मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मयुरानंद धारामृत| अध्याय सहावा श्री मयुरानंद धारामृत चरित्रगाथा पारायण पध्दत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा श्रीमयुरानंद स्वामींची आरती आत्मलिंग चंद्रशेखराची आरती श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय सहावा श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा Tags : abhangmarathimayuranandअभंगमयुरानंदमराठी अध्याय सहावा Translation - भाषांतर ॐ परमात्मने नम: । श्री श्रीसद्गुरवे नम: । श्री सरस्वत्त्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥श्री स्वामी समर्थाय, सर्वोत्तम भद्राय । सर्वदा सर्व साक्षिणे । भक्तगृह रक्षणाय, दत्तात्रेयाय नमतोस्मि ॥२॥आपुले भक्त रक्षणास । सदा स्वामी घेती वेध । परब्रह्म जगद्व्यापक । जाहले साकार ॥३॥श्रीरामाचे मंदिरात । उत्सव होती विविध । प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत । उत्सव चैत्रमासी ॥४॥कीर्तनांत मयुरानंद । रामायण कथा गात । आणि तेथे अकस्मात । आली टोळी वानरांची ॥५॥दिधला नाही कोणा त्रास । सर्व बसले प्रांगणांत । कीर्तन होता पूर्त । प्रसाद घेऊनी गेले निघून ॥६॥त्या समयी अक्कलकोटांत । घडतसे अतर्क्य । कोडँक कंपनीचा मालक । आला स्वामी छबी घेण्यासी ॥७॥छबी घेऊनी धुता काच । दिसे वानर बलाढ्य । तेच स्वामीनचे हनुमंतरुप । पाहिले भक्तांनी ॥८॥एकदा रामनवमी उत्सवांत । दंगले मयुरानंद । सुश्राव्य रामलीला वर्णिता । श्रोते भान हरपले ॥१०॥कोणी नसे गृहात । कार्या वेळ शांत । घरांतील ऐवज । घेतला वस्त्री बांधुनी ॥११॥घराबाहेर जाऊ पहात । कोठेही दिसेना दार । मध्यरात्री पर्यंत । भ्रमिष्ठ घरात फिरती ॥१२॥कीर्तन करुनी पूर्त आले मयुरानंद गृहास । दारे उघडी सताड । पाहतां भय पावले ॥१३॥अंगी घोंगडी लपेटून । फिरती घरात काळकभिन्न । ही भूते की सैतान । करिती स्मरण स्वामींचे ॥१४॥तव ते इसम येऊन । धरिती मयुरानंदांचे चरण । म्हणती आम्ही कृतघ्न । करिती क्षमा याचना ॥१५॥आपण व्हावे कृपार्थ । आजहला पश्चात्ताप । आणि सांगती वृत्तांत । घडला जो असे ॥१६॥उत्सव संधी पाहून । करु आलो चौर्य कर्म । चिजवस्त्र घेतली बांधून । फिरलो परत जाण्यासी ॥१७॥समोर दिसती दोन तरुण । करिती शर संधान । हलता जागे वरुन । पुढे सामोरे ठाकती ॥१८॥म्हणती घरचा धनी । रंगला ईश कीर्तनी । चौरकर्मा साधुनी । जाऊ पाहता बाहेर ॥१९॥तयांचे आम्ही गृहरक्षक । सांभाळतो चिजवस्तु । येथेच थांबा स्वस्थ । नाहीतर उडेल शीर ॥२०॥आपण येतां घरांत । क्षणी झाले अदृश्य । समोर ठेऊनी ऐवज । लोळती मयुरानंद चरणी ॥२१॥बोधिती तया मयुरानंद । सोडा चोरीचा छंद । सेविजे आनंदकंद । सीताया पतये नम: ॥२२॥सोडूनी हीन व्यवहार । भक्त जाहले चोर । जय जय रघुपती रघुवीर । तामरंगी रंगले ॥२३॥आनंद दु:ख उद्वेग । जाहला मयुरानंदास । नयनी न ठर्र जलपात । हर्ष वा दु:खाचा ॥२४॥स्वयं राम लक्ष्मण । करिती घर रक्षण । अतीव दु:ख महान । जाहले तयांस ॥२५॥साक्षात् श्रीरामाचे पद फिरले घरांत । की भूमी अहिल्या उध्दार । केला तयांनी ॥२६॥हाच अतीव आनंद । रंगी रंगले मयुरानंद । त्रैलोक्याचा ब्रह्मानंद । जाहला तयांसी ॥२७॥सर्वानंद परिपूर्त । सुखासही असे छिद्र । तळपत्या सूर्यातही बिंब । अल्प काजळी असे ॥२८॥मयुरानंदांची सहचरी । गेली रामपदी । त्वरित चतुर्थाश्रम स्वीकारती । मयुरानंद सरस्वती नाम ॥२९॥तेव्हापासून राममंदिरात । चिंतनी मग्न मयुरानंद । बाहेरील धर्मकार्य । पुत्र गोविंदबुवा पाहती ॥३०॥वसंत ऋतु चैत्रमास । श्रीराम नवरात्र आरंभ । कोकिळा पंचमात । गातसे रामनाम ॥३१॥मयुरानंद आज्ञापित । गोविंदा पुत्रास । आज कीर्तनास । करणे तुज ॥३२॥अष्टमीच्या रात्रीस । गोविंदा उभा किर्तनास । प्रत्यक्ष जणु नारद । कीर्तन करितो नारदीय ॥३३॥कीर्तना ना चढे रंग । कंठी तरारे सूर । चुके तबल्याचा ताल । काल आरुढ सीमेवर ॥३४॥कीर्तनात बेरंग । थबकले मयुरानंद । सूचना देईल रघुनाथ । म्हणून पाहती रामाकडे ॥३५॥पाहता झाले चिंत्राक्रांत । श्रीराम झाले अदृश्य । लक्ष्मण सीता फक्त । दिसती गर्भागारी ॥३६॥गोरा कुंभार आख्यान । सांगती मयुरानंदन । आटोपते घ्यावे कीर्तन । पुत्रा संकेतती ॥३७॥श्रोतृवर्ग स्तंभित । कीर्तन का सरे अल्पकालात । घेऊनी प्रसाद । समस्त जाती घरोघरी ॥३८॥मयुरानंद अवलोकीत । राम दिसे गाभार्यात । दंग रामस्मरणांत । निद्रा घेती मंदिरी ॥३९॥ऊसाचे मळ्याचा राखणदार । मंदिरी आला धावत । सांगे मयुरानंदांस । अनाकलनीय जे घडले ॥४०॥काल प्रहर रात्रीस । मळ्यास लागली आग । उसळले अग्नीडोंब । अग्नीप्रलय जाहला ॥४१॥देखला एक तरुण । पाहतसे उत्तुंग अग्न । क्षणी शांत होऊन । मळा जैसा तैसाची ॥४२॥कोणी कैसे येऊन । केले अग्नीशमन । तसुभर ना नुकसान । जाहले पिकाचे ॥४३॥मयुरानंद शांत चित्त । नेत्र करिती अश्रुपात । अग्नी शमवीसी रघुनाथ । म्हणून अदृश्य राम गाभारी ॥४४॥जय जय श्री रघुनाथा । अनाथ भक्त रक्षका । अग्नी शमवीसी अग्नीबीजा । विश्वपालका तुज नमो ॥४५॥करुणाकर दयाघन । रामो राजमणी सीता रमण । सदा विजयते रघुनंदन । भजतो राम रमेशासी ॥४६॥नसे परतर रामाहून । आवडे रामाचे दास्यपण । मम चित्तालयीं बसून । उद्धरी मज रामचंद्रा ॥४७॥इतिश्री स्वामी कृपांकित । श्री मयुरानंद धारामृत । तस्कर शासनं, तथा हुताशन शमनं नामो,षष्ठमोध्याय: । श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ शुभम भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP