मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मयुरानंद धारामृत| अध्याय दुसरा श्री मयुरानंद धारामृत चरित्रगाथा पारायण पध्दत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा श्रीमयुरानंद स्वामींची आरती आत्मलिंग चंद्रशेखराची आरती श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय दुसरा श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा Tags : abhangmarathimayuranandअभंगमयुरानंदमराठी अध्याय दुसरा Translation - भाषांतर ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरुवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥नमो श्री स्वामी समर्थाय । प्रत्यक्षं परब्रह्मणे । नमो परमहंसाय । शिवरुपिणे ते नम: ॥२॥प्रथम अध्यायात । मयुरानंद वंशसंकेत । वेदशास्त्र, वैद्यकी ज्योतिष । अखंड वरदान वंशासी ॥३॥ज्योतिर्विद्येचे ऋषी । झाले धोंडोपंत जोशी । तयांचे अपर वयासी । तयांसी झाला पुत्र ॥४॥नाम तयाचे रघुनाथ । पित्यासम विद्यायुक्त । ब्रह्मचर्याश्रम होता पूर्त । विवाह योजिला पित्याने ॥५॥उमराळे सन्निधान । नाळा नामक ग्राम । तेथे वेदशास्त्रसंपन्न । जोशी लक्ष्मणशास्त्री ॥६॥लक्ष्मण शास्त्रींची बहीण । तियेचे रघुनाथाशी झाले लग्न । रघुनाथासी अपत्य प्रथम । कन्यारत्न लाभले ॥७॥पुनश्च डोहाळे तियेसी । गायी अभंग रागेसी । बोले वेदांत शास्त्रासी । सात्त्विक डोहाळे सुलक्षण ॥८॥ज्येष्ठ वद्य नवमीस । शके सत्राशे एकोणसाथ । इसवी सन अठराशे सदतीस । प्रसवे पुत्रासी ॥९॥मामा लक्ष्मणशास्त्री । तयांची कुंडली मांडिती । आणि जातक पाहती । त्याच्या आयुष्याचे ॥१०॥म्हणती दिव्य लक्षणी पुत्र । पूज्य होईल सर्वत्र । गुरुकृपा अक्षय छत्र । लाभेल तयासी ॥११॥दैवयोग परी विचित्र । नसेल माता पित्यांचे सुख । जाणुनी पुढील संकेत । नाम `मोरेश्वर' ठेवा म्हणती ॥१२॥सत्यव्रताचिया निकटी । सत्पुरुषांचे पाठी । विघ्ने आपदा येती । यास `नियती' म्हणावे ॥१३॥मोरेश्वर जन्मतां सहावे दिवशी । ज्येष्ठ भगिनी परलोकवासी । आणि बारावे दिवशी । गेला पिता परधामा ॥१४॥पांच वर्षे होता तयास । आंचवे मातृसुखास । दैवी कांती अमुप । पोरकेपण भाळा आले ॥१५॥पांच वर्षांचे बाळ । मामा करिती सांभाळ । आपुले ज्ञान भांडार । तया देती लक्ष्मण शास्त्री ॥१६॥लक्ष्मणशास्त्री देवी भक्त । वाचती `सप्तशती सार्थ' । मोरेश्वरा विधियुक्त । सप्तशती संथा देती ॥१७॥सप्तशतीचे गूढरहस्य । मार्कंडेयांचे संकेत । बीजमंत्रांचे फल दातृत्व । सांगती मोरेश्वरा ॥१८॥`इतिर्शब्द हरेर्लक्ष्मी । वध कुल विनाश कृत । अध्यायो हरती प्राणान । मार्कंडेय ब्रविद् इतिम् ॥१९॥ज्योतिष, वैद्यकी शास्त्र । करी मोरेश्वर आत्मसात । लक्ष्मणशास्त्री कृतार्थ । झाले सिध्दप्रज्ञा पाहूनी ॥२०॥निर्गुणी प्रज्ञापूर छत्र । सारेच असे अतर्क्य । महाकाली स्फुरण रुपा । सदा वसे सिध्दत्वे ॥२१॥मोरेश्वराचे आजोबा चुलत । बापू जोशी नामक । आजोळाहून उमराळ्यास । आणिले तयांनी ॥२२॥बापू जोशी आजोबा चुलत । दोन पुत्र तयांस । एक सून भोगी वैधव्य । ऐसी कर्मगती ॥२३॥सारे घर अनापत्य । म्हणून आणिला वंशदीप । मोरेश्वरा अति प्रीत ॥ समस्त करिती ॥२४॥चक्रेश्वर मंदिर । जागृत स्थान उमराळ्यांत । मोरेश्वर अर्चित । जोशी वंशाचा शिव शांभव ॥२५॥मोरेश्वर असतां सान । घडले अतर्क्य महान । कोणी ब्राह्मण येऊन । सांगे बापूशास्त्रींशी ॥२६॥कोणी महंत साशिष्य । अलि चक्रेश्वर मंदिरात । आपणां पाचारित । सपरिवार यावे दर्शना ॥२७।त्यांनी वर्षे अठ्ठेचाळीस । उभे राहूनी आचारिल तप । पाठ ना लाविली धरणीस । हिमालयी वास असे ॥२८॥समस्त आले दर्शनास । मोरेश्वरा घेतले अंकास । अवघ्राणूनी मस्तक मुख । भविष्य वदले तयाचे ॥२९॥नसे मातृपितृ सुख । जन्मांतरीचा योगी ज्ञानयुक्त । कुलवंशा उध्दारक । राहील कीर्तिमान अक्षय ॥३०॥तयासी विभूति लाऊन । सुखी विभूती प्रोक्षण । शारदा सरस्वती वरदान । जाहली गंधार धारणा ॥३१॥आशिर्वचुनीसमस्तांसी । महंत गेले हिमाचलासी । ते पूर्वाश्रमीचे जोशीवंशी । क्रृपा केली वंशदीपा ॥३२॥बापू जोशी इच्छित । पहावे सूनमुख । आणि विवाह निश्चित । मोरेश्वराचा करिती ॥३३॥पालघर तालुक्यांत । एडवन असे ग्राम । तेथील राजवैद्य महान । बाबाजी पुरोहित ॥३४॥तयांची कन्या गोपिकेस । वर शोधिला मोरेश्वर । बापू जोशी जाहले कृतार्थ । मोरेश्वर चतुर्भुज जाहला ॥३५॥इतिश्री स्वामी कृपांकित, श्री मयुरानंद धारामृत ॥ सिध्दवंश संकेत नाम द्वितियोध्याय: ॥श्री महासिध्दर्पणमस्तु ॥ शुभम् भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP