मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मयुरानंद धारामृत| अध्याय चौथा श्री मयुरानंद धारामृत चरित्रगाथा पारायण पध्दत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा श्रीमयुरानंद स्वामींची आरती आत्मलिंग चंद्रशेखराची आरती श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय चौथा श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा Tags : abhangmarathimayuranandअभंगमयुरानंदमराठी अध्याय चौथा Translation - भाषांतर ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥परब्रह्मा, पूर्णब्रह्मा, परमात्मा, परमभूषणा । सर्वात्मा, सर्वसाक्षी, सर्वेशा, सर्वोत्तमा ॥२॥प्रसाद घेऊनी प्रासादिक । मोरेश्वर आले ऊमराळ्यास । आजोबा आणि पत्नीस । सर्वार्थे सर्व निवेदिले ॥३॥पालटले पूर्वरुप । ब्राह्मतेज झळाळत । गुरुकृपा मूर्तिमंत । आप्तईष्ट अनुभविती ॥४॥स्वामी समर्थ स्मरण । प्रसाद मूर्तीचे पूजन । बहुधा असे आत्म । रंगती ध्यान रंगी ॥५॥स्वामी कृपेचा ओघ । झाले मोरेश्वर मयुरानंद । आनंदाचा परमकंद । झाला स्वाधिन तयांचे ॥६॥मयुरानंदांचा आप्त । बाळाभाऊ नामक । महारोगाने झाला ग्रस्त । सरले सर्व उपाय ॥७॥जाहले तया ज्ञात । मोरेश्वर करी देव देव । सामान्यांचा स्वभाव । सहज विकृत बरळती ॥८॥आपुले खर्चुन पुण्य । इतरां करावे पूर्वकाम । प्रापंचिकांचे ऐसे वर्म । स्वार्थासाठी भक्तीनाटक ॥९॥बाळाभाऊ आले गृहास । विनविती मयुरानंदास । तू महान देवभक्त । माझी व्याधी निरसी तव पुण्ये ॥१०॥मयुरानंद वदते तयास । मजसी नाही सामर्थ्य । केवळ एक भैषज । पूर्णब्रह्म अक्कलकोट ॥११॥मयुरानंदा समवेत । बाळाभाऊ आले अक्कलकोटात । वेळ होती रात्र । स्वामी शेकोटी पेटवून बैसले ॥१२॥बाळाभाऊ स्वामीस वंदिता । स्वामी पुसती मयुरानंदा । कशास आणिली येथ । ब्याद असली ॥१३॥पापे यांनी करावी । आम्ही कां बरे निस्तरावी । श्राध्दपक्षादी परान्ने भक्षिती । तेणे जडला महाकुष्ट ॥१४॥जळत्या शेकोटीतून । निवडुंग फणा देती फेकून । म्हणती लावाची उगाळून । तयाने व्याधी जाईल ॥१५॥परी यासी पथ्य महान । कदा न सेवी परान्न । मतीभ्रंश परान्नातून । परप्रारब्ध भोगावह होई ॥१६॥स्मरले स्वामींचे वचन । भेटेन निर्मळच्या यात्रेत । मयुरानंदा ब्रह्मानंद । धरीन पद गुरुंचे ॥१७॥शंकराचार्य स्थानापासून । यात्रेचे होत संचलन । भक्तसागरा उधाण । अतर्क्य येतसे ॥१८॥निर्मळास येती मयुरानंद । गर्दीत शोधिती स्वामींस । परंतु श्री स्वामीदत्त । दर्शन तया न जाहले ॥१९॥बहू दुकाने यात्रेत । धार्मिक वस्तू येती विक्रीस । दिसला एक साधु तयास । धुनी प्रज्वाळून बैसला ॥२०॥रुद्राक्षमाळा शंख । शाळीग्राम बाणलिंगे । शुभ्र भस्माचे खडे । चंदनादी विक्रीस ॥२१॥तेथे येती मयुरानंद । सर्व वस्तु अवलोकीत । तेथ बिल्वार्चित बाणलिंग । चंद्रशेखर पाहिला ॥२२॥मयुरानंद म्हणती साधूस । पाहिजे चंद्रशेखर आपणास । हे माझे पंचप्राणात्मक आत्मलिंग । वदले साधु ॥२३॥चंद्रशेखर नसे विक्रीसी । केवळ ठेविला दर्शनासी । इतर बाणलिंग इच्छिसी । तरी अवश्य देईन ॥२४॥चंद्रशेखराचा हट्ट । ना सोडिती मयुरानंद । साधूचा हट्टी हठ । पुसे आत्मलिंग कैसे द्यावे ॥२५॥साधु वदे अखेरीस । माने ईश्वरी इच्छेस । उत्तीर्ण होतां परिक्षेत । देईन तुज चंद्रशेखर ॥२६॥पसर तव उपवस्त्र । मी हवेत फेकीन बिल्वपत्र । पडता तुझे वस्त्रांत । चंद्रशेखर सुखे देईन ॥२७॥वस्त्र पसरती मयुरानंद । साधु फेकी बिल्वपत्र । अंतराळांतून लीलये त्वरीत । पडले मयुरानंद वस्त्री ॥२८॥गगनी ना सामावे आनंद । साधु असे महाखट । तयाने चंद्रशेखर त्वरित । धगधगत्या धूनीत टाकला ॥२९॥मयुरानंद खिन्नत्वे पहात । साधु राहे हंसत । काढूनी बाण लालबुंद । पाण्यात टाकिला ॥३०॥बाण होता शीत । टाकिला मय्रुरानंद वस्त्रात । होऊन अति हर्षयुक्त । मार्गस्थ झाले मयुरानंद ॥३१॥करतां मार्गक्रमण । साधूस देणे दक्षिणा । परत येऊन पहाता । साध अदृश्य धुनीसहित ॥३२॥पुसत एका दुकानदारासी । साधु गेले कवण ठायासि । दुकानदार वदे तयासी । येथे साधु धुनी कदां नसे ॥३३॥मयुरानंदा झाले ज्ञान । साधु तेचि स्वामी समर्थ । दर्शन देऊनी दिधले आत्मलिंग । परी तया न ओळखिले ॥३४॥अति हर्ष जाहला बंध । माया कर्तृत्व अगाध । समोर असुनी स्वामी दत्त । मायावेष्टने अंध जाहलो ॥३५॥आपण ओळखिले ना स्वामींसी । स्वामी ओळखिती मजसी । केली सत्य वचनोक्ती । दिधले दर्शन यात्रेत ॥३६॥करणे श्रीराम मंदिर निर्माण । पूर्वी करणे कीर्तन । मीच गणेश राम कृष्ण । वच स्मरले स्वामींचे ॥३७॥उमराळ्या नजीक । गांव सत्पाला नामक । हनुमान जन्मोत्सव तेथ । प्रतिवर्षी होतसे ॥३८॥मयुरानंद जाती तेथ । जन्मोत्सव व्याख्यान देत । जनसमुदाय जाहला मुग्ध । हनुमान माहात्म्ये ॥३९॥व्याख्यान नोहे कीर्तन । श्रोते जाहले भावपूर्ण । `मोरेश्वरबुवा' पदवी देऊन । करी दिधली तंबोरी ॥४०॥श्री हनुमान साक्षीत । जाहला कीर्तना आरंभ । श्रीराम प्राप्ती कारण । प्रसन्नता अवश्य मारुतीची ॥४१॥मयुरानंदांपासून । जाहले कीर्तनादी आरंभण । जय जय स्वामी रघुनंदन । हर्षे वदले मोरेश्वर ॥४२॥स्वामी समर्थ संकेत । त्या परी सर्व घडत । बुवा झाले नि:संकल्प । सर्व भार स्वामीपदा ॥४३॥परमेश्वर इच्छेवाचून । हालेना कदां वृक्षपर्ण । आपुला संकल्प त्यांत मिसळून । ईश्वर कार्य ना रोधावे ॥४४॥अवतारादिकांच्या मूर्ती विविध । तयाने विकार उद्भव । सर्वांतरी परब्रह्म व्याप्त । भेदाभेद माया स्वबळ ॥४५॥इष्ट देवतेचे रुप । स्मरावे विव्ध मूर्तीत । सर्व देवा नमस्कार । शिवस्वामी प्रती जातसे ॥४६॥मयुरानंद सर्वाप्रती । पाहती स्वामी समर्थासी । जळी, स्थळी, काठासी । पाहती स्वामींसी ॥४७॥भेदाभेद वर्जित । हाचि असे तृतीय नेत्र । तो होता उन्मलीत । संचरे स्वामीरुप सर्वत्रेसी ॥४८॥देव आणि भक्त । दोन्ही होतां एकरुप । तेव्हा तया गुरुपद प्राप्त । आदी गुरुकृपे होतसे ॥४९॥इतिश्री स्वामी कृपांकित । श्री मयुरानंद धारामृत । आप्तकृष्ट निवारणं, चंद्रशेखर प्राप्तं तथा कीर्तनारंभर्नामो । चतुर्थोध्याय: ॥ श्री स्वामी आत्मलिंगार्पणमस्तु ॥ शुभम् भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP