥स्वामी जैसे आशिर्वच । कीर्तन परंपरा अद्याप । संगीत, ज्योतिष, वैद्यक । तया वंशजा प्राप्त असे ॥४३॥स्वामी प्रसाद गणेश । पादुका बाण चंद्रशेखर । देवी तांदळा, नाणे लक्ष्मीप्रद । वंशजांच्या पूजेत अद्याप असे ॥४४॥काढा जो कृमिघ्न । त्रैलोक्य चिंतामणी रसायन । बाहात्तर रोगा रामबाण । देती सद्यवंशज किशोरबुवा ॥४३॥विशेषत: दमेकर्यांस । अति उत्तम औषध । जेथ स्वामी भेषज । गुणयुक्त औषध ॥४४॥मयुरानंद प्रथम । दुसरी पिढी गोविंदराव । तीसरी पिढी बुवा श्रीकृष्ण । पिढी चवथी वसंतबुवा ॥४५॥वसंतबुवांचे पुत्र । सद्य किशोरबुवा होत । तैसे हेमकांत । कीर्तन धुरा सांभाळिती ॥४६॥इति श्री स्वामी कृपांकीत । श्री मयुरानंद धारामृत । श्री मयुरानंद समाधीर्नामो अष्टमोध्याय: ।श्री स्वामी समर्थार्पणमस्तु । शुभम् भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP